चर्चा:पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्थानिकतेचा संदर्भातील विधान[संपादन]

या लेखातील किंवा विभागातील मजकुराचा दृष्टिकोन विषयाची जागतिक व्याप्ती दर्शवत नाही. स्थानिकतेच्या संदर्भापुरतीच व्याप्ती सीमित ठेवणे अपेक्षित असल्यास, देशाचा/स्थानिक व्याप्तीचा स्पष्ट उल्लेख करावा. किंवा जागतिक संदर्भांत लिहावयाचे असल्यास पुनर्लेखन करावे.

स्थानिक उद्देश्य मला समजला नाही. मला या पध्दतीचा उल्लेख जाणवला नाही. आणि तसा उद्देश्य ही नाही. Dr.sachin23 ०८:१९, २७ मार्च २०११ (UTC)


स्थानिक उद्देश्य नव्हे, 'स्थानिक व्याप्ती'चा इशारा लावला आहे.
मुळात सध्याच्या मजकुरात असे वाक्य आहे - या अत्यंत सोप्या व निर्धोक शस्त्रक्रियेचा पुन्हा प्रसार होणे आवश्यक आहे. पुरुषी अहंकारापोटी व 'अशक्तपणा येतो' हे खोटे कारण सांगून पुरुष टाळाटाळ करतात व स्त्रियांवर शस्त्रक्रिया करून घेण्याची जबाबदारी टाकतात..
हे वाक्य जगभरातील पुरुषांच्या वृत्तीबद्द्ल टिप्पणी करणारे वाक्य आहे का ? जगभारातील पुरुष अशी टाळाटाळ करतात, असे विधान करायचा उद्देश असल्यास त्याला योग्य ते संदर्भ नोंदवावे लागतील.
किंवा हे वाक्य स्थानिक - म्हणजे एखाद्या गावाच्या/राज्याच्या/देशाच्या बाबत टिप्पणी करणारे असल्यास, त्या स्थानिकतेचा स्पष्ट उल्लेख हवा. नाहीतर हे विधान जागतिक स्तरावर लागू पडते, असा वाचकाचा गैरसमज व्हायचा.
आणि तसेही, अश्या टिप्पण्या करताना, त्यांना विश्वासार्ह संदर्भस्रोत पुरवले नाहीत, तर ती व्यक्तिगत टिप्पणी किंवा प्रचारकी निष्कर्ष वाटण्याचा धोका उद्भवतो.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०८:३४, २७ मार्च २०११ (UTC)

लेखातील स्थानिक संदर्भ[संपादन]

या लेखा सर्व अथवा भारतीय या स्थानिक संदर्भात काही एक उल्लेख नाही. Dr.sachin23 ०८:४९, २७ मार्च २०११ (UTC)

नाही नाही. आपला काहीतरी गैरसमज होत आहे. मुद्दा हा आहे, की आताची वाक्यरचना निव्वळ निष्कर्षवत जाणवत असून त्या टिप्पणीचा स्कोप जागत्तिक आहे, की केवळ महाराष्ट्रापुरता/भारतापुरता सीमित आहे, हे स्पष्ट नोंदवले नाही. त्यामुळे खालीलपैकी एक पर्याय निवडून त्यानुसार बदल करावे लागतील :
  • महाराष्ट्रापुरता/भारतापुरता टिप्पणीचा परिप्र्येक्ष ठेवायचा असेल, तर "प्रसार व स्वीकार" या विभागात "महाराष्ट्रातील प्रसार व स्वीकार" किंवा "भारतातील प्रसार व स्वीकार" असे उपविभागाचे शीर्षक नोंदवावे व त्याखाली ती विशिष्ट टिप्पणी टाकावी.
  • टिप्पणीचा परिप्र्येक्ष जागतिक ठेवायचा असेल, तर "प्रसार व स्वीकार" या विभागात अन्य देशांतील परिस्थितीचीही माहिती जोडावी.
माझ्या म्हणण्याचा रोख थोडक्यात एवढाच आहे, की ह्या लेखातील तो विशिष्ट भाग मराठी विकिपीडिया या जागतिक स्तराच्या ज्ञानकोशाला साजेशा पद्धतीनुसार व्याप्तीसंदर्भात स्पष्ट नोंद लिहून सुधारावा.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:१७, २७ मार्च २०११ (UTC)