चर्चा:गुरू ग्रहाचे नैसर्गिक उपग्रह

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुरू ग्रहाचे नैसर्गिक उपग्रह हे नाव अजिबात मराठी वाटत नाही. आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ "गुरूचे चंद्र" एवढे म्हटले तरी व्यक्त होईल.--J १६:५२, २८ जून २०१० (UTC)

चंद्र म्हणजेच उपग्रह असे होत नाही. पृथ्वीला एक (नैसर्गिक) चंद्र आहे पण अनेक उपग्रह आहेत.
अभय नातू १७:४४, २८ जून २०१० (UTC)

अजिबात पटण्यासारखे नाही. आजपर्यंत खगोलशास्त्रावर जितके मराठी लेख किंवा पुस्तके वाचली आहेत त्यापैकी एकातही नैसर्गिक उपग्रह असली ओबडधोबड शब्दरचना आढळलेली नाही. मंगळाला फोबस आणि डीमॉस नावाचे दोन चंद्र, गुरूला आयो, युरोपा, गॅनिमीड इत्यादी नावांचे १६ चंद्र, शनीला मायमस, एन्सेलेडस इत्यादी सतरा चंद्र, असेच आजपर्यंत वाचनात आले आहे. त्यामुळे चंद्र हा शब्द हल्ली ज्याला उपग्रह म्हणतात त्या अर्थानेच वापरला जात आलेला आहे. उपग्रह हा फार अलीकडचा शब्द आहे, फार पूर्वीपासून ग्रहांच्या भोवती फिरणार्‍या गोलकांना चंद्रच म्हणत आले आहेत.. काहीही झाले तरी नैसर्गिक उपग्रह ही मराठी शब्दरचना नाही हे नक्की.---J १८:५०, २८ जून २०१० (UTC)

असे असता कृत्रिम उपग्रहांसाठी शब्द सुचवा.
अभय नातू १९:२२, २८ जून २०१० (UTC)

कृत्रिम उपग्रह[संपादन]

मानवनिर्मित उपग्रह. गूगलवर "गुरूचे चंद्र" याचा शोध घेतला तर १४२०० पाने मिळाली. यांतली शंभर पाने तरी ग्रहांच्या उपग्रहांची होती. आणि त्या पानांत त्यांना चंद्र म्हटले होते.--J १४:४८, २९ जून २०१० (UTC)

जर मानवनिर्मित उपग्रह हा शब्दप्रयोग मराठी वाटतो, ओबडधोबड वाटत नाही, तर नैसर्गिक उपग्रह हा शब्दप्रयोग का खटकतो? तार्किक/तांत्रिकदृष्ट्या उपग्रह हा शब्द एखाद्या ग्रहाभोवती नियमित कक्षेत फिरणार्‍या व नियमित आकारमान असलेल्या वस्तूला वापरला जातो. चंद्र हे विशेषनाम आहे व ते रुढ झालेले आहे, तरी याचा अर्थ असा नाही की तोच शब्द वापरला पाहिजे.
गूगलविषयी (अर्थात समस्त लेखकांबद्दलही) पूर्ण आदरभाव ठेवून लिहितो की शंभर जणांनी जर एकच चूक केली तर गूगलला तेच खरे वाटेल. गूगलला तरतमभाव नाही, गूगलचे तर्क information aggretation and collation यातच गुंततात.
अभय नातू १५:४१, २९ जून २०१० (UTC)
ता.क. सहज गंमत म्हणून गुरूचे उपग्रह असे गूगलला विचारताच त्याने १०० (तरी) लेख आणून दाखवले...

