चकली
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
चकली हा विशेषकरून दीपावलीमध्ये केला जाणारा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. चकली भाजणीपासून बनवतात.
तांदूळ, पोहे, उडीद डाळ व चणाडाळ इत्यादी घटकपदार्थ भाजून चकलीची भाजणी बनवली जाते. या भाजणीत काही वेळा जिरे व धणेही घातले जातात. भाजणी दळून बनवलेल्या भाजणीच्या पिठाची कणीक मळतात. या कणकेचे गोळ्यांपासून सोर्या किंवा चकलीचे यंत्र वापरून चकल्या पाडतात व त्या गरम तेलात तळतात.
चित्रदालन [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |