क्रिकेट विश्वचषक, २०११

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुखपृष्ठ सदर लेखCrystal Clear action bookmark.png
हा लेख ३ एप्रिल, २०११ रोजी मराठी विकिपीडियावरील मुखपृष्ठ सदर होता.
कृपया,मुखपृष्ठ/विशेष सदर लेखात संपादन करताना आपल्या बदलांचे स्वरुप बदलांच्या आढाव्यात आठवणीने नमूद करा.
२०११चे इतर मुखपृष्ठ सदर लेख


आयसीसी क्रिकेट विश्वचषक, २०११
2011 Cricket World Cup Logo.svg
अधिकृत लोगो क्रिकेट विश्वचषक, २०११.
तारीख १९ फेब्रुवारी २०११ – २ एप्रिल २०११
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामनेबाद फेरी
यजमान भारत ध्वज भारत
श्रीलंका ध्वज श्रीलंका
बांगलादेश ध्वज बांगलादेश
विजेते भारत ध्वज भारत (२ वेळा)
सहभाग १४ (१०४ देशातून)
मालिकावीर भारत युवराजसिंग
सर्वात जास्त धावा श्रीलंका तिलकरत्ने दिलशान (५००)
सर्वात जास्त बळी पाकिस्तान शहिद आफ्रिदी (२१)
भारत झहीर खान (२१)
अधिकृत संकेतस्थळ आयसीसी विश्वचषक
२००७ (आधी) (नंतर) २०१५

इ.स. २०११ची आय.सी.सी. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा फेब्रुवारी १९ ते एप्रिल २, इ.स. २०११च्या दरम्यान भारत, श्रीलंकाबांगलादेशमध्ये खेळवण्यात आली. चौदा देश भाग घेत असलेल्या या स्पर्धेत ५० षटकांचे एक-दिवसीय सामने खेळण्यात आले.[१] फेब्रुवारी १७ रोजी उद्घाटन सोहळा होउन[२] १९ फेब्रुवारीला पहिला सामना भारतचा ध्वज भारत आणि बांगलादेशचा ध्वज बांगलादेशमध्ये ढाका येथे शेर-ए-बांगला मैदानात खेळला गेला.[३] प्रत्येकी सात संघ असलेल्या दोन गटांत साखळी सामने झाल्यावर त्यांतील सर्वोच्च चार-चार संघानी बाद फेरीत भाग घेतला. एप्रिल २ रोजी मुंबईच्या वानखेडे मैदानात खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्त्वाखाली भारताने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव करीत विश्वविजेतेपद मिळवले. यजमान संघाने विश्वविजेतेपद जिकण्याची ही प्रथमच वेळ आहे.

या विश्वचषकाचे यजमानपद भारत, श्रीलंका आणि बांगलादेश बरोबरच पाकिस्तानलाही मिळणार होते पण २००९मध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर लाहोरमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आय.सी.सी.ने पाकिस्तानकडून यजमानपद काढून घेतले[४] आणि संयोजन समितीचे मुख्यालय लाहोरहून मुंबईला हलवण्यात आले.[५] पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेले १४ साखळी सामने व एक उपांत्य सामना इतर यजमान देशांत खेळण्यात आले.[६] पैकी आठ सामने आणि उपांत्य फेरी भारत तर चार साखळी सामने आणि दोन साखळी सामने प्रत्येकी श्रीलंका आणि बांगलादेशात खेळले गेले.[७]

या स्पर्धेत आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडने इंग्लंडचा ध्वज इंग्लंडचा केलेला पराभव सगळ्यात मोठा धक्कादायक निकाल होता.[८] आयर्लंडच्या केव्हिन ओ'ब्रायनने ६३ चेंडूत ११३ धावा काढीत विश्वचषकांतील सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा मॅथ्यू हेडनचा विक्रम आपल्या नावावार करून घेतला.[९] श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानने स्पर्धेत सर्वात जास्त ५०० धावा काढल्या तर भारताच्या झहीर खान आणि पाकिस्तानच्या शहीद आफ्रिदीने प्रत्येकी सगळ्यात जास्त बळी (२१) मिळवले. युवराजसिंग स्पर्धावीर ठरला.

पात्रता

आयसीसी नियमा प्रमाणे, १० पुर्ण सदस्य स्पर्धेस पात्र आहेत.[१०] तसेच २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळवल्या गेलेल्या पात्रता फेरीतून ४ संघ पात्र झाले.

