कारगिल युद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९९९ चे भारत-पाकिस्तान कारगिल युद्ध

वादाची जागा
दिनांक मे १९९९ - २६ जुलै, १९९९
ठिकाण कारगिल जिल्हा व द्रास जिल्हा , जम्मू आणि काश्मिर, भारत
परिणती घुसखोरांनी ताब्यात घेतलेला प्रदेश भारताला पुन्हा मिळवण्यात यश
प्रादेशिक
बदल
नाही
युद्धमान पक्ष
भारत ध्वज भारत पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
सेनापती
जनरल वेद प्रकाश मलिक
सैन्यबळ
३०,००० आकडा माहित नाही
बळी आणि नुकसान
भारताकडून अधिकृत आकडे
५२७ ठार[१][२][३]
१,३६३ जखमी[४]
१ युद्धकैदी
पाकिस्तानातील विविध स्त्रोताकडील अंदाज
३५७ (मुशरर्फ) ते ४००० (शरीफ) ठार[५][६]
६६५+ जखमी [५]

८ युद्धकैदी.[७]

आजवरचे सर्वाधिक उंचीवर लढले गेलेले युद्ध

कारगिल युद्ध हे भारतपाकिस्तान मध्ये १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित यु्द्ध म्हणतात. तसेच या पूर्वीच्या भारत पाक युद्धांसारखे या युद्धात हे युद्ध सुरू व संपण्याची कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. तसेच पाकिस्तान तर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला. पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकार्‍यांनी हे युद्धच होते असे जाहिर केले. १९९९ च्या उन्हाळ्यात पाकिस्तानी घुसखोरांनी सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगीलचे युद्ध सुरु झाले. ही ठाणी कारगिलद्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी स्थित होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्ननंतर भारताला ही ठाणी परत ताब्यात मिळवण्यात यश मिळाले.

ही युद्ध हे आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे अत्युकृष्ट उदाहरण आहे. यात युद्धाला लागणारी सामुग्री, मनुष्यबळ ने-आण करण्याचा भारतीय सैन्याला चांगलाच अनुभव मिळाला. हे युद्ध दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते त्यामुळे सगळ्या जगाचे या युद्धाच्या प्रगतीकडे लक्ष होते. परंतु भारताने हे युद्ध कारगिल पुरतेच मर्यादीत ठेवले. त्यामुळे भारताची जगभर दाखवलेल्या सयंमाबद्दल कौतुक झाले. त्यामुळे भारताला आंतराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळाला व पाकिस्तानला सैन्या मागे घ्यावे यासाठी अमेरिकेसह अनेक देशांनी दबाव आणला. या युद्धानंतर भारताने आपल्या संरक्षण खर्चात अनेक पटीने वाढ केली. तर पाकिस्तानात राजकिय अस्थिरता माजली परिणामी काही महिन्यातच ऑक्टोबर ९९ मध्ये जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे सरकार उलथून लष्करशाही लागू केली.

अनुक्रमणिका

[संपादन] स्थळ

कारगिल हे लहान शहर असून जम्मू आणि काश्मिरची राजधानी श्रीनगर पासून २०५ किमी अंतरावर आहे.[८] हे शहर पाक व्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेपासून जवळ आहे. कारगिलमध्ये काश्मीरमधील इतर ठिकाणांसारखे सौम्य हवामान आहे. उन्हाळा हा सौम्य कडक तर हिवाळा अतिशय कडक असतो व तापमान -४० अंश सेल्सियस पर्यंतही उतरू शकते.[९]

राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगील वसलेले आहे. कारगील युद्ध होण्याचे प्रमुख कारण हा रस्ता हे होय. घोसखोरांनी साधारणपणे या रस्त्याला पाकव्याप्त काश्मीरच्या जवळचा समांतर १६० किमी चा पट्यातच घुसखोरी केली. [१०] लष्कराच्या अनेक चौक्या या भागात आहेत. त्यातील काही चौक्या ५००० मीटर पेक्षाही उंचावर आहेत. [११] नुसतेच कारगील नव्हे तर अग्नेयेकडील द्रास व नैरुत्येकडील मश्को खोर्‍यातील तसेच बटालिक विभागातील चौक्यांवरही घुसखोरी झाली.

