कीर्तन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतभरात संबधीत प्रदेश-भाषा-संप्रदाय-धार्मिक पार्श्वभूमीनुसार किर्तनकार या धार्मिक/अध्यात्मीक व्यक्तीच्या साहाय्यने वेगवेगळ्या पद्धतीने सादर होणारी काव्यसंगिताच्या सभेतील श्रोत्यांना सहभागीकरून घेत भक्तीरसाची निर्मितीकरणाऱ्या परंपरेस कीर्तन असे म्हणतात.

महाराष्ट्रात धार्मिक निमीत्तने होणाऱ्या, नाट्य-अभिनय-नृत्य,काव्य-संगीत-कथा निरूपण इत्यादींच्या सहायाने लोकरंजन करताना श्रोत्यांना भक्तीरस निर्मिती प्रक्रियेत सहभागी करून घेत अध्यात्मीक प्रबोधन साधणाऱ्या एकपात्री प्रयोगाच्या परंपरागत लोककलेस कीर्तन असे म्हणतात.


महाराष्ट्रात पूर्वापार चालत आलेल्या कलापरंपरेत कीर्तनाची परंपरा खूप महत्त्वाची ठरते.

अनुक्रमणिका

[संपादन] शब्द व्यूत्पत्ती आणि व्याख्या, आरंभ

कीर्तन शब्द संस्कृतात 'कीर्त्' या धातुपासून उद्भवला आहे, ज्याचा अर्थ 'गाणे' असा होतो. देवर्षी नारदांची ही कीर्तनाची गादी. भरत महामुनींच्या नाट्य शास्त्रापासून अनेक संकल्पना आणि व्याख्या केल्या गेल्या.

[संपादन] किर्तनाचा इतिहास

नारदमुनींनी कीर्तनाचा आरंभ केला. नारदमुनींनी ते महर्षी व्यासांस शिकवले. व्यास महर्षींनी शुकास शिकवले आणि पुढे त्याचा सर्वत्र प्रसार झाला अशी कीर्तन परंपरा सांगितली जाते..[१]

[१] वस्तुतः 'श्रीहरिकीर्तन' खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले आहे. सर्व लोकांना ईशभक्तीमध्ये रममाण करणे हा याचा उद्देश आहे. अनेक किर्तनकारांनी व किर्तनाने शिवाजीच्या काळात व ब्रिटीशांच्या काळात बरेच जनजागरण घडवुन आणले.

[संपादन] किर्तनाचे प्रकार

नारदीय कीर्तन अणि वैयासिक कीर्तन (महर्षी व्यासानी सुरू केलेले) असे २ कीर्तन प्रकार होते. एक संगीत/नाट्यमय अणि दुसरा गद्यात सांगितला जाणारा असे यातील फरक आहेत. भगवंताचे अणि थोर विभूतींचे गुण गायन व पराक्रम प्रदर्शित करणारा हा प्राचीन कला प्रकार आहे. पुढील काळात नारदीय कीर्तनातून वारकरी, रामदासी, राष्ट्रीय कीर्तन असे वेगळे संप्रदाय निर्माण झाले. पण सर्व भारतात कीर्तन हे थोडा फार बाह्य बदल, फरक झाले तरी त्याचा मूळ गाभा कायम राखून आहे. स्वातंत्र्य चळवळीतसुद्धा कीर्तनकारांनी समाजाच्या जागृतीचे उल्लेखनीय कार्य केलेले आहे.

[संपादन] किर्तनाची अंगे

कीर्तनात मुख्य ५ भाग असतात. सुरवातीस नमन, पूर्वरंग (तत्वज्ञान व अध्यात्मिक चर्चा) नंतर मध्यंतरात नामजप आणि भक्तीगीत, नंतर पूर्वरंगाला साजेसे एखादे कथानक, म्हणजे उत्तररंग किंवा आख्यान आणि शेवटी भैरवी गायन आणि देवाकडे मागणे आणि आरती असते.

कीर्तन ही खरेतर मूलतः एक भक्ति आहे. श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्तिपैकी ही दुसरी भक्ति आहे. "श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पाद्सेवनम्! अर्चनं वन्दनं दास्यं, सख्यं आत्मनिवेदनम!" अशा ९ भक्तिपैकी कीर्तन हे एक पूर्वी प्रसार, प्रचार, लोकशिक्षण, आणि समाजप्रबोधनाचे उत्तम माध्यम होते. काळाच्या ओघात अणि प्रसार माध्यमांच्या प्रगतीमुळे आज कीर्तनाचे महत्त्व कमी झाले असेल तरी आजही धार्मिक उत्सव अणि नित्य उपक्रमात अणि काही मंदिरात नियम म्हणून १२ महिने कीर्तनाचा प्रघात आहे.

[संपादन] किर्तन आणि पद्द्

[संपादन] किर्तन आणि संगीत

पुढे कीर्तनाला संगीत साथ लाभली.टाळ,मृदंग,एकतारी ही वाद्ये साथीला घेत. हल्ली पेटी तबला कधी बासरी अशी वाद्ये वापरली जातात.

[संपादन] हरिकथा

सर्व भारतीय भाषात होणारे कीर्तन हरिकीर्तन, हरिकथा या नावानेही ओळखले जाते .

[संपादन] किर्तनकारांची परंपरा आणि संतांचे योगदान

मध्यंतरीच्या काळात मंदिरात होणारे कीर्तन वाळवंटात प्रथमच आणले ते संत नामदेवांनी.संत ज्ञानेश्वर मुली,संत एकनाथ महाराज ,संत तुकाराम ,समर्थ रामदास हेही कीर्तन करीत. संत साहित्यामुळे कीर्तन समृद्ध झाले.आजही कीर्तनाला संत साहित्याचा भक्कम आधार असतो.

[संपादन] वंश परंपरा, गुरू परंपरा आणि घराणी

जुन्या काळात कीर्तनाची परंपरा वंश परंपरेने आणि गुरु परंपरेने चालत आली. अनेक घराणी तयार झाली.

[संपादन] ग्रंथ परंपरा

"कीर्तन सुधा धारा" नावाचे ३ खंडात केलेले लेखन उपलब्ध आहे. त्यशिवाय "किर्तन् सुमनहार" हे ग्रन्थ आहेत. इ.स. १९२६ साली "कीर्तनचार्याकम" नावाचे छोटे पुस्तक कशी येथे हरिभक्ती परायण श्री विनायक गणेश भागवत यांनी प्रसिद्ध केले. त्यानंतर इ.स. १९८२ मध्ये ह.भ.प. गंगाधरबुवा कोपरकर यांनी ' "कीर्तनाची प्रयोग प्रक्रिया" नावाचे उत्तम पुस्तक लिहिले. आज तरी त्याच्या इतके परिपूर्ण पुस्तक उपलब्ध नाही. आता अनेक लेखकांनी आणि संस्थांनी अनेक पाठ्यपुस्तके तयार केली आहेत.

[संपादन] किर्तन प्रशिक्षण आणि इतर संस्था

महाराष्ट्रात मुंबई येथे सन १९४० मधे "अखिल भारतीय कीर्तन संस्था" दादर मुंबई या संस्थेची स्थापना झाली. आज ६९ वर्षे ही संस्था कार्यरत आहे अणि कीर्तन प्रवचन या जुन्या भक्तियुक्त कला प्रकारचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. संस्थेचे कार्यालय द.ल.वैद्य मार्ग, दादर (प), मुंबई २८ येथे आहे. पुणे येथे "नारद मंदिर" नावाची संस्था सदाशिव पेठेत हेच काम करते नागपूर येथेही कीर्तन महाविद्यालय आहे. संपर्क माहिती वगळली (पहा विकिपीडिया परिघात आंतरभूत न करता येणार्‍या माहितीसंबधी संकेत आणि मार्गदर्शन ).

[संपादन] अलीकडील किर्तनकार

अगदी अलीकडे संत गाडगे बाबा, ह.भ. प. मामासाहेब दांडेकर, संत तुकडोजी महाराज, ह.भ.प. देगलूरकर, कवीश्वर, बडोदेकर, शिरवळकर, ओतूरकर, निजामपूरकर, कऱ्हाडकर, कोपरकर, ह.भ.प. दादा महाराज सातारकर, ह.भ.प. बाबा महाराज सातारकर, ह.भ.प.गणपतबाबा गुडेकर(अलीबागकर महाराज) असे अनेक नामवंत कीर्तनकार झाले.

[संपादन] हेसुद्धा पाहा

[संपादन] संदर्भ

  1. १.० १.१ [१], परंपरा कीर्तनसंस्थेची !-राजेंद्र शिंदे .

संपर्क माहिती वगळली (पहा विकिपीडिया परिघात आंतरभूत न करता येणार्‍या माहितीसंबधी संकेत आणि मार्गदर्शन ).

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये