कौशल इनामदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कौशल इनामदार
Kaushal Inamdar 2008.jpg
कौशल आपल्या कार्यक्रमात गाताना


जन्म ऑक्टोबर २, इ.स. १९७१
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व मराठा, भारतीय
कार्यक्षेत्र पार्श्वगायन, सुगम संगीत
संगीत प्रकार गायन, संगीतकार
कारकीर्दीचा काळ इ.स. १९९६ - चालू
प्रसिद्ध रचना मराठी अभिमान गीत
प्रसिद्ध चित्रपट बालगंधर्व
प्रसिद्ध अल्बम मराठी अभिमान गीत
पत्नी सुचित्रा इनामदार
अपत्ये अनुराग इनामदार
संकेतस्थळ अधिकॄत संकेतस्थळ

कौशल इनामदार (ऑक्टोबर २, इ.स. १९७१; पुणे, महाराष्ट्र - हयात) हा प्रसिद्ध मराठी संगीतकार आहे. याने दूरचित्रवाणी मालिकांची शीर्षकगीते, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, संगीत अल्बम इत्यादी माध्यमांतून संगीत दिले आहे. मराठी अभिमान गीत नावाचा याने संगीत दिग्दर्शन केलेला मराठी गाण्यांचा अल्बम विशेष गाजला.

अनुक्रमणिका

[संपादन] शिक्षण

कौशल इनामदा‍र याने शाळकरी वयात असताना प्रसिद्ध संगीतकार कमलाकर भागवत यांच्याकडून संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्याचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या डी.जी. रूपारेल महाविद्यालयात झाले. तेथे मराठी नाट्यक्षेत्रातील चेतन दातार याच्याशी त्याची भेट झाली. दातारांच्या सहकार्याने पुढील काळात तो नाट्यक्षेत्राकडे वळला. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याने फक्त लिखाण करण्यात आणि संगीत अभ्यासण्यात स्वत:ला व्यग्र करून घेतले.

[संपादन] कारकीर्द

इनामदार आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस जाहिरातींना आणि अल्बमांना संगीत देण्याचे काम करत असे. मराठी अभिमान गीत या इ.स. २०१० साली प्रकाशित झालेल्या मराठी अल्बमाद्वारे तो प्रकाशझोतात आला. यात त्याने शेकडो नामवंत गायकांना, कलाकारांना, ध्वनि-अभियंत्यांना घेऊन मराठी अभिमान गीत तयार केले. हे गीत महाराष्ट्रात खूप गाजले व या अल्बमाद्वारे त्याला चांगलीच प्रसिद्धी लाभली. संगीत देण्यासोबत त्याने स्वतः या अल्बमाची निर्मिती व प्रकाशनव्यवस्था सांभाळली. मराठी अभिमान गीतानंतर त्याच्याकडे अनेक चित्रपट आले. इ.स. २०११ साली प्रदर्शित झालेल्या बालगंधर्व चित्रपटासाठी त्याने संगीतदिग्दर्शन केले. या चित्रपटातील गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या अजिंठा या आगामी चित्रपटासाठीही तो संगीतदिग्दर्शन करणार आहे[ संदर्भ हवा ].

दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांतही त्याचा सहभाग राहिला आहे. झी मराठी दूरचित्रवाहिनीच्या सा रे ग म प या संगीतस्पर्धा कार्यक्रमात त्याने परीक्षक म्हणून काम पाहिले आहे.

[संपादन] चित्रपट

चित्रपटाचे नाव भाषा वर्ष (इ.स.) सहभाग
कृष्णा काठची मीरा (मराठी चित्रपट) मराठी संगीतदिग्दर्शन
आग (मराठी चित्रपट) मराठी संगीतदिग्दर्शन
नॉट ओन्ली मिसेस राऊत मराठी इ.स. २००३ संगीतदिग्दर्शन
अधांतरी (मराठी चित्रपट) मराठी संगीतदिग्दर्शन
रास्ता रोको(मराठी चित्रपट) मराठी संगीतदिग्दर्शन
इट्स ब्रेकींग न्युज(मराठी चित्रपट) मराठी संगीतदिग्दर्शन
हंगामा (मराठी चित्रपट) मराठी संगीतदिग्दर्शन
बालगंधर्व मराठी इ.स. २०११ संगीतदिग्दर्शन

[संपादन] बिगर-चित्रपट अल्बम

चित्रपटाचे नाव भाषा वर्ष (इ.स.) सहभाग
शुभ्र कळ्या मूठभर मराठी संगीतदिग्दर्शन
रात्र भिजली मराठी संगीतदिग्दर्शन
गीतेचा तो साक्षी वदला मराठी संगीतदिग्दर्शन
भावांजली मराठी संगीतदिग्दर्शन
कामना पूर्ती मराठी संगीतदिग्दर्शन
मन पाखराचे होई मराठी संगीतदिग्दर्शन
चाफ्याचे शिंपन मराठी संगीतदिग्दर्शन

[संपादन] वैयक्तिक

कौशल इनामदार याच्या पत्नीचे नाव सुचित्रा असून त्यांना अनुराग नावाचा मुलगा आहे[ संदर्भ हवा ].

[संपादन] बाह्य दुवे



Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये