चित्र चर्चा:Chavdi-duva.png

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा दुवा कोठे नेतो?

अभय नातू १७:५३, २९ जुलै २०११ (UTC)

नवीन वाचकांना (विपी समुदाया बाहेरील)सरळ चर्चेत सामावून घ्यायचे असेल अथवा त्याचे कडून मत मागवायचे असेल तर चावडी पर्यंत पोहचणे त्यांना कठीण जाते. तेव्हा निमंत्रणासाठी हा दुवा वापरावा. हा दुवा बाहेरील वाचकास सरळ चावडीवर आणतो. थोडक्यात मिडिया विकितील लाबच लांब पानाच्या दुव्याचा हा संक्षिप्त दुवा आहे. ( www.chavdi-dd.tk ) राहुल देशमुख १८:३०, २९ जुलै २०११ (UTC)

हा दुवा chavadi-dd.tk या बाह्य संकेतस्थळावर जातो ज्याचा विकिपीडियाशी संबंध नाही (मला तरी माहिती नाही).
छोटा दुवाच हवा असल्यास [चावडी] हा दुवा वापरावा आणि चित्रातील बाह्य संकेतस्थळाचा दुवा काढून टाकावा.
अभय नातू १९:०४, २९ जुलै २०११ (UTC)
  • दुवा बाहेरील संकेत स्थळास जात नाही. हा चावडी साठी रीडायरेक्ट करणारा यु आर एल मीच तयार केला. कारण सदस्याला बाहेरील व्यक्तीस चर्चा वाचण्या साठी विपत्र/निरोप द्वारे दुवा पाठवायचा असेल तर पानाचे मिडिया विकितील दुवे हे फार लांब आणि वाचता नयेणारे असतात. तेव्हा हा रीडायरेक्टर लक्षात ठेवायला सोपा आणि पाठवायला छोटा तयार केला. जर संपूर्ण रोमन अक्षरात चावडी ध्येय आणि धोरणेच छोटा दुवा आपल्या कडे असेल तर द्यावा त्याने रीडायरेक्टर ला बदलून टाकतो. राहुल देशमुख १९:२९, २९ जुलै २०११ (UTC)
संपूर्ण रोमन अक्षरातील माहिती नाही पण http://mr.wikipedia.org/wiki/चावडी हा दुवा लक्षात ठेवण्यास व पाठवण्यास अवघड नाही. बाहेरील संकेतस्थळांवरुन रिडायरेक्ट होणारे दुवे हे मोठी security risk आहे. ही risk फक्त विकिपीडियाच्या संकेतस्थळासाठीच नव्हे तर वापरणार्‍याच्या संगणकालाही आहे. असे रिडायरेक्टर दुवे वापरल्यास मॅन-इन-द-मिडल, पॅरामीटर-सब्स्टिट्युशन, इ अनेक प्रकारे त्रयस्थ संकेतस्थळावरुन हल्ला होऊ शकतो.
अभय नातू १९:४८, २९ जुलै २०११ (UTC)
  • मी सदर माहिती फलक चावाडी वरून काढला आहे. आपण दिलेला दुवा हा रोमन अक्षरात नसल्याने तो टंकलिखित करणे कठीण असल्याने चावडीच्या थेट निमंत्रांची योजना तूर्त स्थगित करतो आहे. आपणा कडे काही पर्याय असल्यास जरूर कळवावे.
चावडीवर रंगत असलेल्या चर्चा वाचण्या साठी जरी लोकांना आकर्षित आपण करू शकलो (ग्रुप मेल, मेसेंजर्स, फेसबुक, ट्युटर द्वारा) तर हळू हळू त्यानाही मुख्य प्रवाहात यावेसे वाटेल आणि त्यातून प्रचार आणि प्रसार होईल अशी ह्यामागची कल्पना होती. एक अतिशय लोकप्रिय झालेली चर्चा जिने सोशल नेट्वर्किंग वर धमाल केली येथ देत आहो. राहुल देशमुख २०:०६, २९ जुलै २०११ (UTC)

चावडीसाठी दुवे[संपादन]

विकीबाहेरच्या लोकांना चावडीवर आणण्यासाठी chavadi-dd.tk हा दुवा निरुपयोगी आहे, कारण तो चावडी शब्द असलेल्या अनेक पानांवर नेतो. तोच प्रकार [| चावडी] या दुव्याचा. तोही दुवा सर्चच्या रकान्यात टाकला तर, अनेक पानांची यादी देतो, त्यांतील फक एकच पान मराठी विकीचे आहे. सर्च न करता फक्त पत्ता टाकून ‘जा’ म्हटले की चावडी उघडेल, पण त्यासाठी पूर्ण जाल-पत्ता स्पेलिंगची चूक न करता टंकावा लागेल. असे कोणी आपणहून करेल असे वाटत नाही.

कोणताही दुवा केला तरी त्याचा वापर विकीबाहेरचे लोक करतील ही शक्यता कमीच. त्यापेक्षा mr.wikipedia.org म्हटले की शोधयंत्र सरळ मराठी विकीचा दुवा देते, त्यावर टिचकी मारली की चावडीचा दुवा मिळतो आणि मग चावडीवर येता येते. हेही नको असेल तर नुसते wikipedia.org करून इंग्रजी विकीवर जाऊन तिथून मराठी विकीवर सहज येता येते. एखाद्याला विकिपीडिया हे नावच माहीत नसेल तरी हरकत नसते. एखाद्या विषयाची माहिती मिळवण्यासठी गुगलसर्च केला की एकातरी विकिपानाचा दुवा मिळतोच. त्यावर जाऊन मराठी विकीच्या चावडीवर येणे शक्य असते. मात्र, ज्या माणसाला मराठीशी काही देणेघेणे नाही अशा मनुष्याला चावडीवर आणून काय उपयोग?

नवीन नवी दुवे जरूर तयार करावेत, पण ते वापरून किती माणसे चावडीचे पान उघडतील ही शंकाच आहे, आणि तसे करणाऱ्या माणसांची संख्या माहीत करून घेणे हेही अवघड आहे. त्यापेक्षा अन्य मराठी संकेतस्थळांवर गेल्यावर हे दुवे दिसतील अशी योजना त्या स्थळांच्या सहकार्याने राबवता येईल का, या शक्यतेचा विचार करावा. जे लोक इतर संकेतस्थळांवर मराठी लिहितात, वाचतात ते मराठी विकीच्या चावडीवर, निदान कुतूहल म्हणून तरी, नक्की येतील.

उपक्रमवरची सदर चर्चा ही संस्कृत अपशब्दांबद्दलची होती, तिचा आपल्या चावडीशी काय संबंध? चावडी म्हणजे कोतवाल-कचेरी, गावातल्या लोकांना एकत्र बसून चर्चा करण्याची जागा, शिळोप्याच्या गप्पाटप्पा/चांभारचौकशा/चकाट्या पिटणे वगैरे करण्याचे गावातील ठिकाण, हे शब्दकोशातील अर्थ मी यापूर्वीच सांगितले आहेत. यांतील आपल्या सोईचा अर्थ - चर्चा, विचारविनिमय इत्यादी. ...J ०७:३५, ३० जुलै २०११ (UTC)


थोडे स्पष्टीकरण[संपादन]

  • नमस्कार जे,

आपण चावडीवर पोहचण्याचे अनेक मार्ग येथे सुचवले आहेत. आपण योग्यच आहात (ह्याला Multi hop म्हणतात) पण नवीन लोकांना हे कटकटीचे आणि किचकट वाटते आणि ते आपल्याकडे पोहचण्या पूर्वीच पाठ फिरवण्याची श्याक्याता असते. म्हणून जर थेट दुवा (ज्यास Single hop म्हणता ) दिला तर रिटेन्षण वाढते हे मान्य असलेले तत्थ्य आहे. आपण म्हटल्या प्रमाणेच हा दुवा इतर सांकेतिक स्थळे, चर्चा, सोशल नेटवर्किंग आदी मध्मान द्वारे थेट चर्चा पानापर्यंत पोहचवण्याचे कमी वापरण्याचाच मनोदय आहे.

>>>नवीन नवी दुवे जरूर तयार करावेत, पण ते वापरून किती माणसे चावडीचे पान उघडतील ही शंकाच आहे, आणि तसे करणाऱ्या माणसांची संख्या माहीत करून घेणे हेही अवघड

संखाकी हवीच असेल तर हेही फारच सोपे आहे. हीट काउंटर मध्ये रेफरल साईट ची माहिती मिळते तेथून आपणास हे कळू शकते.

>>>उपक्रमवरची सदर चर्चा ही संस्कृत अपशब्दांबद्दलची होती, तिचा आपल्या चावडीशी काय संबंध?

हे उदाहरणा दाखल होते.

  1. सदर चर्चा फक्त एका टीचकीने आपण पाहू शकलात (मी आपणास इथेजा तीथेजा सांगितले असते तर कदाचत तुम्ही त्रासले, भरकटले जाण्याची शक्यता असती.)
  2. येथे हेपण दाखवणे होते कि महाजालावर अनेक लोक संस्कृतालील शिव्यान सारख्या क्लिष्ट विषयावर माहितीपूर्ण आणि रंजक पण गंभीर चर्चा करतात.
  3. अर्थात महाजालावर सतत्याने, सक्रियपणे, गंभीर विषयावर बौद्धिक चर्चा करणारी बरीच विचारवंत मंडळी उपलब्ध आहेत जर आपणा त्याच्या पर्यंत पोहोचले तर त्यानाही विपीवर योगदान देण्यास आवडू शकेल

राहुल देशमुख ०९:२१, ३० जुलै २०११ (UTC)

उपाय क्र. २[संपादन]

मी आता थोडा जुगाड करून http://mr.wikipedia.org/wiki/Chavdi हा रोमन दुवा तयार केलाय जो बाहेरील वापरकर्त्याला थेट चावडीवर नेतो. मला असे वाटते कि ह्याच्या वापरास हरकत नसावी राहुल देशमुख २१:३८, २९ जुलै २०११ (UTC)

राहुल, चित्र छान आहे तुमच्या उत्साहाचेही कौतुक आहे, पण या संकल्पनेशी मी पुरेसा सहमत होऊ शकत नाहीए,अभयने उपस्थीत केलेला मुद्दा एक महत्त्वाचा भाग झाला.लोकांना सहसा वाद-विवादात रस असतो आणि त्या निमीत्ताने का होईना लोक विकिपीडियाकडे आकर्षीत होतील हा एक आणि दुसरे येथील चर्चेत भाग घेण्याच्या निमीत्ताने विकिपीडियातील लेखनाचा अप्रत्यक्ष सराव होणे असे दोन फायदे मला या संकल्पनेचे दिसतात.
सचित्र नव्हे पण असे काही प्रयोग मागे करून पाहीलेच नाहीत असे नाही, पण विवीध कारणांनी प्रत्यक्षात अपेक्षीत असे घडत नाही.खरेतर सोशल नेटवर्कींग वाल्या बहुतांश मंडळींना चावडीचा परिचय असतो नाही असेही नाही. एकतर येथील चर्चांना विकिपीडियातील इतर पार्श्वभूमी असते ज्याची सरळ चावडीवर पोहोचणार्‍या मंडळींना कल्पना नसते त्यामुळे चर्चेत सहभाग अशक्य नसला तरी पुरेसा आकर्षक पर्याय ठरत नाही,संदर्भ देण्याची आवश्यकता , सहसा विषयांतराची संधी नसणे आणि द्रुपल सिएमएस प्रमाणे थ्रेड नुसार चर्चा टिकवून ठेवणे आणि टायपींग करता येता क्षणी ओपन विंडो मिळणे घडत नाही,नाही म्हटले तरी संपादन या शब्दावर टिचकी मारावी लागते.तर दुसरीकडे विकिपीडियन्सच्या दृष्टीने नको असलेले अविश्वकोशीय विषयांचे चर्चा प्रस्ताव म्हणजे निव्वळ उत्पात असतो आणि ते वगळले/उलटवले जातात.
त्या शिवाय चित्रात चावडी विकिपीडियाशी संबंधीत आहे हे लक्षात येत नाही आणि सर्वच संकेत स्थळांचे दुवे बदलते असू शकतात त्या दृष्टीने दुवा चित्रात आंतर्भूत करण्या पेक्षा दुवा पार्श्वभूमीत ठेवण्याची सोय बहुतांश संकेतस्थळांवर असरते ती वापरावी म्हणजे काही कारणानी प्रत्यक्ष दुवा बदलला तर पार्श्व भूमीतील दुवा बदलता येईल. बरे एवढे करून (गूगलच्या सौजन्याने पोहोचलेले लोक) खूप लांब लेख चर्चात सहभागीही होतात झालेल्या चर्चा लेखांचा अनुभव पाहीलातर प्रत्यक्ष लेख बदलण्यात मात्र पुढाकार मुळीच येत नाही.
असो ही माझि व्यक्तीगत मते झाली , संकल्पचेही मत घेऊन पहावे असे वाटते माहितगार २३:२७, २९ जुलै २०११ (UTC)
सार्‍या कुस्तीच्या आखाड्यात प्रत्येक आखाडा ,क्रिकेटच्या मैदानात प्रत्येक मैदान स्वतःच एक वैशीष्ट्यपूर्ण वेगळेपण राखून असत तस मराठी विकिपीडीयाची चावडी चावडी असलीतरी ज्ञानकोशाची चावडी आहे असा प्रत्यक्ष अप्रत्य्क्ष बोध/ओळख देणार एखाद घोष वाक्य सोबतीस असल्यास बरे पडेल. शिवाय एखाद्या गावात प्रवेश करताना रस्त्याच्या कडेला माळरानावर हॉटेलाची एकटीच जाहीरात(होर्डींग) दिसते,आपली गाडी त्याच्याकडे सहसा दुर्लक्ष करून पुढे निघून जाते . या पेक्षा छापून आलेल्या लेखा सोबतच ग्राफीक अधीक बर दिसत या दृष्टीने मराठी विकिपीडियातील चर्चा आणि वाद विवादांबद्दल एखादा लेख किंवा किमान छोट्या ओळख परिच्छेद सोबतीस असलेला बरा पडेल किंवा कसे ?
संकल्प बद्दल मनात गैर समज मनात ठेऊ नये प्रापंचिक गोष्टीतून वेळ काढणे आणि प्रत्येक गोष्टीस समान न्याय देणे अवघड असते , मी सध्या संकल्पचे मराठी विकिपीडियाच्या बाहेर लेखन करून नवोदितांना आणण्याकडे लक्ष केंद्रीत आहे त्यामुळे तुम्हा दोघांचे परस्पर सहाय्य परस्पर पुरक असेल असा माझा समज आहे.