चर्चा:आषाढी वारी (पंढरपूर)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:वारकरी संप्रदाय या पानावरून पुनर्निर्देशित)

साचा काढला[संपादन]

लेखात आवश्यक ती सर्व माहिती पुरेशा प्रमाणात संपादित झाली आहे असे वाटते त्यामुळे तूर्त काम चालू साचा काढला आहे.आर्या जोशी (चर्चा) ११:५२, २८ जून २०१८ (IST)[reply]

वारकरी संप्रदायाचा इतिहास :

वारकरी संप्रादायाचा उगम - वारकरी संप्रादायाचा उगम निश्चितपणे सागणे कठिण आहे, कारण हा स्वतंत्र संप्रदाय अथवा नवीन बंडखोर विचारधारा नसुन भारत वर्षात वेद काळापासुन चालत आलेल्या औपनिषदिय तत्वज्ञान परंपरेची वाटचाल आहे. वारकरी संप्रादायाचे आराध्य दैवत श्री पांडूरंग परमात्मा म्हणजेच वेदामध्ये आढळणारे विष्णू देवता अथवा पुरूष सुक्तातील देवतेची स्वरूप मानण्यात येते. श्री विठठल भगवान म्हणजेच वेद बोधीत जगताची स्थिती राखणारी विष्णु देवता असेही सिदध करता येते.   
     वेदकाळ व वेदोत्तर काळात कर्म काळात प्राधाण्याने प्रतिपादन करण्यार्या परंपरेसोबत ज्ञानाची परंपरा होती. वेदाच्या अंतिम भागातील उपनिषदामध्ये आढळणारे परिपुर्ण तत्वज्ञान हे वारकरी संप्रादायाचे मुळ उगम स्त्रोत म्हणता येईल. वेदामधील किचकट कर्म कांडाविरोधात उसळलेल्या बौदध धर्माच्या लाटेत वेदामधील ज्ञानप्रधान तत्वज्ञानही नाकारले जावु लागले. हिंदू धर्मातील औपनिषदीय तत्वज्ञानाची पुनर्स्थापना करण्याचे आसेतु हिमाचल वेदांत तत्वज्ञानाची सिंह गर्जना पसरविण्याचे कार्य भगवान शंकराचे अवतार मानल्या गेलेल्या श्रीमत् आद्य शंकराचार्यानी केले. आद्य शंकराचार्यानी अव्दैत वेदांत शास्त्राचे पुनरूज्जीवन केले. 
       आचार्यानी श्रीक्षेत्र पंढरपुरला दिलेली भेट व पांडूरंगाष्टकम् ची निर्मिती आचार्याच्या काळातील श्री विठठल भक्तीची वैभव शाली परंपरा - वाटचाल दाखवते वारकरी संप्रादायाच्या मुळ तत्वज्ञान परंपरेचा मागोवा जरी उपनिषद् काळापंर्यत घेता येत असला, श्री विठठल भक्तीच्या पाउल खुणा इसवी सनाच्या पहिल्या शतकापर्यत प्रकट रुपाने आढळत असल्यातरी वारकरी संप्रदाय हे नामभिधान धारण करुन वारकरी संप्रदाय श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत नामदेवराय याच्या काळातच नावारुपाला आला. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक व आंधप्रदेशातही ही संप्रदायाची परंपरा पसरली. आद्य शंकराचार्याच्या अव्दैत तत्वज्ञान पुनर्स्थापनेनंतर ही व्दैताव्देत शुध्दाव्दैत, केवलाव्दैत अशी परंपरा चालु राहिली. या परंपरामध्येही श्री विठठल उपासना स्विकारली गेली, म्हणुनच वारकरी संप्रादायाप्रमाणे श्री विठठल उपासना करणारी परंपरा कर्नाटकात, आंध्रात निर्माण झाली. तत्वज्ञान दृष्टया भेद स्विकारून ही सर्व श्री विठठलाचे भक्त झाले. मात्र या परंपरांचा व वारकरी संप्रादायाचा संबंध श्री विठठल भक्ती व सगुणोपासना या सारख्या ठराविक मुदयावरच सारखा आढळतो. मात्र विस्तार संत परंपरा व विकसीत होत गेलेली. भक्तीची परंपरा या गोष्टीत भिन्न आढळते. 
