कोबॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संगणकाकडून कोणतेही काम करून घेण्यासाठी , प्रथम सूचनांची एक यादी प्रोग्रॅमिङ् लॅंग्वेजचा उपयोग करून तयार केली जाते. ह्या यादीला 'प्रोग्रॅम' म्हटले जाते. संगणक ह्या यादीनुसार ठरावीक क्रमाने, ठरावीक क्रिया करून इच्छित काम पार पाडतो. कोबॉल लॅंग्वेज मुख्यत: बिझनेसमधील आकडेमोडीसाठी वापरली जाते. 1959 - 60 मध्ये अमेरिकेतील कॉम्प्युटरच्या क्षेत्रातील लोकांच्या एका समूहाने या भाषेचा शोध लावला. या भाषेत लिहिलेले प्रोग्राम एखाद्या रिपोर्टसारखे असतात. म्हणजे यात वाक्य, परिच्छेद इ.चा समावेश होतो. प्रोग्राम कॉलममध्ये लिहिला जातो. या भाषेतील प्रोग्राम एकच काम पुन्हा पुन्हा करतो, उदा. ऑफिसमधील लोकांच्या दर महा पगाराची आकड्मोड करणे इत्यादी.