चरक
चरक जन्म इ.स.पू. ३०० हे एक आयुर्वेदावरील प्रमुख योगदानकर्ते होते. भारतात पूर्वी त्यांचे नाव गाजत होते. त्यांचा उल्लेख कधी कधी शरीरशास्त्राचे पितामह म्हणून होतो.
[संपादन] आचार्य चरक व आयुर्वेद
'चरक' हे अभिधान 'फिरस्ते विद्यार्थी' किंवा 'फिरस्ते वैद्य' यांना लागु होते. चरकाच्या भाषांतराप्रमाणे, आरोग्य व रोग हे पूर्वनिर्धारीत नसतात व आयुष्य हे मानवी प्रयत्न व विशिष्ट दिनचर्येने व ऋतुचर्येने वाढविल्या जाऊ शकते. भारतीय परंपरेनुसार व आयुर्वेद प्रणालीनुसार, 'रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा, तो होउच न देणे कधीही श्रेयस्कर' असे ठरविण्यात आले आहे.यात दिनचर्या बदलविणे, व निसर्गाशी व चारही ऋतुंशी ती जुळविणे हे महत्त्वाचे मानले आहे. याने आरोग्य राखले जाते. आचार्य चरकांनी केलेली काही विधाने खाली दिलेली आहेतः
- वैद्य जो रुग्णाच्या शरीरात ज्ञानाचा दिवा व ठोस आणि योग्य समजुती घेउन जाऊ शकत नाही तो रोगांवर कधीच उपचार करू शकत नाही. त्याने, वातावरण, इत्यादी, रोगांवर परिणाम करणाऱ्या सर्व बाबींचा अभ्यास केला पाहिजे व मगच त्याचेवर उपचार करावेत. (झालेल्या) रोगास दुरुस्त करण्यापेक्षा त्याचे निर्माणावर प्रतिबंध लावणे जास्त महत्त्वाचे आहे.
त्याने चरक संहितेत दिलेले आज दुर्लक्षित होत असणारे हे शेरे, अनिवार्य म्हणून समोर येतात.या संहितेत असे अनेक शेरे आहेत जे आजही आदरास पात्र आहेत. त्यातील काही शरीरशास्त्र,अर्भकशास्त्र इत्यादी क्षेत्रातील आहेत.
चरक हा पचन पचनसंस्था व प्रतिकारशक्ति हे विचार प्रस्तुत करणारा प्रथम वैद्य होता. शरीराची क्रिया ही मुख्यत्वेकरुन तीन दोषांवर अवलंबुन असते. वात , पित्त व कफ. हे दोष, खाल्लेल्या अन्नावर धातुंची (रक्त चामडी व अस्थिमज्जा क्रिया झाल्याने उत्पन्न होतात.
सारख्याच प्रमाणात अन्न खाल्ले तरी, इतर शरीराचे मानाने, एखाद्या विशिष्ट शरीरात, दोष उत्पन्न होतात. म्हणुनच प्रत्येक शरीर हे दुसऱ्या शरीरापेक्षा वेगळे आहे.उदाहरणादाखल,ते वजनी, सुदृढ वा उर्जामय असते.
या दोषांचे संतुलन बिघडले असता रोग उत्पन्न होतात. हे दोष साम्यावस्थेत आणण्यासाठी त्याने औषधी सांगीतल्या.त्यास, शरीरातील जंतुंचे ज्ञान होते तरीही त्याला त्याने विशेष महत्त्व दिले नाही.
चरकास अनुवांशिकीलिंगनिदानाबाबत???? ज्ञान होते. उदाहरणार्थ, त्यास अर्भकाचे लिंग ठरविणाऱ्या बाबी माहित होत्या. पंगुत्व वा अंधत्व हे अर्भकात उद्भवणारे दोष हे माता वा पित्यातील दोष नसुन ते मातापित्यांच्या रज वा वीर्य यामुळे उद्भवणारे दोष आहेत असे त्याचे म्हणणे होते (जी आज सर्वमान्य बाब आहे).
चरकाने संपूर्ण शरीरशास्त्राचा व मानवी अवयवांचा अभास केला. त्याने शरीरात दातांसह हाडांची संख्या ही ३६० सांगीतली.हृदय म्हणजे एक पोकळी असते असे त्याचे चुकिचे अनुमान होते पण त्याने हृदयास नियंत्रण केंद्र मानले ते सर्वथा बरोबर होते.त्याने प्रतिपादन केले की, हृदय हे १३ मुख्य वाहिन्यांद्वारे संपूर्ण शरीराशी जोडले आहे.याव्यतिरीक्त, तेथे न मोजता येण्याजोग्या वेगवेगळ्या आकाराच्या नसा आहेत ज्या उतीला अन्नरस पुरवितात व टाकाउ पदार्थ बाहेर जाण्यास जागा करून देतात.त्याने असेही नमुद केले की या प्रमुख वाहिन्यांस(नसा) कोणताही अडथळा आल्यास ती, शरीरात रोगोत्पत्ती वा व्यंग निर्माण करते.
जुने वैद्य अत्रेय व अग्नीवेश यांचे मार्गदर्शनाखाली इ.स.पू. ८व्या शतकात, लिहिल्या गेलेल्या विश्वकोषिय पद्धतीच्या लेखनात चरकाने सुधारणा करून 'चरक संहिता' म्हणून पुनर्लेखन केले.त्यास पुष्कळ प्रसिद्धी मिळाली.गेली दोन शतके आयुर्वेद या विषयावर त्याचे हे लेखन प्रमाण मानल्या जाते आणि अरबी भाषा व लॅटीन यासह अन्य विदेशी भाषांमध्येही त्याचे भाषांतर झाले आहे.
[संपादन] योगदान
चरक परंपरेप्रमाणे,पुनर्वसु अत्रेय या ऋषिंच्या शिष्यांनी औषधीशास्त्राच्या सहा शाखा निर्माण केल्या.त्यांचे प्रत्येक शिष्य अग्नीवेश, भेल, जातुकर्ण, पाराशर, हरीत,क्षरपाणि यांनी संहिता निर्माण केल्या. या सर्वांत, अग्नीवेश याने निर्माण केलेली संहिता ही सर्वश्रेष्ठ होती. हीच अग्नीवेश संहिता नंतर,चरकाने सुधारणा केल्यावर चरक संहिता म्हणून प्रसिद्ध झाली.या चरक संहितेत नंतर दृढबल ऋषिंनी सुधारणा केल्या.
परंपरेप्रमाणे व चरकानुसार, आयुर्वेद हा खालील सहा शाखांमध्ये विभागण्यात आला आहे:
चरक संहिता ही खालील ८ विभागात असून त्यात एकूण १२० अध्याय आहेतः
- सुत्र स्थान
- निदान स्थान
- विमान स्थान
- शरीर स्थान
- इंद्रिय स्थान
- चिकित्सा स्थान
- कल्प स्थान
- सिद्धी स्थान
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे. |