वर नमूद केल्याप्रमाणे कारगील, द्रास व मश्को खोर्‍यातील चौक्या ह्या अतिउंचीवर आहेत. कारगील युद्धाच्या आगोदर भारत पाकिस्तान मध्ये अलिखीत समझोता होता की अतिउंचावरील चौक्यांवर कडक हिवा़ळ्याच्या महिन्यात सैन्य तैनात करुन ठेवणे अतिशय अवघड असल्याने दोन्ही बाजूने सैन्याची माघार होत असे व उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर व हवामान मानवी रहाण्यास स्थिर झाल्यानंतर दोन्ही बाजूंचे सैन्य आपपल्या चौक्यांमध्ये परतत. कारगील युद्धाच्या वेळेस पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सैन्यांने भारतीय चौक्यांचा ताबा घेण्याआगोदरच ताबा घेतला. व कारगीलचे युद्ध भडकण्यास ठिणगी पडली. [१२] या चौक्यांचा ताबा घेतला गेल्याने राष्ट्रीय महामार्ग १ अ हा पाकिस्तानी तोफगोळ्यांच्या टप्यात अजून जवळ आला तसेच उंचावरील चौक्यांचा ताबा घुसखोरांकडे गेल्याने उतारावरील चौक्यावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. या चौक्या डोंगर माथ्यावरील किल्याप्रमाणे होत्या. ज्यांचा ताबा मिळवण्यास मोठ्या प्रमाणावर फौजेची गरज लागते.[१३] त्यातच अतिउंची कडाक्याची थंडी हे काम अजून अवघड करते.[१४]

[संपादन] कारणे

कारगील शहर हे सामरिक दृष्ट्या महत्वाचे आहे

१९७१ च्या युद्धानंतर भारत व पाकिस्तानमध्ये सरळ सरळ मोठे युद्ध झाले नाही तरी. सातत्याने छोट्या छोट्या चकमकी होत आहेत.[१५] सियाचीन हिमनदी वर भारतीयांचे नियंत्रण तसेच सभोवतालचा परीसरावर नियंत्रण मिळवण्यात दोन्ही बाजू सातत्याने प्रयत्नशील असतात. १९८० च्या सुमारास पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी पंजाबात खलीस्तानच्या नावावर दंगा घातला तसेच १९९० च्या सुमारास काश्मीरमध्ये दहशतवादाने मूळ धरले परीणामी भारताने काश्मीरमध्ये कायमस्वरूपी सैन्य तैनात केले आहे. हे दहशतवादी सुरुवातीच्या काळात काश्मीरमधील असत व त्यांना प्रशिक्षीत करुन पाठवले जात. काही काळानंतर पाकिस्तानी सैन्यातील सैनिक अधिकारी व तालिबान अफगणीस्तानातील भाडोत्री अतिरेक्यांनाही काश्मीरमध्ये पाठवले जात. पाकिस्तानने नेहेमीच या बाबतीत नकार दिला. कारगील युद्धात सुद्धा पाकिस्तानने हीच खेळी वापरली व घुसखोर हे काश्मीरी स्वातंत्र्यसैनिक आहेत असे जगाला सांगण्याचा प्रयत्न केला. १९९८ मध्ये भारत पाकिस्तानने अणू चाचण्या केल्यानंतर दोन्ही देशातील संबध चांगलेच ताणले गेले. परंतु वाजपेयी यांनी मैत्रीचा हात पुढे करुन संबध निवळण्याचा प्रयत्न केला व स्वता: लाहोरला जाउन आले.