पात्र संघ

एसीए (४)
एसीए (२)
एसीसी (४)
ईएपी (२)
ईसीसी (३)

मैदान

स्पर्धेच्या मैदानांची माहिती आयसीसीने २ नोव्हेंबर २०१० रोजी मुंबईत प्रसिद्ध केली. श्रीलंकेत स्पर्धेसाठी दोन नवीन मैदान कँडीहंबन्टोटा येथे बांधण्यात आले.[११]

कोलकाता कोलंबो नवी दिल्ली कँडी अमदावाद
इडन गार्डन्स
प्रेक्षक क्षमता: ८२,०००
रणसिंगे प्रेमदासा मैदान
प्रेक्षक क्षमता: ३५,०००
फिरोजशाह कोटला मैदान
प्रेक्षक क्षमता: ४८,०००
मुथिया मुरलीधरन मैदान
प्रेक्षक क्षमता: ३५,०००
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: ५०,०००
Eden Gardens.jpg R Premadasa Stadium.jpg Firoze shah.jpg Sardar Patel Stadium.JPG
चट्टग्राम चेन्नई ढाका
चट्टग्राम विभागीय मैदान
प्रेक्षक क्षमता: २०,०००
एम.ए. चिदंबरम स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: ४६,०००
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान
प्रेक्षक क्षमता: ३५,०००
MAC Chepauk stadium.jpg Ispahani End, Sher-e-Bangla Cricket Stadium.jpg
मुंबई हंबन्टोटा मोहाली नागपूर बंगलोर
वानखेडे स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: ४५,०००
महिंदा राजपाक्षा मैदान
प्रेक्षक क्षमता: ३७,०००
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान
प्रेक्षक क्षमता: ३५,०००
विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान
प्रेक्षक क्षमता: ४५,०००
एम. चिन्नास्वामी स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: ४२,०००
Wankhede-night.jpg LightsMohali.png VCA Jamtha 1.JPG MChinnaswamy-Stadium.jpg
श्रीलंकेतील मैदाने
बांगलादेशातील मैदाने

पंच

स्पर्धेसाठी १८ पंचाची नियुक्ती करण्यात आली: ५ ऑस्ट्रेलिया, ६ आशिया, ३ इंग्लंड, २ न्यू झीलंड व प्रत्येकी १ दक्षिण आफ्रिकावेस्ट इंडीज.

ऑस्ट्रेलिया
न्यू झीलंड
दक्षिण आफ्रिका
पाकिस्तान
भारत
इंग्लंड
श्रीलंका
वेस्ट इंडिज

पारितोषिक रक्कम

क्रिकेट विश्वचषक, २०११ च्या विजेत्याला $ ३० लाख मिळतील, आयसीसीने स्पर्धेसाठी $ १०० लाख ठेवण्याचे जाहीर केले. हा निर्णय २० एप्रिल २०१० रोजी दुबईत झालेल्या आयसीसी बोर्ड मिटींग मध्ये घेण्यात आला.[१२][१३]

चिन्ह

स्पर्धेचा प्रतिनिधी

स्टंपी, क्रिकेट विश्वचषक, २०११
मुख्य पान: स्टंपी

स्टंपी[१४] हा क्रिकेट विश्वचषक, २०११ स्पर्धेचा अधिकृत प्रतिनिधी आहे. त्याला सर्व प्रथम प्रदर्शित कोलंबो, श्रीलंका येथे झालेल्या कार्यक्रमात २ एप्रिल २०१० रोजी करण्यात आले. तो एक १० वर्षाचा तरूण हत्ती आहे, तो खूप निश्चयी तसेच जोशपुर्ण आहे. त्याचे नाव ठरवण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.[१५] अधिकृतपणे नावाची घोषणा २ ऑगस्ट २०१० रोजी करण्यात आली.[१६]

अधिकृत गाणे

मुख्य पान: दे घुमा के

क्रिकेट विश्वचषक, २०११ चे अधिकृत गाणे "दे घुमा के", शंकर-एहसान-लॉय ह्या त्रिकुटाने रचले आहे. हे गाणे हिंदी, बांगला व सिंहलीज भाषेत गायलेले आहे.[१७] हे गाणे शंकर महादेवन आणि दिव्या कुमार ह्यांनी गायलेले आहे. विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन समारोहात हे गाने गायले जाणार आहे.[१८]

प्रक्षेपण

आयसीसीने स्पर्धेचे हक्क ईएसपीएन-स्टार क्रिकेटला २ अब्ज अमेरिकन डॉलरच्या मोबदल्यात विकले. ही स्पर्धा २२० देशात दाखवली जाईल.[१९]

संघ

सर्व संघांनी १९ जानेवारी २०१० पर्यंत १४ खेळाडूंचा संघ जाहीर केला.

सामने

सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+५:३०), श्रीलंका प्रमाण वेळ (यूटीसी+५:३०) व बांगलादेश प्रमाण वेळ (यूटीसी+६)

साखळी सामने

खालील तक्त्यात:[२०]

  • सा = सामने खेळले
  • वि = विजयी
  • सम = समसमान
  • हा = हार
  • अणि = अणिर्नित
  • नेरर = नेट रन रेट
  • गुण = एकुन गुण

प्रत्येक गटातुन पहिले चार संघ उपांत्यपुर्व फेरी साठी पात्र होतील (हिरवा रंग).

