चर्चा:काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Africa dosent have any natural habitat of Tigers. So tigers dont exist there at all- Ref- book of indian animals by BNHS oxford press-

याप्रमाणे बदल केलेले आहेत. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:०४, २ मे २००८ (UTC)

ब्रम्हपुत्रा नव्हे तर ब्रम्हपुत्र[संपादन]

माझ्या ज्ञानाप्रमाणे स्थानिक लोक ह्या नदिच्या नावाचा उच्चार ब्रम्हपुत्र असा करतात. क्रुपया ह्यानुसार लेखात योग्य ते बदल करावेत (मला ते करायचा अधिकार नाही म्हणून)


आनंद, विकिपीडियावर स्थानिक उच्चारांना प्राधान्य द्यायचे सर्वसाधारण धोरण असले तरीही काही वेळा त्यास अपवाद केला जातो. उदा. पार्‍ही असा स्थानिक उच्चार असलेल्या Paris चे मराठीतील शीर्षक पॅरिस असेच ठेवले जाते. इतरही अनेक उदाहरने देता येतील.. जसे बंगळूर, ग्वाल्हेर, इराण, सिंगापूर. यामागे कारण एवढेच की हे शब्द मराठी भाषेत त्यांच्या-त्यांच्या विशिष्ट उच्चारात इतके रुळून गेले आहेत की बहुतांश मराठीभाषिक याखेरीज वेगळा उच्चार करताना दिसत नाहीत. त्यामुळे अशा अपवादात्मक शीर्षकांत मराठीतील प्रमाण उच्चार मुख्य शीर्षक मानला जाऊन स्थानिक उच्चार पुनर्निर्देशांमध्ये वापरतात.
ब्रह्मपुत्र’ असा स्थानिकांचा उच्चार असला तरीही त्याचे कारण असे की ते या नदीला (जिला बहुसंख्य मराठीभाषिक ब्रह्मपुत्रा नदी म्हणून ओळखतात) ’ब्रह्मपुत्र नद’असे पुल्लिंगी नाम मानतात. इतरही उदाहरणे ’शोणभद्र’, ’दामोदर’ हे स्थानिकांमध्ये ’नदी’ नसून ’नद’ आहेत. परंतु मराठीत (माझ्या माहितीप्रमाणेतरी) ’नदी’हा स्त्रीलिंगी शब्दच वापरला जातो. त्यामुळे ’ब्रह्मपुत्रा नदी’, ’शोणभद्रा नदी’ असे उल्लेख मराठीत केले जातात.
चु.भू. द्या.घ्या.
--संकल्प द्रविड (चर्चा) ०५:५०, २९ जुलै २००८ (UTC)

सहमत.

मूळ उच्चाराचा लेखात उल्लेख असेल तर वाचकांच्या ज्ञानात भर पडेल. परंतु मराठीत रुळलेले उच्चार अथवा व्याकरण दृष्ट्याबरोबर जे असेल तेच असू द्यावे. अजयबिडवे ०८:१३, २९ जुलै २००८ (UTC)