१९९८- ९९ च्या हिवाळ्यात पाकिस्तानी लष्करातून अनेक तुकड्यांना मुजाहिदीनच्या वेषात भारतात नियंत्रण रेषे पलीकडे पाठवण्यात आले. या कारवाईला ऑपरेशन बद्र असे नाव देण्यात आले व कुणाच्याही लक्षात न येता त्यांनी रिकाम्या भारतीय चौक्यांचा ताबा घेतला. (वर नमूद केल्याप्रमाणे हिवाळ्यात प्रचंड थंडीमुळे सैन्याची माघार घेतली जाई)[१६] या कारवाईचा मुख्य उदेश्य होता की नियंत्रण रेषेच्या जास्ती जास्त आत घुसखोरी करुन राष्ट्रीय महामार्ग १ च्या जवळ यायचे. जेणेकरुन महामार्गावर कायमस्वरुपी ताबा मिळवता येईल व नंतर राजकिय वजन वापरुन काश्मीरच्या ह्या प्रश्णाला आंतराष्ट्रीयकरण करणे जेणेकरुन भारताला नवीन नियंत्रण रेषेवर मान्य करायला भाग पाडायचे. असे झाल्यास लढ्ढाक व सियाचीनला भारतापासून तोडणे सोपे जाईल असा पाकिस्तानी थिंकटँकचा कयास होता. तसेच घुसखोरी दरम्यान कारगील/काश्मीर परिसरात अंतर्गंत बंडखोरी भडकावून भारताला अजून बुचकाळ्यात पाडण्याचा पाकिस्तानी व्यूह होता. काही लेखकांचा असा सूर होता की जसे भारतीयांनी सियाचीन हिमनदी वर नियंत्रण मिळवण्यात जी क्लुप्ती वापरली तसाच पाकिस्तानने काहीसा प्रकार केला[१७]

[संपादन] घटनाक्रम

[संपादन] पाकिस्तानी घुसखोरांचा भारतीय चौक्यांवर कब्जा

घुसखोरी व व्यूहरचना

कडक हिवाळ्यातील महिन्यांमध्ये अतिउंचावरील भारत व पाकिस्तान दोन्ही बाजूंकडून चौक्या रिकाम्या करायचा प्रघात होता. याने मनुष्यहानी कमी होते. हवामान पुन्हा ठिकठाक झाल्यानंतर दोन्ही बाजूंचे सैन्य आपपल्या चौक्यांमध्ये परतून संरक्षणाची जवाबदारी घेत.

फेब्रुवारी १९९९ मध्ये पाकिस्तानी लष्कराने कडक हिवाळ्यातच भारतीय चौक्यांचा ताबा घेणे आरंभले. पाकिस्तानने कार्यवाही अतिशय सुत्रबद्धपणे व थांगपत्ता न लागू देता पार पाडली. यातच भारतीय गुप्तहेर खात्याला या कार्यवाहीची माहिती अजिबात मिळाली नाही त्यामुळे भारतीय गुप्तहेर खात्याच्या कार्यक्षमतेवर सर्वत्र भारतातून व जगातूनही चांगलीच टिका झाली. [१८] स्पेशल सर्विसेच्या सर्वोतकृष्ट तुकड्या, तसेच नॉर्थन लाईट इंन्फट्रीच्या ४ ते ७ बटालियन तुकड्या या कामात गुंतल्या होत्या.[१९][२०] रिकाम्या चौक्यांव्यतीरिक्त भारतीय सैन्याला हल्ला करायला अवघड जावे म्हणून मोक्याच्या जागाही ताब्यात घेण्यात आल्या. साधारणपणे, अतिउंचावरील एक मुख्य चौकी व त्याला रेकी देणारी दुय्यम उतारावरील व कमी उंचीवरील चौक्या ताब्यात घेण्यात आल्या. पाकिस्तानी मुख्य सैनिकांबरोबरच अफगाणी मुजाहिदीन, काश्मीरी मुजाहिदीन यानांही या कार्यवाहीत समाविष्ट केले. [२१]

