कोनी २०१२
| कोनी २०१२ | |
|---|---|
| 220 px | |
| निर्मिती वर्ष | २०१२ |
| भाषा | इंग्लिश |
| दिग्दर्शन | जेसन रसेल |
| संकेतस्थळ | [पूर्ण लघुपट - यूट्यूब अधिकृत संकेतस्थळ] |
कोनी २०१२ ही एक मोहीम आहे , त्या साथी "इनविसिबल चिल्ड्रेन" या संस्थेने तयार केलेला हा एक लघुपट आहे. लघुपटाचा मुख्य उद्देश हा यूगांडा मधील क्रूरकर्मा जोसेफ कोनी यास अटक करणे असा आहे. २०१२ म्हणजे २० प्रसिद्ध व्यक्ति व १२ नेते यांना कोनी बद्दल जागरूक करणे म्हणून "२०१२" हे जोडण्यात आले आहे. या चित्रपटाचा प्रसार वणव्यासारखा झाला, व दहा दिवसात ५ करोड लोकांनी हा लघुपट यू ट्यूब वर पाहिला. बिल गेट्स , रिहाना इत्यादी प्रसिद्ध व्यक्तींनी या चित्रपट रूपी मोहिमेस उघड पाठिंबा दिला आहे. मोहिमेचा भाग म्हणून संस्था अमेरिकेत सर्व ठिकाणी "कोनी २०१२" अशी पोस्टर्स चिकटवण्यास आली आहेत. तसेच कोनी ला थांबण्यासाठी तो आधी लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून त्याला प्रसिद्ध करणे गरजेचे आहे या तत्त्वावर मोहिमेची आखणी करण्यात आली.
| या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी. |
सारांश[संपादन]
या लघुपटात युगांडा मधील लहान मुलांचे कश्या प्रकारे शोषण होते व त्यांच्या हाती राष्ट्र देवून स्वतःच्याच परिवाराला संपवले जाते हे दाखवले आहे. जोसेफ कोनी हा युगांडा मधील मुला-मुलींचे अपहरण करून त्यांना शस्त्रांचे प्रशिक्षण देतो, व सहकार्य न करणार्या मुलांचे चेहरे खराब करतो, ते थांबण्यासाठीचे "इनविसिबल चिल्ड्रेन" संस्थेचे प्रयत्न या चित्रपटात अधोरेखित केले आहेत.
बाह्य दुवे[संपादन]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |