गिलगीट-बाल्टिस्तान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गिलगिट-बाल्टिस्तान (उर्दू:گلگت - بلتستان, बाल्टी भाषा: གིལྒིཏ་བལྟིསྟན) हा पाकिस्तानने बळकावलेला काश्मीरचा भाग आहे. याच्या पश्चिमेस पाकिस्तानचा पख्तुनख्वा प्रांत, उत्तरेस अफगाणिस्तानचा वखान प्रांत, पूर्व आणि ईशान्येस चीन, दक्षिणेस आझाद काश्मीर आणि भारताचे जम्मू आणि काश्मीर राज्य आहेत.

या प्रांताचा विस्तार ७२,९७१ किमी इतका असून येथील लोकसंख्या १० लाखाच्या आसपास आहे. याचे प्रशासकीय केंद्र गिलगिट येथे आहे.

या प्रांतास पूर्वी उत्तर भाग (उर्दू: شمالی علاقہ جات, शुमाली इलाके जाट) असे नाव होते.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.