चिनी-तिबेटी भाषा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
आशियाच्या नकाशावर चिनी-तिबेटी भाषा
चिनी-तिबेटी हे जगातील एक प्रमुख भाषाकुळ आहे. ह्या भाषाकुळात दक्षिण, आग्नेय व पूर्व आशियामधील २५० भाषांचा समावेश होतो. इंडो-युरोपीय भाषाकुळाखालोखाल चिनी-तिबेटी हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक भाषिक असणारा भाषासमूह आहे. चीन, तैवान, बर्मा तसेच ईशान्य भारतात ह्या भाषा वापरल्या जातात.
चिनी-तिबेटी कुळामध्ये खालील भाषा मोडतातः
- चिनी भाषा व तिचे अनेक प्रकार
- बर्मी भाषा
- तिबेटी भाषा
- मणिपुरी भाषा