घोणस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

घोणस

भारतातील चार प्रमुख विषारी सापांपैकी एक. याला इंग्रजीत रसेल्स वायपर असे म्हणतात. याचे शास्त्रीय नाव डाबोया रसेली असे आहे. हा साप भारताच्या मोठ्या भूभागावर आढळतो. मुख्यत्वे ग्रामीण भाग तसेच जंगले हा साप पसंत करतो. अतिशय सुंदर अश्या या सापाला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे अंगावरील साखळीसारख्या दिसणार्‍या तीन समांतर रेषा. हा साप हिरवा, पिवळा, हलका करडा रंग व इतर अनेक छटांमध्ये आढळत असल्याने एक ठराविक रंगातच दिसेल असे सांगता येत नाही. या सापाचे वैशिठ्य म्हणजे याचे विषाचे दात तोंडात दुमडू शकतो. सावजाला एकदा विषाने मारल्यानंतर बहुतेक सापांना शिकार खाताना विषाचे दात अडचण बनतात. परंतु उत्क्रांती मध्ये या सापाने आपले विषाचे दात दुमडून घेण्याची कला अवगत केली आहे. त्यामुळे कधी कधी हा साप चावताना विषारी दातांचा उपयोग करीत नाही. याला कोरडा चावा असे म्हणतात

एखाद्या कुकरच्या शिट्टी प्रमाणे याचे फुत्कारे असतात. या सापाचे वैशिठ्य म्हणजे पोटामध्ये अंडी उबवतो व पिल्ले अंड्यातून बाहेर आल्यानंतर बाहेर काढतो. त्यामुळे कित्येकांचा असा समज आहे की हा सस्तन प्राण्यांप्रमाणे हा साप पिल्लांना जन्माला घालतो.


[संपादन] विषाचे परिणाम

घोणस

याचे विष हे अतिशय जहाल आहे. याचे विष मुख्यत्वे रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला चढवते. चावल्यानंतर रक्तातील गुठळ्या करु शकणा‍र्‍या प्रथिनांचा नाश होतो. त्यामुळे चावल्यानंतर काही वेळातच भळाभळा न थांबणारे रक्त जखमेतून वहाण्यास सुरु होते. अजून थोड्या वेळाने नाकपुड्या, कानातून व गुदद्वारातून रक्त येणे सुरु होते. विषावरती प्रतिविषाचे औषध न मिळाल्यास एक दिवसात म्रुत्यू ओढावू शकतो. हा साप चावल्यानंतर जखमे भोवती कोणत्याही प्रकारची पट्टी लावू नये. असे केल्यास रक्त साखळून चावलेला भाग कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. हा साप चावल्यानंतर लवकरात लवकर व्यक्तीला प्रतिविषाचे औषध हा सर्वोत्तम उपाय आहे.