     श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत निवृत्तीनाथ, श्री संत सोपान महाराज, ब्रहमचित्कला मुक्ताबाई या चार भावंडाबरोबरच भक्त शिरोमणी नामदेवराय, श्री संत सावता माळी महाराज, श्री संत चोखोबा व या संत प्रभावळीतील अनेक संतानी बाराव्या शतकात वारकरी सांप्रदाय समृध्द केला. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीभगवतगीतेवर केलेली मराठी टिका-भावार्थ दिपिका अर्थात ज्ञानेश्वरी, अमृतानुभव चांगदेव पासष्टी व अभंग गाथा व इतरही संतांचे साक्षात्कारी अनुभूतीप्रधान अभंग हे मराठी भाषेचे अक्षर वैभव ठरले. याच काळात महाराष्ट्रात सर्वदूर तळागाळापर्यत श्री विठठल भक्ती पोहचली. वारकरी सांप्रदयाची सर्वसमावेशकता आचरण सुलभता व अभंगाची भाषा यामुळे सांप्रदायाचा विस्तार झाला. मात्र याच काळातील परकीय आक्रमणे व परकीय सत्तेच्या टाचेखाली चिरडलेली जनता स्वसामर्थ्य हरवून बसली. परधर्मियांच्या आक्रमणामुळे धर्माच्या बाहय गोष्टी पुन्हा बळावल्या. तत्वज्ञान व अंतरंग गोष्टी बंदिस्त झाल्या. हा सुमारे तीनशे वर्षाचा कालावधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील अंधकारमय रात्र ठरली. 
    16 व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात चैतन्य जागृत झाले. महाराष्ट्रांच्या बुध्दीच्या तलवारीला व शौर्याच्या समशेरीला पुन्हा धार चढली. महाराष्ट्रात वारकरी सांप्रदयात अवतरलेल्या शांतीब्रहम एकनाथ महाराज व त्यानंतर लगेच अवतीर्ण झालेल्या जगदगुरू तुकोबारायांनी वारकरी सांप्रदायावर झळझळीत सुवर्णाचा कळस चढवला. या वारकरी सांप्रदायाच्या दुसर्या लाटेने संपुर्ण महाराष्ट्र ढवळुन काढला. या महाराष्ट्राच्या मातीत, माणसाच्या मनात बीजरुपाने पुर्वीपासुन बसणार्या वारकरी भक्तीभावाला खतपाणी मिळुन महाराष्ट्रा व्यापी वारकरी सांप्रदायाचा वटवृक्ष फोफावला. विविध जातीत, विविध भागात अवतरलेल्या संतांनी वटवृक्षाच्या पारब्याप्रमाणे सांप्रदायाचे तत्वज्ञान त्या भागात पोहचवलेच व सांप्रदायाला खंबीर आधार दिला. या कालावधीत जगदगुरू तुकोबारायांच्या प्रभावळीतील चौदा टाळकर्यांनी व शिष्य निळोबारायांनी सांप्रदायाचा ध्वज फडकवत ठेवला. जगदगुरू तुकाराम महाराजांचे पुत्र संत श्री नारायण महाराजांनी यांनी सुरू केलेल्या पंढरी वारी-पालखी सोहळयाने सांप्रदायाला एक नविन सहभागाचे परिमाण लाभले. शिंदे सरकारचे सरदार श्री हैबतबाबा आरफळकर यांनी पालखी सोहळयात सुसूत्रता आणुन पालखी सोहळयाची भव्यता वाढवली. 

आज ही महाराष्ट्रातील प्रमुख पालख्या आषाढी वारीस पंढरपुरला जातात. यात लक्षावधी वारकरी उन-पावसाची तमा न बाळगता सहभागी होतात. या पालखी सोहळयात श्री संत ज्ञानेश्वर महाराज माउली, जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या प्रमुख पालख्यांप्रमाणे वारकरी सांप्रदायातील प्रमुख संतांच्या पालख्या दिंडी सोहळा आषाढी वारीस पंढरपुरास जातो. सहयाद्रीच्या दर्याखोर्यातुन तळागाळातुन श्री पांडूरंगाच्या चरणी अनन्य निष्ठा असलेला वारकरी घरदार सोडून उन्हापावसाची पर्वा न करता अनंत गैरसोयी सोसुनही पायी पंढरपुरला जातो व तेथे गेल्यावर त्याच्या डोळयातून तनामनातून ओसंडून वाहणारी कृतकृत्यता, भक्तीचा आनंद वारकरी सांप्रदाय किती जनमाणसाच्या अंत-करणापर्यंत पोहचला आहे याची साक्ष देतो.

महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकरांची यादी[संपादन]

१. बाबामहाराज सातारकर २.चैतन्य महाराज देगलुरकर ३. प्रमोद महाराज जगताप ४. रामराव महाराज ढोक ५. योगीराज महाराज पैठणकर ६. संजय महाराज पाचपोर ७. पांडुरंग महाराज घुले ८. प्रकाश महाराज बोधले ९. बंडातात्या कराडकर १०.अक्षय महाराज भोसले ११. सन्दिपान महाराज हसेगावकर १२ . पुरषोत्तम महाराज पाटील १३. जयवंत महारज बोधले १४ . संजय महाराज धोंडगे १५ .धर्मराज महाराज हंडे १६ .शामसुंदर महाराज सोन्नर १७. तुकाराम महाराज सांगळे १८ . सुभाष महाराज घाडगे १९. गोरक्षनाथ महाराज घाडगे २० .निवृत्ती महाराज देशमुख २१ . विजय महाराज बाळसराफ २२. भास्कर महाराज ओक २३. चिन्मय महाराज सातारकर २४. बालकीर्तनकार,किरण महाराज असवले-पाटील[सातारकर] २५.ह.भ.प. रामायणाचार्य प्रसाद महाराज भागवत (नाशिक) २६.ह.भ.प. संभाजी महाराज मोरे- देहूकर(संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान १० वे वंशज) २७.ह.भ.प श्री प्रसाद महाराज वारूंगसे. २८.श्री महंत ह.भ.प संदीपदास महाराज पडवळ

बाह्य दुवे[संपादन]

वाक्याचे अधिक वस्तुनिष्ठ लेखन करण्याची गरज[संपादन]

  • वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते.
अशा प्रकारच वाक्य लेखात आलं आहे. वारकरी धर्म या शब्द समूहा बद्दल काळजी नाही. परंतु भागवत संप्रदाय सर्व भारतात आहे आणि सर्व भारतातील भागवत संप्रदाय वारकरी नाही म्हणून "वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते." या वाक्याचे अधिक वस्तुनिष्ठ लेखन करण्यास वाव आहे असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:४४, २५ जुलै २०१४ (IST)[reply]

अपूर्ण माहिती/ अवास्तव मथळे[संपादन]

नमस्कार विकी, जय हरी… आपण या पानावर दिलेली वारी या विषयीची माहिती हि अपूर्ण तर आहेच पण वारी वगळता बाकीचीच जुळवाजुळव खूप प्रमाणात आढळून येते. वारकरी कीर्तनकार या यादीत अनेक नवी नावे दिसत आहेत कि जी संप्रदायात पण अत्यंत कमी , नाहीच्या बरोबर असा प्रचार प्रसार करीत आहेत. सगळ्या नावांच्या बाबत हे लागू पडत नाही हे पण मान्य अहे. पण ह्या मुळे वैयक्तिक प्रसिद्धी होत आहे. खरे तर या 'वारकरी' पानावर वारकरी या विषयाबरोबर वारी चा थोडक्यात इतिहास, परंपरा, दिंड्यांची संख्या, वारीचे व्यवस्थापन हे विषय या पानाला सलग्न असले पाहिजेत ना कि महाराज लोकांची नावे किंवा वारकरी संस्थांची नावे. यावर विचार व्हावा. याच विषयाच्या वारकरी या इंग्लिश पानावर कदाचित माहिती प्रमाणभूत आहे. पण मूळ मराठी भाषेत असलेल्या या पानावर ते दिसत नाही .

वारकरी या शब्दाच किंवा त्या व्यक्तीची ओळख हि वारी पासूनच आहे.. संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहोळा, जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा, , संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत नामदेव (कार्तिकी वारी), संत एकनाथ महाराज यांची पण वारी असते. पंढरपूरच्या आषाढी व्यतिरिक्त कार्तिकी वारी, माघ वारी , चैत्र वारी पण आहे. हे टाकणे महत्वपूर्ण वाटते .

@माहितगार

Swapniladitya , 18 May 2015, 09:33


@Swapniladitya: आपल्याशी बऱ्यापैकी सहमत आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:१७, १९ मे २०१५ (IST)[reply]

@माहितगार या बाबत अधिकृत - प्रमाणबद्ध माहिती हवी असल्यास आपण www.warisantanchi.com या वेबपोर्ट वरुन घेऊ शकता, ही वेबपोर्ट अधिकृत असून विकिपीडिया ने पण vaarkari या पेज वर याचा संदर्भ घेतला आहे. मी स्वत: याचा निर्माता असून आपणास शुद्ध माहिती घेण्यास होकार दर्शवीत आहे. मुळ उद्देश सत्य असावे... Swapniladitya , 20 May 2015, 20:38 IST

@Tiven2240: नमस्कार ! या लेखात अलीकडील बदल हा नोंदीकृत सदस्यांचा नाही. कृपया पण लक्ष घालावे, असे संपादन लक्षात येणे पण कठीण जाते. धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) १८:३१, २३ जून २०१८ (IST)[reply]

@Sureshkhole: नमस्कार! २०१८ ची पालखी प्रस्तावित आहे. या वर्षीचे वेळापत्रक आपण यात घालू शकाल का? धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) ११:२३, २६ जून २०१८ (IST)[reply]

@अभय नातू: नमस्कार ! या लेखाचे संपादन करताना संपादन गाळणी असा मजकूर येतो आहे. काय करावे? धन्यवाद! आर्या जोशी (चर्चा) १२:१७, २६ जून २०१८ (IST)[reply]

@आर्या जोशी:,
कोणती गाळणी लागती आहे? नेमका संदेश काय दिसतो?
अभय नातू (चर्चा) २०:२२, २६ जून २०१८ (IST)[reply]

@अभय नातू: नमस्कार! या लेखात बराच वेळ छोटी संपादने होत आहेत.त्यामुळे याला संपादन चाळणी लागू शकते.चर्चा करा व मगच पुढे जा असा संदेश येत होता.म्हणून मी आपणास साद दिली.मी ही असा संदेश प्रथमच अनुभवला.त्यामुळे मलाही संभ्रम पडला.आर्या जोशी (चर्चा) २१:२३, २६ जून २०१८ (IST)[reply]

जर केलेली संपादने योग्य असतील तर त्या वेळेपुरते गाळणीकडे दुर्लक्ष करावे.
अभय नातू (चर्चा) २१:२५, २६ जून २०१८ (IST)[reply]

संदर्भ दिसत नाहीत[संपादन]

सदर लेखाचे सर्व संदर्भ आणि बाह्य दुवे लेखात दिसत नाही आहेत. अनुभवी संपादकांनी जरा सहकार्य करावे की असे का झाले आहे त्याविषयी. आर्या जोशी (चर्चा) १२:४७, २३ जून २०१९ (IST)[reply]