गोविंदराव पटवर्धन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोविंदराव विठ्ठल पटवर्धन
जन्मनाम गोविंदा,गोंदया
अन्य नाम गोविंदराव
जन्म २१ सप्टेंबर १९२५
गुहाघर
मृत्यु

३१

जानेवारी १९९६
शैली भारतीय शास्त्रीय वादन
व्यवसाय ३३ वर्ष मुंबई पोलीस खात्यात नोकरी आणि हार्मोनियम आणि पायपेटी वादन
वाद्ययंत्र हार्मोनियम व पायपेटी


गोविंदराव पटवर्धन एक उत्कृष्ट ऑर्गनवादक होते.त्यांच्यासंबधी ऐकलेले काही प्रसंग: १) एकदा कोकणात काही वर्षापूर्वी एक नाटक होतं साथीला गोंविंदराव होते आणि वयाच्या पंच्याहत्तरीत असलेले छोटा गंधर्व गायला आले होते तेव्हा एका पदाच्या वेळी गोविंदराव आणि तबलजी गंधर्वांना कैक वेळ समेवर यायलाच देत नव्हते त्यावर छोटा गंधर्व गोविंदरावांना म्हणाले, "अरे गोविंदा माझं वय पंच्याहत्तर आहे आता मी दमलोय आता थांब" गंधर्वांची ही वाक्य गोविंदरावानी ऑर्गनवर जशीच्या तशी उतरवली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. २)पूर्वी नाटकं उघड्यावर आणि बत्तीच्या उजेडात होत. असंच एका उत्सवाच्या प्रसंगी नाटकाचं आयोजन करण्यात आलं साथीला गोविंदराव होते साधारण दहाचं नाटक पण साडेनऊच्या सुमारास होत पण अचानक पाऊस सुरू झाला सहाजीकच नाटक रद्द झालं त्यावर कोणीतरी म्हणालं गोविंदराव "तुमचा ऑर्गनवादनाचा कार्यक्रम देवळात करा" ते गोविंदरावानी मान्य केलं आणि हा त्यांचा कार्यक्रम तब्बल पहाटे साडेतीन वाजेपर्यंत रंगला.

बाह्य दुवे[संपादन]