चित्ता
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| चित्ता | ||||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||||
| शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||||
|
||||||||||||||
| शास्त्रीय नाव | ||||||||||||||
| ऍक्टीनोनियक्स जुबाटस (जॉशुआ ब्रूक्स, १८२८) |
||||||||||||||
![]() |
चित्ता हा जगातील सर्वात वेगवान प्राणी आहे. ताशी ११० किमी इतक्या वेगाने तो पळू शकतो. सर्वाधिक वेगवान माणसाच्या तिप्पट वेगाने पळू शकतो. सर्वात वैशिठ्य म्हणजे ० ते १०० किमी/तास केवळ तीन सेकंदात गाठू शकतो. हे अजूनही मानवाला सर्वोतकृष्ट वाहनात पण मिळवता आलेले नाही. चित्ता हा मार्जार कुळातील प्रजाती आहे. बराच काळा चित्ता मार्जार कुळात असावा की नसावा यावर वाद होता त्याचे कारण त्याची शरीरयष्टी जी वेगाने पळण्यासाठी उत्क्रांत झालेली आहे व इतर मांजरांपेक्षा वेगळे ठरवते. चित्ता हे नाव मूळचे संस्कृत चित्रक्य असून हिंदीत चिता व मराठीत या प्राण्याला चित्ता म्हणतात.
अनुक्रमणिका |
[संपादन] आढळ
एकेकाळी चित्ता हा अफ़्रिका युरेशिया व भारतीय उपखंडातील मोठ्या भूभागावर पसरला होता परंतु आज चित्याचे आढळस्थान केवळ अफ़्रिकेच्या गवताळ प्रदेशापुरते मर्यादीत राहिले आहे. याला मुख्य कारण चित्याचे नष्ट झालेले वस्ती स्थान. चित्याचे मुख्य वसतीस्थान जे गवताळ प्रदेश आहे त्यावर शेती व इतर कारणासाठी मानवी अतिक्रमण् ज़ाले. तसेच चित्याचे वैशिठ्य जे अतिवेग आहे तो चित्याच्या प्रगतीत खरेतर मारक ठरला. चित्याने उत्क्रांती मध्ये वेग मिळवला खरे परंतु त्याने शारीरीक ताकद गमावली. त्यामुळे चित्ता बहुतेक वेळा त्याच्या पिलांचे इतर भ़क्षकांपासून त्याच्या पिल्लांचे अथवा त्याने मिळवलेल्या भक्षाचे रक्षण करू शकत नाही त्यामुळे चित्याची बहुत ठिकाणी संख्या कमी ज़ाली.भारतातील चित्ता ज्याला अशियाई चित्ता म्हणत त्याचा भारतात एके काळी मोठ्या भूभागावर वावर होता. चित्यांचा वापर राजेलोक शिकारींसाठी करत. मुघल दरबारात शेकडो चित्ते केवळ शिकारीसाठी पाळले होते याची नोंद आहे. कोल्हापूरच्या दरबारात देखील होते. त्यांच्या शिकारीचे छायाचित्रे शाहू महाराजांच्या संग्रहालयात पहायला मिळतात[२]. चित्याची बंदीवासात वीण होत नाही असा अनुभव आहे. भारतातील शेवटचा जंगली चित्ता १९५१ मध्ये आंध्रप्रदेशात दिसला. यानंतर भारतातून जंगली चित्ता दिसल्याची नोंद नाही. त्यामुळे भारतातून चित्ता नामशेष ज़ाला आहे[३]. महाराष्ट्रातील मुख्यत्वे मराठवाडा विदर्भ व पश्विम महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशात होता अशी नोंद आहे. विदर्भातील शिकार्यांनी चित्याच्या शिकारी केल्याच्या नोंदी आहेत[४]. अशियाई चित्याची आज केवळ इराण मध्ये जवळपास पन्नास इतकी संख्या राहिली आहे. अधे मधे बलुचिस्तान मध्ये दिसण्याच्या घटना घडतात.
अफ़्रिकेतील मुख्यत्वे सव्हानाच्या गवताळ प्रदेशात अजूनही चित्याचे अस्तित्व आहे जेथे खाद्याची मुबलकता अश्या भागात अजूनही चित्ते मुबलक आढळतात. केनिया, ज़िबांब्वे, बोटस्वाना, दxiण अफ़्रिका नामिबिया, युगांडा इत्यादी देशात आढळतो.
