चर्चा:क्वांटास

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्वांटास एरवेझ पानावरून मजकूर येथे हलवला

क्वांटास एरवेझ ही ऑस्ट्रेलियास्थित जगातील प्रमुख विमानकंपनीसेवा आहे.[१] क्वीन्सलँड अँड नॉर्दर्न टेरिटोरी एरियल सर्व्हिसेसचे क्वांटास हे संक्षिप्त रूप आहे. क्वांटासला फ्लाइंग कांगारू असे टोपणनाव आहे. क्वांटास ही आस्ट्रेलियाची जगातील दोन क्रमांकाची सर्वात जुनी आणि सर्वात मोठी विमान सेवा आहे.[२] या कंपनीची इ.स. १९२०मध्ये देशांतर्गत विमानसेवा तर इ.स. १९३५मध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली. क्वांटासचे मुख्यालय सिडनीच्या मॅस्कॉट या उपनगरात आहे. तसेच सिडनी विमानतळ हा मुख्य वाहतूकतळ आहे. ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत विमानसेवेचा ६५% तर आंतरराष्ट्रीय सेवेचा १८.७% भाग क्वांटासकडे आहे.

इतिहास[संपादन]

क्वांटासची स्थापना १६ नोव्हेंबर, इ.स. १९२० रोजी क्वीन्सलॅंडच्या विन्टन शहरात क्वीन्सलँड ॲन्ड नॉर्दर्न टेरिटोरी एरियल सर्व्हिसेस लिमिटेड या नावाने झाली.[३] या कंपनीचे पहिले विमान अॅव्हरो ५०४के प्रकारचे होते. मे, इ.स. १९३५ मध्ये डार्विन ते सिंगापूर हे पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण होते. जून, इ.स. १९५९मध्ये क्वांटासने बोईंग ७०७-१३८ प्रकारच्या जेट विमानाचा आपल्या ताफ्यात समावेश केला.[४]

मुख्यालय[संपादन]

क्वान्टास एअरवेजचे 'क्वान्टास सेंटर' या नावाचे मुख्यालय, न्यू साऊथ वेल्सच्या उपनगरात ब्वाटनी शहराचे उपसागरात आहे.[५] सन १९२० मध्ये क्वीन्सलँड ॲन्ड नॉर्दर्न टेरिटरी एरियल सर्व्हिसेसचे लिमिटेडचे मुख्यालय क्वीन्सलँडमध्ये होते. सन १९२१ मध्ये लोंगरिच क्वीन्सलँडचे मुख्यालय सन १९३० मध्ये ब्रिस्बेन येथे स्थानांतरित झाले. सन १९५७ मध्ये सिडनीच्या हंटर स्ट्रीटवर कोन्ट्रास हाऊस उघडले. क्वान्टास एअरवेजने ऑस्ट्रेलियाचे मूळचे आदिवासी तसेच टॉरस राज्याच्या बेटावरील रहिवासी यांच्याशी नेहमीच सुसंवाद साधलेला आहे. क्वान्टास एअरवेजने सन २००७ पासून जवळजवळ १० वर्षे या समाजातील १ ते २ % जनतेला एअरवेजच्या कामासाठी सामावून घेतलेले आहे. त्यासाठी एक त्रयस्थ व्यक्ती नियुक्त केली आहे आणि त्याच्यावर ही संपूर्ण जबाबदारी टाकली आहे. क्वान्टास एअरवेजने आदिवासींचे कलागुण जोपासले आहेत. तसेच त्यासाठी मदतही केली आहे. सन १९९३ मध्ये क्वान्टास एअरवेजने 'हनी, ॲन्ट ॲन्ड ग्रासहॉपर' नावाचे पेंटिंग मध्य ऑस्ट्रेलियाच्या जंगलात खरेदी केले. क्वान्टास एअरवेजने हे पेंटिंग न्यू साऊथ वेल्सच्या आर्ट गॅलरीला थोड्या दिवसासाठी दिले आहे. क्वान्टास एअरवेजने सन १९९६ मध्ये या आर्ट गॅलरीला आणखी ५ पेंटिगे दिली. क्वान्टास एअरवेजने या पूर्वीही या आदिवासी कलावंतांना प्रोत्साहित करून समर्थनही दिले आहे. क्वान्टास एअरवेजने फार पूर्वी म्हणजे सन १९६७ मध्ये अमेरिकेच्या प्रेक्षकांसाठी दूरचित्रवाणीनवर एक जाहिरातवाजा कार्यक्रम चालू केला होता, तो अनेक दशके चालला. त्यात एका कावळ्याला दाखविले होते. अनेक अमेरिकन ऑस्ट्रेलियात येतात पण ते क्वान्टास एअरवेजची घृणा करतात असे तक्रारीचे सूर या जाहिरातीत उमटले होते.[६][७][८][९]. क्वान्टास एअरवेज ही ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय रग्बी टीमची मुख्य प्रायोजक आहे. क्वान्टास एअरवेज ऑस्ट्रेलियाच्या ससेक्स फुटबॉल टीमलाही प्रायोजित करते. दि. 26-12-2011 रोजी क्वान्टास एअरवेज ने आस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडूंच्या प्रवासी वाहतुकीसाठीचा ४ वर्षाचा करार केलेला आहे.

क्वान्टास एअरवेजच्या सहकारी कंपन्या[संपादन]

क्वान्टास एम्पायर एअरवेज इंटरनॅशनलचे रोज बे येथे येत असलेले विमान (सी .१९३९)
  1. ऑस्ट्रेलिया एशिया एअर
  2. इंपल्स
  3. ऑस्ट्रेलियाई
  4. क्वान्टास लिंक
  5. जेट स्टार
  6. नेटवर्क
  7. जेट कनेक्ट

नवीन पोषाख[संपादन]

पॅरिसमध्ये राहणाऱ्या मार्टिन ग्रँट या ऑस्ट्रेलियन डिझाईनरने क्वान्टास एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पोषाख तयार केला होता. क्वान्टासने हा जनतेला दाखविला असता, पोषाख शरीरावर अतिशय घट्ट बसत असल्या कारणाने कर्मचारी नाराज झाले. अंगावर असे घट्ट कपडे असले तर काम करताना त्रास होतो हा त्यांचा मुद्दा होता.

संदर्भ[संपादन]

  1. ^ (इंग्लिश भाषेत) http://web.archive.org/web/20140612205811/http://atwonline.com/finance-data/qantas-plans-early-repayment-debt. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ (इंग्लिश भाषेत) http://archive.is/Qn0w. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ (इंग्लिश भाषेत) http://archive.is/Qn0w. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.cleartrip.com/flight-booking/qantas-airways-airlines.html. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.qantas.com.au/travel/airlines/contacts/global/en. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.webcitation.org/6DuwJ1j8j. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.webcitation.org/6Duw5Lk3Z. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ (PDF) (इंग्लिश भाषेत) http://www.qantas.com.au/infodetail/about/investors/preliminaryFinalReport13.pdf. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ (PDF) (इंग्लिश भाषेत) http://www.qantas.com.au/infodetail/about/investors/preliminaryFinalReport14.pdf. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)