रंग माहिती
पहिले चार संघ उपांत्य फेरी साठी पात्र.
साखळी सामन्यात बाद संघ

गट अ


संघ सा वि हा सम अनि गुण नेरर
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १० ०.७५८
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २.५८२
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १.१२३
न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड १.१३५
झिंबाब्वेचा ध्वज झिंबाब्वे ०.०३
कॅनडाचा ध्वज कॅनडा -१.९८७
केनियाचा ध्वज केनिया -३.०४२

गट ब


संघ सा वि हा सम अनि गुण नेरर
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १० २.०२६
भारतचा ध्वज भारत ०.९
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०.०७२
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १.०६६
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश -१.३६१
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड -०.६९६
Flag of the Netherlands नेदरलँड्स -२.०४५

बाद फेरी

उपांत्यपूर्वफेरी उपांत्यफेरी अंतिम सामना
                   
२३ मार्च - बांगलादेश ढाका        
 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान  ११३/०
३० मार्च - भारत मोहाली
 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज  ११२/१०  
 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान  २३१/१०
२४ मार्च - भारत अहमदाबाद
   भारतचा ध्वज भारत  २६०/९  
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया  २६०/६
२ एप्रिल - भारत मुंबई
 भारतचा ध्वज भारत  २६१/५  
 भारतचा ध्वज भारत  २७७/४
२५ मार्च - बांगलादेश ढाका
   श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका  २७४/६
 न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड  २२१/८
२९ मार्च - श्रीलंका कोलंबो
 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका  १७२/१०  
 न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड  २१७/१०
२६ मार्च - श्रीलंका कोलंबो
   श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका  २२०/५  
 श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका  २३१/०
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  २२९/६  

उपांत्य पूर्व फेरी

२३ मार्च २०११
१४:३०
पाकिस्तान Flag of पाकिस्तान ११३/० - ११२/१० वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
२४ मार्च २०११
१४:३०
भारत Flag of भारत २६१/५ - २६०/६ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अमदावाद
२५ मार्च २०११
१४:३०
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका १७२/१० - २२१/८ न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
२६ मार्च २०११
१४:३०
श्रीलंका Flag of श्रीलंका २२९/६ - २३१/० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो

उपांत्य फेरी

२९ मार्च २०११
१४:३०
न्यू झीलंड Flag of न्यू झीलंड २१७/१० - २२०/५ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
३० मार्च २०११
१४:३०
पाकिस्तान Flag of पाकिस्तान २३१/१० - २६०/९ भारतचा ध्वज भारत पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली

अंतिम सामना

२ एप्रिल २०११
१४:३०
श्रीलंका Flag of श्रीलंका २७४/६ - २७७/४ भारतचा ध्वज भारत वानखेडे स्टेडियम, मुंबई

संदर्भ आणि नोंदी

  1. 2011 World Cup Schedule.
  2. "Opening ceremony of 2011 World Cup on Feb 17 in Bangladesh: ICC". 31 December 2010 रोजी तपासले. 
  3. "Final World Cup positions secured", from BBC. 2009-04-17 रोजी तपासले. 
  4. "No World Cup matches in Pakistan". 
  5. World Cup shifts base from Lahore to Mumbai.
  6. "Pakistan counts cost of Cup shift". 
  7. Pakistan nears solution to World Cup dispute.
  8. साचा:Cite
  9. Record-breaking O'Brien sees Ireland stun England | Cricket News | Cricbuzz.com
  10. No Test Cricket For Zimbabwe - ICC.
  11. Venues of 2011 World Cup by ICC Retrieved on 10 March 2010.
  12. Prize Money for ICC Cricket World Cup 2011 confirmed by the ICC. Retrieved on 25 April 2010.
  13. क्रिकेट विश्वचषक २०११च्या बक्षिसाची रक्कम Official site.
  14. 2011 World Cup mascot to be called 'Stumpy' NDTV Cricket. Retrieved on 2 Aug, 2010.
  15. First Look: Mascot for 2011 Cricket World Cup by Rediff Sport. Retrieved on 2 April 2010.
  16. ICC to name ICC Cricket World Cup 2011 mascot on 2 August. ICC. Retrieved on 2 Aug, 2010.
  17. Shankar-Ehsaan-Loy score a hit with World Cup song Hindustan Times. Retrieved on 9 January 2011.
  18. "De ghuma ke... Countdown to World Cup begins today". Indian Express. Retrieved on 9 January 2011.
  19. "List of TV Channels that will be showing ICC Cricket World Cup 2011 Match Live". 
  20. २०११ क्रिकेट विश्वचषक अधिक्रुत संकेतस्थळ. विश्वचषक गुणतालिका. आयसीसी. २६ जुन २०१० रोजी पाहिले

बाह्य दुवे