गूगलचे जाऊ द्या[संपादन]

आजवर वाचलेल्या अनेक खगोलशास्त्रीय मराठी पुस्तकांत किंवा लेखांत गुरूचे उपग्रह असे वाचल्याचे आठवत नाही. वाचले असते तर ते लगेच खटकले असते, आणि त्या लेखकाला मी कळवले असते. वर्तमानपत्रांतील बातम्यांतही उपग्रहांना चंद्र असेच म्हटलेले सापडेल. ज्या कारणासाठी आपण माणसाच्या शरीरातल्या हृदयाला नैसर्गिक हृदय म्हणत नाही, त्याच कारणासाठी चंद्रांना नैसर्गिक उपग्रह म्हणत नाहीत. एखाद्या जमिनीवर उभ्या असलेल्या झाडाकडे पाहून हे नैसर्गिक झाड आहे असे म्हणणारा माणूस मला अजून भेटलेला नाही.

ता.क. : “गुरूचे उपग्रह”वर मला गूगलवर फक्त ७३ पाने मिळाली, गुरूचे चंद्रवर १४२०० मिळाली होती.---J १६:४३, २९ जून २०१० (UTC)

हे म्हणजे मी मिनोल्टाच्या झेरॉक्स मशीनवर कॉपी काढली, असे म्हणण्यासारखे आहे...किंवा फोर्डने नवीन जीप तयार केली
रूढ शब्द हे नेहमी शास्त्रीयदृष्ट्या अचूक असतातच असे नाही. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह नाही? आपण उपग्रहाला चंद्र म्हणावा कि उपग्रह, यावरुन काथ्याकूट करीत आहोत, पण चंद्र हा उपग्रहाचाच एक नमूना आहे हे माझे म्हणणे आहे.
आपण माणसाच्या शरीरातल्या हृदयाला नैसर्गिक हृदय म्हणत नाही....एखाद्या जमिनीवर उभ्या असलेल्या झाडाकडे पाहून हे नैसर्गिक झाड आहे असे म्हणणारा माणूस मला अजून भेटलेला नाही.
अहो, वाद घालायचाच म्हणून घालता का? :-)
अभय नातू १७:२२, २९ जून २०१० (UTC)
अगदी ताजा कलम - आता नैसर्गिक उपग्रह या शब्दांवर मी हटून बसलेलो नाही, पण चंद्र वापरण्यासाठीचा तुमचा युक्तिवाद मला अजून तरी पटलेला नाही.
अवांतर - गूगलवरील शोधाची गंमत अशी आहे की त्याचे निकाल तुमच्या पूर्वीच्या शोधांवर आधारित असतो तसेच तुम्ही संगणकावर केलेल्या बहुतांश क्रियांवरुन तुम्हाला काय आवडेल, ते गूगल ठरवतो आणि तेच निकाल दाखवतो. <-- यात तुम्हाला सापडलेले (कमी) निकाल ही चूक आहे असे म्हणणे नसून गूगलवर पूर्ण विश्वास नेहमीच टाकू नये ही नम्र सूचना.

मून आणि सेटेलाइट[संपादन]

ऑक्सफ़र्डच्या इंग्रजी शब्दकोशात मून(नाम) या शब्दाचे १० अर्थ दिले आहेत त्यांत सहावा अर्थ The satellite of a planet हा आहे. १६६५ पासून मून हा शब्द या अर्थाने वापरला जात असतो. कोशात पुढे मिल्टनची एका काव्यपंक्ती उद्‌धृत केली आहे. And other Suns...With thir(तथालिखित) attendant Moons वगैरे. याचा अर्थ चंद्र म्हणजे केवळ चंद्रमा नव्हे तर ग्रहाचा उपग्रहसुद्धा. म्हणजे मराठीतच नाही तर इंग्रजीतही गुरूच्या तथाकथित नैसर्गिक उपग्रहांना "मून्ज़ ऑफ़ द जुपिटर" म्हणणे शंभर टक्के उचित आहे. सेटेलाइट हा शब्द इंग्रजी भाषेत अन्य अर्थाने १५४८ पासून आहे, पण १६६५ सालापासून त्या शब्दाला ’अंतराळातील मोठ्या खवस्तूभोवती फिरणारी त्यामानाने छोटी खवस्तू’ असा अर्थ मिळाला. --J १६:५१, १ जुलै २०१० (UTC)