गूळ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे. |
उसाचा रस उष्णतेने आटवून तयार केलेला लालसर पिवळ्या रंगाचा एक पदार्थ. हा गोड असतो. गरम असलेला व आटवलेला उसाचा रस थंड होण्यापूर्वी साच्यात ओततात. त्यामुळे गुळाच्या ढेपीला साच्याचा आकार येतो. ज्या ठिकाणी उसाचा रस काढून त्याचा गूळ तयार करतात त्या जागेस 'गुऱ्हाळ' असे म्हणतात. खाद्यपदार्थास गोड चव येण्यासाठी गुळाचा वापर करतात. साखरेचा शोध लागण्यापूर्वी, पक्वान्ने बनविण्यासाठी भारतात गूळ वापरला जाई. आजही, भारतीय स्वयंपाकघरांत गूळ ही एक आवश्यक बाब आहे.
[संपादन] प्रकार
उसाच्या जातीवरून तसेच तयार गुळाच्या आकारावरून गुळाला वेगवेगळी नावे पडली आहेत:
- कोल्हापुरी गूळ
- काळा गूळ
- बट्टीचा गूळ
- चिक्कीचा गूळ
- गुळाची भेली/ढेप/रवा
- गुळाचा खडा
बाजारात साधारणपणे मिळणाऱ्या रासायनिक गुळांत कॉस्टिक सोडा, ऑक्झॅलिक अॅसिड, फॉस्फरिक अॅसिड, बेन्झीन वगैरे रसायने घातलेली असल्याने, शक्य असल्यास सेंद्रिय गूळ घ्यावा.