[संपादन] वर्णन
चित्ताचे ओळखण्याचे मुख्य वैशिठ्य म्हणजे अंगावरचे ठिपके. ठिपक्यांमुळे बिबट्या आणि चित्यामध्ये लोक नेहेमी गफ़लत करतात. परंतु दोन्ही प्राण्यात मूलभूत फ़रक आहे. चित्याच्या अंगावरचे ठिपके हे भरीव असतात तर बिबट्याचे हो आतून पोकळ असतात. चित्याचे ठिपके हे २ ते ३ सेमी व्यासाचे असून ते केवळ बाह्य भागातील त्वचेवर असतात. पोट व पायांचे आतील भागांवर ठिपके नसतात. चित्याच्या चेहरयावर दोन काळ्या रेषा असतात त्या ओघळणा-या अश्रूंप्रमाणे दिसतात. बाकी शरीरयष्टीमध्ये दोन्हींमध्ये मूलभूत फ़रक आहे. बिबट्यांची शरीरयष्टी ही भरभक्कम मांजरांसारखी गुबगुबीत असते. तर चित्याची कुत्र्याप्रमाणे लांब सडक जोरात पळण्यास सxaम अशी असते. चित्याची छाती ही खोलवर व कंबर अतिशय बारीक असते. पाय अतिशय लांब सडक व लवचिक असतात. चित्याचे वजन साधारणपणे ४० किलोपर्यंत भरते. त्याची लांबी सव्वा ते १.३५ मी पर्यंत भरते. चित्याची शेपटी साधारणपणे ८४ सेमी पर्यंत असते. लांब शेपटीचा उपयोग चित्याला पळताना दिशा बदलायला होतो. शेपटीच्या टोकाला सुरेख काळा पुंजका असतो. चित्याचे अजून एक वैशिठ्य म्हणजे त्यांच्या नख्या. चित्यांना इतर मांजरांप्रमाणे नखे पुर्णपणे आत घेता येत नाही. ती अर्धवट बाहेर अर्धवट आत घेता येतात. तर मांजरांना पुर्णपणे आत बाहेर करता येतात. याचा फ़ायदा चित्यांना अतिवेग घेण्यास ज़ालेला आहे.
चित्ता हा लांबी रुंदीत मांजरांमध्ये मोठ्या आकारात येत असला तरी तो पanथेरा उपकूळात येत नाही. त्याचे कारण चित्याला डरकाळी फ़ोडता येत नाही तसेच गुरगुरता देखील येत नाही. चित्ता केवळ लहान मांजरांप्रमाणे क्यांव क्यांव करू शकतो.
अतिवेगासाठी स xम होण्यास चित्यामध्ये मोठ्या नाकपुड्या, मोठी फ़ुफ़्पुसे व वेगाने पळू शकणारे ह्रुदय विकसीत ज़ाले आहे.
[संपादन] आहार व शिकार पद्धत
चित्ता हा मांसभxक असून त्याच्या आहारात छोट्या हरीणांचा समावेश होतो. अफ़्रिकेत मुख्यत्वे इंपाला, विविध प्रकारचे गॆज़ेल्, स्प्रिंगबक हे त्याचे खाद्य आहे. कधीकधी मोठे प्राणी जसे की ज़ेब्रा किंवा वाईल्ड बीस्ट या प्राण्यांचीही शिकार करण्यात यश मिळवतो. चित्याचे अतिशय वेगवान होण्याचे कारण त्याचे खाद्य आहे. वरील हरीणे ही देखील अतिशय वेगाने पळू शकतात व् त्यांना गाठण्यासाठी चित्याला अतिवेग मिळवावा लागला आहे. चित्ता साधारणपणे दिवसा शिकार साधतो. सकाळी लवकर अथवा संध्याकाळी उन्हे कलल्यानंतर तो शिकार साधतो. दुपारच्या उन्हात तापमानामुळे तो शिकार करणे टाळतो. दुरुन शिकार टेहाळल्यावर भ याच्या जास्ती जास्त जवळ दबा धरून जातो व साधाराणपणे १० ते २० मीटर मध्ये भ य आल्यावर तो जोरदार वेगवान चाल करतो. चित्याची ही चाल पहाणे अतिशय नेत्रसुखद अनुभव असतो. अनेक छायाचित्रकार चित्याचा हा ण टिपण्यास आतुर असतात. चित्ता कधी लांबवर खूप काळ पाठलाग करत नाही. चित्याला वेग असला तरी लांबवर पाठलाग करण्याचे बळ त्याच्या पाशी नसते. साधारण पणे १ ते दीड मिनिटापर्यंत पाठलाग करुन शिकार साधतो. नाही जमल्यास तात्पुरता शिकारीचा नाद सोडून देतो. चित्ता पाठलाग करताना चित्ता आपल्या शिकारीला सरळसरळ गळा पकडूक ठार मारत नाहीत. पाठलागा दरम्यान पहिले शिकारीला पाडायचा डाव असतो व त्यानंतर त्याचा वेग कमी होतो व मग जखमी करून मग शिकारीला मारण्यात येते. शिकार साधल्यानंतर चित्ता बराच वेळ दम खातो. त्याचे शरीराचे तापमान पाठलागा दरम्यान प्रचंड वाढते व ते कमी करण्यात बराच वेळ जातो.
[संपादन] संदर्भ व नोंदी
- ↑ Cat Specialist Group (2002). Neofelis nebulosa. 2006 IUCN Red List of Threatened Species. IUCN 2006. Retrieved on 11 May 2006. Database entry includes justification for why this species is vulnerable
- ↑ आपली सृष्टी आपले धन -निसर्ग प्रकाशन ले. मिलिंद वाटवे
- ↑ इंग्रजी विकिपीडीया भारतीय चित्ता
- ↑ अरण्यापुत्र - ले. सुरेशचंद्र वारघडे
[संपादन] बाह्यदुवे
