गिरीश कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गिरीश कुलकर्णी
जन्म गिरीश पांडुरंग कुलकर्णी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट (अभिनय, पटकथा, निर्मिती)
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट वळू,
देऊळ

गिरीश कुलकर्णी (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा मराठी चित्रपटांतील अभिनेता, पटकथाकार, निर्माता आहे. याने अभिनय केलेले वळू, देऊळ इत्यादी चित्रपट विशेष गाजले आहेत.

जीवन[संपादन]

गिरीश कुलकर्णी याने लातूरहून यंत्र अभियांत्रिकीचा डिप्लोमा अभ्यासक्रम केला [१]. लातूरमध्ये शिकत असताना तो नाटकस्पर्धांत भाग घेत असे. डिप्लोमा झाल्यानंतर त्याने एका खासगी कंपनीत नोकरी पत्करली. मात्र काही काळानंतर नोकरी सोडून त्याने लेखनात कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला [१].

कारकीर्द[संपादन]

चित्रपट-कारकीर्द[संपादन]

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा सहभाग टिप्पणी
इ.स. २००८ वळू मराठी अभिनय (पात्र: "जीवन")
पटकथा
निर्मिती
गारूड हिंदी अभिनय लघुपट
इ.स. २००९ गाभ्रीचा पाऊस मराठी अभिनय (पात्र: "कृष्णा")
गंध मराठी अभिनय मंगेश
विहीर मराठी पटकथा
इ.स. २०११ देऊळ मराठी अभिनय (पात्र: "केश्या")
पटकथा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तसेच सर्वोत्कृष्ट पटकथालेखनाचा (सर्वोत्कृष्ट संवादलेखनाचा) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (इ.स. २०११)[२]
इ.स. २०१२ मसाला मराठी अभिनय (पात्र: "रेवण पाटील")
कथा
पटकथा
संवाद
निर्मिती
पुणे ५२ मराठी अभिनय (पात्र: "अमर आपटे")
संवाद
निर्मिती

पुरस्कार[संपादन]

  • इ.स. २०११ : देऊळ चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार [२].
  • इ.स. २०११ : देऊळ चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट पटकथालेखन (सर्वोत्कृष्ट संवाद) पुरस्कार [२].

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ a b सखदेव, प्रणव. "सर्जनशील 'गिरीश कुलकर्णी'". २८ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ a b c "मराठी चित्रपटांवर राष्ट्रीय पुरस्कारांचा 'कळस'". Archived from the original on ४ ऑगस्ट २०१४. १५ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]