ग्रहण
जेव्हा एखाद्या ग्रहाची सावली दुसर्या ग्रहावर अथवा इतर खगोलीय वस्तूवर पडते, तेव्हा पहिल्या ग्रहाने दुसर्या ग्रहाला ग्रहण लावले असे म्हणले जाते.
अनुक्रमणिका |
[संपादन] सूर्यग्रहण
जेव्हा चंद्र, सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा दिसणार्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहणाबद्दल फार पूर्वीपासून नोंदी ठेवलेल्या आढळतात.
सूर्यग्रहण सर्व साधारणपणे अमावास्येला दिसते.
[संपादन] खग्रास सूर्यग्रहण
जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणार्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात.
[संपादन] तेजोवलय (Corona)
खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस, सूर्य चंद्रामागे गेल्यानंतर चंद्राच्या चारही बाजूंनी सूर्याची किरणे दिसतात. यांचा आकार वर्तुळाकार असतो. त्यामुळे या किरणांना तेजोवलय असे म्हणतात.
[संपादन] खंडग्रास सूर्यग्रहण
जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणार्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात.
[संपादन] कंकणाकृती सूर्यग्रहण
या स्थितीत सूर्य पृथ्वीपासून जास्त जवळ असतो व चंद्र जास्त दूर असतो. त्यामुळे चंद्रबिंब सूर्यबिंब पूर्णपणे झाकण्यास असमर्थ ठरते. त्यामुळे सूर्यबिंबाचा आकार बांगडीसारखा दिसतो.
[संपादन] चंद्रग्रहण
जेव्हा पृथ्वी, सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण पौर्णिमेलाच् दिसते.
[संपादन] अधिक्रमण
जेव्हा एखादा ग्रह, सूर्याच्या अथवा दुसर्या एखाद्या ग्रहाच्या पृथ्वीसापेक्ष कक्षेत येतो, तेव्हा दिसणार्या स्थितीला अधिक्रमण असे म्हणतात. आपल्याला (पृथ्वीवरून) फक्त बुध व शुक्र यांचीच अधिक्रमणे दिसतात. शुक्राची अधिक्रमणे खूपच दुर्मिळ असतात. इ.स. २००४ साली शुक्राचे अधिक्रमण झाले होते. ते इ.स. २०१२ मध्ये परत होईल. पण त्यानंतर ते इ.स. २११२ सालीच दिसेल.
[संपादन] बाह्य दुवे
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |