खवल्या मांजर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| खवल्या मांजर Paleocene–Recent |
||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||
|
||||||||||
खवल्या मांजर (इंग्लिश: Pangolin, पँगोलिन) हा फॉलिडोटा वर्गातल्या मॅनिडी कुळातील मॅनिस प्रजातीतील सस्तन प्राणी आहे. हा आफ्रिका व आशिया इथल्या उष्णकटिबंधीय भागांमध्ये आढळतो. ज्याची त्वचा खवल्यांनी आच्छादलेली असते असा हा एकमेव सस्तन प्राणी आहे. हे खवले शृंगप्रथिन या पदार्थापासून बनलेले असतात (प्राण्याची नखे व गेंड्याचे शिंगसुद्धा शृंगप्रथिनांपासून बनते).
वर्णन [संपादन]
डोक्याचा वरच्या भाग, पाठ, शरीराचा बाजूचा भाग, संपूर्ण शेपटी व दोन्ही पायांच्या बाजूचा भाग, हे सर्व एकावर एक असलेल्या धारदार खवल्यांनी झाकलेले असतात. खवल्या मांजराच्या पोटावर विरळ व राठ केस असतात. खवल्यांमध्येसुद्धा थोडे केस असतात.[१].
स्वसंरक्षणासाठी खवले मांजर शरीराचे वेटोळे करून घेते. ते आपले खवले उंचावू शकते. असे केले की खवल्यांच्या धारदार कडा बाहेरच्या दिशेला रोखल्या जातात.[२].
संदर्भ व नोंदी [संपादन]
- ↑ प्रेटर, एस.एच. (१९९३). द बुक ऑफ इंडियन अॅनिमल्स. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. आय.एस.बी.एन. 0195621697. १७ डिसेंबर २०११ रोजी मिळवले. (इंग्रजी मजकूर)
- ↑ बर्नी, डेव्हिड (२००३). द कन्साइज अॅनिमल एनसायक्लोपिडिया. किंगफिशर. आय.एस.बी.एन. 0753408147. (इंग्रजी मजकूर)
बाह्य दुवे [संपादन]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |