खाशाबा जाधव
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| वैयक्तिक माहिती | |||||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| पूर्ण नाव | खाशाबा दादासाहेब जाधव | ||||||||||||||
| राष्ट्रीयत्व | मराठी, भारतीय | ||||||||||||||
| निवासस्थान | रेठरे, कराड तालुका, सातारा जिल्हा, महाराष्ट्र | ||||||||||||||
| जन्मदिनांक | जानेवारी १५, इ.स. १९२६ | ||||||||||||||
| मृत्युदिनांक | ऑगस्ट १४, इ.स. १९८४ | ||||||||||||||
| खेळ | |||||||||||||||
| देश | भारत | ||||||||||||||
| खेळ | कुस्ती | ||||||||||||||
| कामगिरी व किताब | |||||||||||||||
| ऑलिंपिक स्तर | इ.स. १९५२ हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा': ५२ किलो. फ्रीस्टाइल कुस्ती; कांस्य | ||||||||||||||
|
|||||||||||||||
खाशाबा जाधव (जानेवारी १५, इ.स. १९२६ - ऑगस्ट १४, इ.स. १९८४) हे ऑलिंपिकपदकविजेते मराठी, भारतीय कुस्तीगीर होते. इ.स. १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते.
जाधवांनी इ.स. १९४८ सालातील लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला. इ.स. १९५२ सालातील हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ५२ किलोग्रॅम वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारांतर्गत कांस्यपदक जिंकले.
बाह्य दुवे [संपादन]
- मनसे.ऑर्ग - खाशाबा जाधवांचा अल्पपरिचय (मराठी मजकूर)