घृष्णेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
घृष्णेश्वर मंदिर

घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शिव मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या पौराणिक ग्रंथात या ठिकाणाचे उल्लेख मिळतात.

मंदिराचे बांधकाम [संपादन]

वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जिर्णोद्धार केला. सध्याचे आस्तित्वात असलेले मंदिर इ.स. १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला.



Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.