चर्चा:मानवेंद्रनाथ रॉय

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काही स्पष्टीकरणे[संपादन]

  • मानवेंद्रनाथ रॉय यांच्या नरेंद्र भट्टाचार्य या नावबद्दल जन्मनावाऐवजी मूळ नाव हा शब्द वापरला आहे. मानवेंद्रनाथ रॉय यांनी भारतातील सुरुवातीची सर्व कारकीर्द नरेंद्र भट्टाचार्य या नावाने पार पाडली. जन्मापासून तर वयाच्या २९ व्या वर्षाने ते याच नावाने वावरले. १९१६ साली अमेरिकेमध्ये जेव्हा त्यांनी आपली आधीची जहाल विचारधारा सोडून समाजवादाची कास धरली, तेव्हा एका नवीन आयुष्याची सुरुवात म्हणून त्यांनी मानवेंद्रनाथ रॉय हे नाव स्विकारले.
  • संदर्भ म्हणून दिलेले कर्णिक यांचे मूळ पुस्तक इंग्रजी भाषेतील असले तरी, मी वापरलेली प्रत मराठी भाषांतरीत होती, त्यामुळे "इंग्रजीमध्ये" उचीत वाटले नाही. ISBN क्रमांकसुद्ध मराठी आवृत्तीचा आहे.
  • Radical humanism साठी माझ्याजवळील पुस्तकामध्ये जहाल मानवतावाद असा आहे. त्यासाठी कट्टर मानवतावाद हा शब्द अधिक योग्य वाटत असेल तर तो ठेवायला काही हरकत नाही. मी मूळ शब्द फक्त इथे नमुद करून ठेवला.
  • लेखाची भाषासरणी सुलभ होण्यासाठी काही बदल केल्याबद्दल संकल्प द्रविड यांचे आभार! गणेश धामोडकर (चर्चा) १५:२४, १४ जानेवारी २०१२ (UTC)
Radical humanism संबंधी काही प्रतिसाद न आल्याने मूळ स्त्रोतानुसार जहाल मानवतावाद हा शब्द वापरला. गणेश धामोडकर (चर्चा) ०९:४१, १६ जानेवारी २०१२ (UTC)