काळी पाणकोंबडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चित्रदालन[संपादन]


मराठी नाव : काळी पाणकोंबडी
हिंदी नाव : जलमुर्गी
संस्कृत नाव : कृष्णा जलकुक्कुटी
इंग्रजी नाव : Indian Moorhen, Common Moorhen
शास्त्रीय नावः Gallinula chloropus


हा दलदली, नदीकाठ व तळ्याकाठी पाणथळी जागेत दिसणारा पक्षी आहे. कोबंडी व पाणकोंबडी यांच्यात दिसण्यात फारच थोडे साधर्म्य असते. परंतु सवयींच्या बाबतीत कोंबड्यांपासून फारच वेगळी अशी ही जात आहे. काळी पाणकोंबडी सहसा थव्याने राहणारी असून वनस्पतींमध्ये लपून राहणे तिला आवडते.

साधारण ३२ सें. मी. आकाराचा हा जलचर पक्षी काळपट करड्या रंगाचा आहे. याचे कपाळ लाल रंगाचे, शेपटीखाली पांढरा ठळकपणे दिसणारा रंग, लांब हिरवट पिवळे पाय, लांब बोटे, हिरवट चोच व टोकाशी लाल रंग.

काळी पाणकोंबडी भारतीय उपखंडात सर्वत्र आढळणारा पक्षी आहे. मुख्य भारतभूमीत Gallinula chloropus indica ही उपजात सर्वत्र आढळते तर अंदमान बेटांवर Gallinula chloropus orientalis ही उपजात आढळते. जगातील इतर अनेक भागातही या पाणकोंबडीच्या उपजाती आढळतात.

जून ते सप्टेंबर हा या पक्ष्याचा वीणीचा काळ असून याचे घरटे पाण वनस्प्तींचे बनलेले, पाण्याजवळ जमिनीवर असते. मादी एकावेळी ५ ते १२ फिकट पिवळ्या रंगाची त्यावर गडद तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. कीटक, धान्य, पाण वनस्पतीचे कोंब हे याचे अन्न आहे. काळ्या पाणकोंबडीला उडणे त्रासदायक ठरते तर लांब बोटांमुळे पाण्यावरील वनस्पतीवर ती सहजपणे चालू शकते आणि उत्तमपणे पोहू शकते.


भारतात आढळणाऱ्या पाणकोंबड्यांच्या इतर जाती.