चर्चा:गोपीनाथ मुंडे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेखाची नेटकी व आटोपशीर मांडणी[संपादन]

या लेखातील सदर आशयात बरीच माहिती उपलब्ध असली, तरीही या लेखाचे अधिक नेटके व आटोपशीर मांडणी करून पुनर्लेखन करावे, असे वाटत आहे. कृपया सर्वांनी या कामी सहकार्य करावे, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) २१:४२, २९ जून २०१२ (IST)[reply]

कॉपी-पेस्ट मजकूर[संपादन]

हा मजकूर मटाच्या या लेखातून घेतला आहे, जो मटाने गोपीनाथ मुंडे यांच्यावरील पुस्तकातून प्रकाशित केला आहे. याचे विकिकरण करणे आवश्यक आहे. क्षितिज पाडळकर (चर्चा) ०१:१०, ३ जुलै २०१२ (IST)[reply]


सुमारे चार दशकांपूर्वी बीडच्या कॉलेजमध्ये विद्यार्थी संसदेच्या निवडणुका लढवून राजकारणाचा श्रीगणेशा केला. कॉलेजात असतांना त्यांची प्रमोद महाजन यांच्यासोबत मैत्री झाली. गोपीनाथरावांच्या अवघ्या आयुष्यालाच एक विलक्षण कलाटणी मिळाली. कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आणि मुख्य म्हणजे कुठलंही आथिर्क पाठबळ नसताना गोपीनाथरावांनी कॉलेजच्या पहिल्या वर्षी वर्गप्रतिनिधीची म्हणजे 'सीआर'ची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. प्रमोद महाजन यांच्या नेतृत्वाखाली हा त्यांचा राजकारणाचा पहिला अनुभव होता. गोपीनाथराव निवडणूकीत पडले, पण त्यांचा गट निवडून आला होता. बीड जिल्ह्यातल्या कॉलेज निवडणुकांवर प्रदीर्घ काळ वर्चस्व गाजवणाऱ्या एका ग्रुपला पाणी पाजण्यात महाजन-मुंडे गटाच्या मसलती यशस्वी ठरल्या होत्या. युतीच्या राजकारणाची ओळख समाजाला झाली आणि युतीच्या राजकारणाचं बीज पेरलं गेले.
गोपीनाथराव कॉलेजमधली पहिलीवहिली निवडणूक हरले; पण त्यामुळे त्यांच्या पुढच्या चळवळीच्या आणि आंदोलनांच्या राजकारणाला जशी कुठेच बाधा आली नाही; तशीच पुढच्या दहा वर्षांतच लढवलेल्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभव पदरी आल्यानंतरही त्यांच्या राजकारणाचा अबलख वारू कोणी रोखू शकलं नाही. दरम्यानच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतनं श्रीपती शास्त्री यांनी गोपीनाथरावांना तावून -सुलाखून बाहेर काढलं होतं. त्याच काळात गोपीनाथरावांनी अखिल भारतीय विद्याथीर् चळवळीचा ओनामा जाणून घेतला होता. पुढे देशात आलेल्या आणीबाणीच्या विरोधातही मराठवाड्यात गोपीनाथराव, प्रमोद महाजन सातत्याने कार्यरत होते. त्यामुळेच आणिबाणीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पहिल्या विधानसभेची उमेदवारी त्यांना १९७८ मध्ये मिळाली होती. तिाथं नशिबाची साथ त्यांना मिळाली नाही. पण पुढे दोन-अडिच वर्षांतच 'जनता पाटीर्' फुटली आणि 'भारतीय जनता पाटीर्' नावाचा नवा पक्ष जन्माला आला. या नव्या पक्षाकडे आपल्या युवक संघटनेची म्हणजेच 'भारतीय जनता युवा मोर्च्या'च्या कारभाराची सूत्रं सोपवण्यासाठी 'गोपीनाथ मुंडे' हा आदर्श पर्याय उभाच होता.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

या लेखात संदर्भ आणि नोंदी सुमारे आजमितीला १०७ आहेत. या लेखातील प्रत्येक वाक्य एखाद्या वृत्तपत्रातील अथवा ब्लॉगवरुन घेण्यात आल्यासारखे वाटते. http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87&oldid=1015351 या ठिकाणी कॉपी-पेस्ट साचा लावला होता परंतु त्यावर काही इलाज केला गेला नाही. उलट हा साचा काढून टाकून त्याचा दुवा केला गेला. सदस्य:Nmisal यांचे योगदान पाहिल्यास या एका राजकीय नेत्या वरच आहे. त्यामुळे उद्देश शोधणे आवश्यक आहे. पुढील काम प्रचालकांचे आहे. सचिन २२:३८, २८ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

हा लेख सध्या विस्तारला / बदलला जात आहे. तरीही, आपण या प्रक्रियेस संपादन करून हातभार लावावा अशी इच्छा आहे. मी मराठी विकिपीडियात प्रथमच संपादन करत आहे तर विकिपीडिया:परिचय, संपादन कसे करावे या बाबत माहिती कमी आहे. या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून संपादन करणे , याशिवाय महाराष्ट्रातील जिल्हालेखनास ऐतिहासिक इतिहास योगदान प्रक्रियेस संपादन करून हातभार लावावा अशी इच्छा आहे. Nmisal (चर्चा) १३:३०, २९ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

ह्या पानावरुन मजकूर कॉपी केल्या सारखा वाटतो. विकिकरण आवश्यक. - प्रबोध (चर्चा) ०१:५५, २९ एप्रिल २०१७ (IST)[reply]


ह्या लेखात मोठ्याप्रमाणावर नकल-डकव करुन त्या मजकूरात पुन्हा बदल केले गेले आहेत[संपादन]

मी तपासले तेव्हा वेगवेगळ्या संकेतस्थळांवरून मजकुर नकल-डकव केल्याचे दिसत आहे त्यामुळे नकल-डकव मधल्या कोणी तज्ञानेच याची पुन्हा एकदा तपासणी केल्यास बरे होईल. तसे मी दोन ठिकाणी साचे लावले आहेत आणि ते स्त्रोत मजकूर लेखाच्या मजकूराच्या आधीचे आहेत हे आपण प्रत्येक स्त्रोतावर पाहू शकताच, शिवाय नकल-डकव साठी हा लेख आधीच समोर आला आहे. WikiSuresh (चर्चा) ०१:४५, १४ एप्रिल २०१८ (IST)[reply]