चारोळी (कविता)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चार ओळींच्या कवितांना चारोळ्या म्हटले जाते.


चंद्रशेखर गोखले यांच्या "मी माझा" या पुस्ताकातील कांही चारोळ्या

एकदा मला ना

तू माझी वाट पहाताना पहायचंय

तेवढ्यासाठी आडोशाला

हळूच लपून रहायचंय


मरण दाराशी आल्यावर मी म्हटलं

तुला शंभर वर्षे आयुष्य आहे.

मरण ही चाट पडलं म्हणालं

काय हा मनुष्य आहे ?


इथे प्रत्येकजण आपआपल्या घरात,

अन प्रत्येकाचं दार बंद आहे

तरी एकोप्यावर बोलणं हा

प्रत्येकाचा छंद आहे


घराभोवती कुंपण हवं

म्हणजे आपलं जग ठरवता येतं

बाहेर बरबटलेलं असलं तरी

आपल्यापूरतं सावरता येतं


तू बुडताना मी

तुझ्याकडे धावलो ते

मदतीला नव्हे सोबतीला,

नाहीतर... मला तरी कूठे येतय पोहायला


आठवतय तुला आपलं

एका छत्रीतून जाणं

ओंघळणारे थेंब आपण

निथळताना पहाणं


माझ्या प्रत्येक क्षणात

तुझा वाटा अर्धा आहे

भूतकाळ आठवायचा तर

तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे.


आठवणींच्या देशात

मी मनाला कधी पाठवत नाही

जाताना ते खुष असतं

पण येताना त्याला येववत नाही