चष्मेवाला (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चष्मेवाला (पक्षी)
Oriental White Eye- Bhopal I IMG 0759.jpg
शास्त्रीय नाव Zosterops palpebrosus
कुळ चक्षुष्याद्य (Zosteropidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Oriental White-eye
संस्कृत चटकिका
हिंदी बबूना

अनुक्रमणिका

[संपादन] वर्णन

चष्मेवाला (पक्षी) हा चिमणीपेक्षा लहान, साधारण १० सें. मी. आकाराचा पक्षी आहे. हा जर्द पिवळ्या रंगाचा असून याच्या डोळ्याभोवती पांढर्‍या रंगाचे ठळक वर्तुळ असते त्यावरून याचे नाव चष्मेवाला असे पडले.

[संपादन] आवाज

Oriental White Eye.ogg आवाज ऐका

[संपादन] वास्तव्य/आढळस्थान

चष्मेवाला (पक्षी) वाळवंटी प्रदेश सोडून संपूर्ण भारतभर आढळतो तसेच म्यानमार, बांगलादेश, इंडोनेशिया, पाकिस्तान या देशातही याचे वास्तव्य आहे.

भारतात हा निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. याच्या रंग आणि आकारावरून किमान चार उपजाती आढळतात.

[संपादन] खाद्य

हा १५-२० पक्ष्यांच्या लहान थव्यात झाडांवर राहणारा (Arboreal), उत्साही पक्षी आहे. कीटक आणि मध शोधत हा एका झाडावरून दुसर्‍या झाडावर जात असतो.

[संपादन] प्रजनन काळ

साधारणपणे एप्रिल ते जुलै हा काळ या पक्ष्याचा प्रजनन काळ असून जमिनीपासून २ ते ४ मी. अंतरावर, कोळ्याच्या जाळ्याने तयार केलेले, लहान घरटे बांधतो. अंडी फिकट निळ्या रंगाची टोकाकडे गडद निळ्या टोपीची असतात. नर-मादी मिळून पिलांना खाऊ घालतात व इतर कामेही मिळून करतात.

[संपादन] चित्रदालन


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये