इस्तंबूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(कॉँस्टेन्टिनोपल या पानावरून पुनर्निर्देशित)

इस्तंबूल तुर्कस्तानमधील सगळ्यात मोठे शहर आहे. हे शहर तुर्कस्तानचे आर्थिक तसेच सांस्कृतिक केन्द्र आहे. बॉस्फरसच्या सामुद्रधुनीच्या दोन्ही तीरांवर वसलेले हे शहर एशिया तसेच युरोप या दोन्ही खंडात आहे. जगातील मोठ्या शहरांपैकी हे एकमेव शहरे असे दोन खंडात आहे.

या शहराला प्राचीन काळात बायझेन्टियम तसेच कॉन्स्टेन्टिनोपल या नावांनेही ओळखण्यात येत असे. इ.स. ३३० पासून इ.स. १९२२ पर्यंत सुमारे १,६०० वर्षांच्या कालखंडात हे शहर कोणत्या न कोणत्या साम्राज्याची राजधानी होते. इ.स. ३३०-इ.स. ३९५ दरम्यान इस्तंबूल रोमन साम्राज्याची, इ.स. ३९५-इ.स. १२०४इ.स. १२६१-इ.स. १४५३ दरम्यान बायझेन्टाईन साम्राज्याची, इ.स. १२०४-इ.स. १२६१ दरम्यान लॅटिन साम्राज्याची तर इ.स. १४५३-इ.स. १९५३ दरम्यान ऑट्टोमन साम्राज्याची राजधानी होते.

वैयक्‍तिक साधने