[संपादन] भारतीयांना उशीराने मिळालेली खबर

सुरुवातील अनेक कारणांमुळे कारगीलची घुसखोरीचा पत्ता लागण्यास उशीर झाला. मुख्यत्वे पाकिस्तानने अनेक भागात तोफांचा मार्‍या मुळे शोध पार्ट्याना पाठवण्यास दिरंगाई झाली. भारतीय लष्कराच्या मते हा तोफखान्याचा मारा नेहेमीचा असतो, त्यात नवे काही नाही. पाकिस्तानने हा मारा नियंत्रण रेषेपलीकडील सैनिकांना/घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी केला. मेच्या दुसर्‍या आठवड्यात स्थानिक मेंढपाळ यांनी घुसखोरीची टिप भारतीय सैन्याला दिली. त्यानुसार भारतीय सैनिकांनी टेहाळणीसाठी पाठवलेल्या तुकडीवर हल्ला करण्यात आला व घुसखोरी झाल्याचे सिद्ध झाले व पत्ता लागला. सुरुवातीला ही मुजाहिदीन स्वरुपाची वाटल्याने लवकरच संपवता येईल असे वाटले परंतु. लगेचच नियंत्रण रेखेच्या बर्‍याच लांबीवर ही घुसखोरी झाल्याचे लक्षात आले व घुसखोरांकडून आलेले प्रत्युतर वेगळ्या दर्जाचे होते व वरवर घुसखोरी वाटणारी घटना मोठ्या नियोजनाचा भाग आहे असे लक्षात आले व कारगीलच्या युद्धावर शिक्कामोर्तब झाले. पाकिस्तानने एकूण १३० ते २०० चौ.किमी प्रदेश साधारणपणे ताब्यात घेतला होता. [२२][२३] मुशरर्फ यांच्यानुसार १३०० चौ. किमी इतका प्रदेश ताब्यात घेण्यात आला होता.[१९]

भारतीय सरकारने ऑपरेशन विजय या नावाखाली कारगील युद्धाची कार्यवाही चालू केली. या साधारणपणे २,००,००० फौजेचा आधार घेण्यात आला. परंतु भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर युद्ध करणे शक्य नव्हते. त्यामुळे रेजिमेंटल व बटालियन पुरतेच कार्यवाही शक्य होती. त्यामुळे फौजेचा आकार २०,००० पर्यंत मर्यादीत ठेवण्यात आला. [२४]. पॅरा मिलीटरी व वायूदल मिळून एकूण भारताने ३०,००० पर्यंत सैन्य कारगील युद्धात वापरले. घुसखोरांची संख्या पाकिस्तानी सुत्रांप्रमाणे साधारणपणे ५,००० होती. [२२][१०][२१] यात पाकव्याप्त काश्मीरमधील तोफखान्यामधील संख्याही होती.

भारतीय वायूसेने कडूनही ऑपरेशन सफेद सागर निवडण्यात आला. यात पायदळ सैन्याची ने- आण करणे यात मोठी भूमिका बजावली. इथेही भौगोलिक परिस्थितीमुळे मोठे बॉम्ब वाहण्यासाठी लागणारे मोठे विमानतळ या भागात नसल्याने वायूसेनेचीही व्याप्ती मर्यादीत होती.

भारतीय नौदलानेही पाकिस्तानी बंदरांना आपले लक्ष्य केले व त्यामध्ये येणार्‍या जहाजांची कोंडी केली. कराची बंदर हे खासकरुन लक्ष्य करण्यात आले.[२५] याने पाकिस्तानच्या जीवनावश्यक वस्तूंची रसद थांबवली गेली. [२६] काही काळाने नवाज शरीफ यांनी उलगडवून सांगितले की पाकिस्तान कडे या काळात फक्त ६ दिवसांचाच इंधन साठा राहिला होता व जर पूर्ण युद्ध सुरु झाले असते तर बरीच नाचक्की झाली असती.[१०]

[संपादन] भारतीय प्रत्युत्तर

कारगील युद्ध सुरु झाल्यानंतर हे नक्की झाले की पाकिस्तानला श्रीनगर लेह मार्ग कापून काढायचा आहे. भारताने सैन्य जमवाजमवी चे प्रयत्न सुरु केल्यानंतर पाकिस्तानकडून श्रीनगर लेह मार्गावर मोठ्याप्रमाणावर उखळी तोफांचा मारा करण्यात आला.[२७] त्यामुळे भारतीय प्रत्युतरात सुरुवातीला श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्ग सुकर होणे आवश्यक होते. त्यादृष्टीने महामार्गाच्या जवळचा भाग ताब्यात घेण्यात जास्ती महत्व देण्यात आले. [२८]

घुसखोरांकडे आधुनिक शस्त्रांत्रासह चौक्या सुरक्षित केल्या होत्या. बंदुकी, स्वयंचलीत मशीन गन, छोट्या उखळी तोफाविमानभेदी क्षेपणास्त्रे यांनी चौक्या सज्ज होत्या तसेच चौक्यांचा सभोवतालचा परिसर पेरलेल्या सुरुंगांनी सुरक्षित केला होता. भारतीय सेनेने युद्धानंतर ८,००० सुरुंगाना निकामी केले होते.[२९] या चौक्यांना पाठी मागून पाकिस्तानी हद्दीतून मोठ्या प्रमाणावर तोफखान्याचे संरक्षण मिळाले होते. पाकिस्तानने युद्दाआगोदर परिसराची चालकरहित विमानांमधून टेहाळणी देखील केली होती. [३०] वर नमूद केल्याप्रमाणे भारताच्या कडून पहिले महामार्गलगतच्या चौक्यांवर हल्ले करण्यात आले. कारगीलच्या जवळचा भाग जास्ती करुन केंद्रीत करण्यात आला. या चौक्यांवर ताब्या बरोबरच मिळालेल्या जागेत भरही पडली व महामार्ग जसा सुरक्षित होत गेला तस तसे पुढील हल्ल्यांचे नियोजन सुत्रबद्द रितीने होत गेले.

महामार्गाच्या जवळच्या चौक्यांत मुख्यत्वे टायगर हिलतोलोलिंग शिखर ह्या जागांवर मुख्यत्वे भारतीय फौजेने आक्रमणे केली. [३१] यानंतर बटालिक व तुर्तुक या सियाचीन लगतच्या भागाला लक्ष्य करण्यात आले. यातील काही जागा गमावणे पाकिस्तानी संरक्षणाच्या दृष्टीने परवडणारे नव्हते. पॉईंट ४५९० व पॉइंत ५३५३ हे त्यापैकी काही महत्वाच्या जागा होत्या. ( या भागात शिखरांना नावे त्यांच्या उंचीप्रमाणे असतात). ४५९० हा महामार्गाला सर्वात जवळचा पॉइंट होता तर ५३५३ हे युद्धातील सर्वात उंचीचे शिखर होते.[३२] पॉइंट ४५९० वर १४ जुन १९९९ रोजी भारतीय सेनेने ताबा मिळवला व युद्धाचे पारडे हळूहळू भारताच्या बाजूने झुकू लागले. याच शिखराच्या ताब्यासाठी भारतीय सेनेला सर्वाधिक मानवी नुकसान सोसावे लागले.[३३] जरी भारतीय सेनेने जुन च्या मध्यापर्यंत महामार्गासाठी महत्वाची ठिकाणे ताब्यात घेण्यात यश मिळवले असले तरी पाकिस्तानी बाजूने युद्धच्या अंतापर्यंत तोफखान्यातून शेलींग चालू होती.

चित्र:IAFshotdown.PNG
पाकिस्तानी सैन्याने पाडलेले भारतीय विमानाचे अवशेष

भारताने जसा महामार्गाच्या लगतच्या महत्वाच्या चौक्यांवर ताबा मिळवला तसा भारतीय सैन्याने घुसखोरांना नियंत्रण रेषे पलीकडे पिटाळायचे धोरण आखले. तोलोलिंगची लढाई व टायगर हिलची लढाई ही या युद्धातील सर्वात महत्वाची घटना मानली जाते. अनेक शूर भारतीय अधिकारी व सैनिक या लढायांमध्ये मरण पावले. तोलोलिंगच्या लढाईनंतर सामरिक तसेच राजनैतिकही पारडे पुर्णपणे भारताच्या बाजूने झुकले. टायगर हिल वर उशीरा नियंत्रण मिळवले गेले तरी ती सर्वात महत्वाची लढाई होती असे मानतात. टायगर हिलच्या लढाईत दोन्ही बाजूने जबरदस्त प्रयत्न झाले. पाकिस्ताननेही खंदक वैगेरे खोदून भारतीय प्रयत्नांना चांगलेच झुंजावयाला लावले. सरतेशेवटी ४ जुलै रोजी टायगर हिल भारताच्या ताब्यात आली. या लढाईत भारताचे ५ सैनिक व पाकिस्तानचे १० सैनिक म्रुत्यूमुखी पडल्याचे कळते.

या युद्धात भारतीय सैन्याने नवनवीन क्लुप्त्यांचा चांगलाच वापर केला. काही लढायांमध्ये भारतीय सैनिकांनी रात्रीच्या अंधारात हजारो फुट सरळसोट कड्यांवर गिर्यारोहण करुन शत्रूवर अनपेक्षित ठिकाणांवरुन हल्ले चढवले व चौक्या ताब्यात घेतल्या. काही ठिकाणी भारतीय सैन्यातील काही मुस्लीम तुकड्यांनी आक्रमण करताना अल्ला हू अकबर असा नारा देत हल्ला केला त्यामुळे शत्रूपक्ष आपलेच सैनिक आहेत या भ्रमात राहिले व चौक्या गमवाव्या लागल्या. बहुतांशी चौक्यांवर या खूप उंचीवर होत्या व काश्मीरमधील हा भाग दगडी व रेताड आहे त्यामुळे लपायची फारशी जागा उपलब्ध नव्हती त्यासाठी भारतीय सैन्याने मनुष्या हानी कमी व्हावी म्हणून बहुतेक हालचाल रात्रीच्या वेळेसच करायचे धोरण आखले होते. परंतु रात्रीच्या हालचाली ह्या वेळखाउ होत्या तसेच या उंचीवर अतिशय कमी तापमान असते व जबरदस्त उतारावरील लढाया ह्या सर्वच गोष्टी भारताच्या विरोधात होत्या. या भागात सर्व चौक्यांना वेढा देउन घुसखोरांचा रसद पुरवठा संपवून कमी रिस्क चे युद्ध करणे भारताला शक्य होते तसेच पूर्ण पणे हवाई हल्ले चढवून घुसखोरांच्या ताब्यातील चौक्या मिळवणेही शक्य होते. परंतु या साठी भारताला नियंत्रण् रेषे पलीकडचा भाग मिळवणे आवश्यक होते. जर तसे केल्यास पूर्ण युद्ध होण्याची शक्यता होती व भारतीय शासन यासाठी तयार नव्हते. जर असे झाल्यास या युद्धात मिळालेली आंतराष्ट्रीय सहानूभूती भारत गमावेल अशी भीती होती.

भारताने जुलै च्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत अनेक महत्वाच्या लढाया व जागा ताब्यात मिळवल्या.

[संपादन] भारतीयांचे गमावलेल्या प्रदेशावर नियंत्रण

[संपादन] परिणती व परिणाम

[संपादन] भारत

कारगीलचे युद्ध हे भारतीय लोकसभा बरखास्त झाल्यानंतर झाले होते तरीही युद्धाच्या सुरुवातीला विरोधी पक्षानेही सत्तारुढ पक्षाला लष्करी कारवाईला चांगलाच प्रतिसाद दिला, त्यामुळे भारतीय राजकारणात फारशी न दिसणारी एकता कारगील युद्धात दिसली. परंतु युद्ध पार पडल्यानंतर विरोधी पक्षाने कारवाई सुरू करण्यास विलंब लावला कारण सत्ताधारी पक्षाला विजयाचे श्रेय घेणे निवडणुकांसाठी लाभदायक ठरणार होते असा आरोप केला. या आरोपानंतरही भारतीय जनता पक्ष च्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी ने पुढील निवडणुकीत भरघोस यश मिळवले व १९८४ नंतर प्रथमच निवडणूक पूर्व आघाडीने संपूर्ण बहुमत मिळवले.

कारगील युद्ध हे भारतातील प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिले गेले. अनेक वाहिन्यांची युद्ध क्षेत्रात जाउन बातम्यांचे संकलन करण्यात चढाओढ झाली. त्यामुळे भारतीय नागरीकांना प्रथमच भारतातील युद्धाची क्षणचित्रे टीव्हीवर पहायला मिळाली. यामुळे भारतात एकंदर राष्ट्रीयत्वाच्या विचारसरणीने चांगलेच मूळ धरले. या युद्धानंतर भरलेल्या अनेक सैन्य भरती शिबिरांना अनेक राज्यात आफाट प्रतिसाद मिळाला.

या युद्धात भारतीय गुप्तहेर खात्याचे कच्चे दुवे स्पष्ट झाले, संपूर्ण जगातून गुप्तहेर खात्याच्या अकार्यक्षमतेमुळे हे युद्ध झाल्याचे मत प्रदर्शित झाले होते. तसेच युद्धादरम्यान भारतीय सैन्याकडे अतिउंची वर लढण्यासाठी पुरेशी साधने नव्हती. त्यामुळे युद्धानंतर भारताने सैन्यखर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली.

[संपादन] पाकिस्तान

कारगीलच्या युद्धानंतर पाकिस्तानी राज्यकर्त्यांमधील कच्चे दुवे बाहेर आले.पाकिस्तानातील नवाज शरीफ यांचे लोकशाही सरकार व लष्कर यांच्यात कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता हे सिद्ध झाले. सूत्रांनुसार नवाज शरीफ यांना या युद्धाबद्दल फारशी माहीती नव्हती असे कळते. तसेच युद्धादरम्यानही पाकिस्तानी लष्कराने शरीफ यांना अद्यतने दिली नाहीत. त्यामुळे नवाज शरीफ यांना आंतराष्ट्रीय स्तरावर या युद्धासाठी मान्यता मिळवणे अवघड गेले. अगदी युद्धाच्या दरम्यान नवाज शरीफ यांना अगदी जुना लष्करी मित्र देश अमेरिकेनेही सैन्य माघारीचा सल्ला दिला. पाकिस्तानने सुरुवातीपासूनच हे सैनिक आमचे नाही हा पावित्रा घेतल्याने शहीद सैनिकांचा स्वीकार करण्यास नकार दिला,ज्या सैनिकांना मानाने अत्यंसंस्कार मिळायला पाहिजे होते त्यांचे संस्कार भारतीय सैन्याने केले. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर मध्येही सरकार विरुद्द लाट उसळली.

पाकिस्तान सरकार व पाक लष्कर यांच्यातील दरी वाढत गेली. असे कळते की मुशरर्फ यांच्यावर कारावाईची तयारी शरीफ यांनी केली होती परंतु मुशरर्फ यांनी शरीफ यांचे प्रयत्न फोल पाडले. या दरम्यान एका घटनेत मुशरर्फ यांचे विमान इस्लामाबाद येथे उतरुन देण्यास नकार दिला, परंतु मुशरर्फ यांचे विमान त्यांच्या निष्ठावंतानी दुसर्‍या विमानतळावर उतरून मुशरर्फ यांचा जीव वाचवला. मुशरर्फ यांनी हत्येचा प्रयत्न या आरोपाखाली शरीफ यांचे लोकशाही सरकार उलथून लावले व पाकिस्तानात आणिबाणी लागू केली व काही दिवसातच पाकिस्तानच्या भल्यासाठी आपले सत्तेत रहाणे गरजेचे आहे असे दूरचित्रवाणीवर सांगत लष्करी राजवट लागू केली.


[संपादन] माध्यमांचा प्रभावी वापर

चित्र:Kargil Pinaka.jpg
News footage shows the BM-21 Grad MRL system being fired in the background. The rocket barrage was aimed at Tiger Hill.

कारगीलचे युद्ध हे भारतीय माध्यमांसाठी एक मैलाचा दगड ठरले. कारगीलच्या युद्धाच्या वेळेस भारतीय माध्यमांनी जागतिकीकरणात उडी घेतली होती व बी.बी.सी , सी.एन्,एन्. या आंतराष्ट्रीय दर्जाच्या वाहिन्यांचा दर्जा गाठण्यास सूरुवात केली होती. कारगील युद्धाच्या निमित्ताने या वाहिन्यांनी युद्दाच्या जास्तीजास्त बातम्या प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. भारतीय सैन्यानेही यात मागे न रहाता, माध्यमांचा वापर काळजीपूर्वक आपल्या सोयींकरता करुन घेतला. त्यामुळे युद्धाबाबत भारतीय सैन्याबद्दल सहानूभूती मिळवणे सोपे गेले. [३४] तसेच युद्ददृश्ये व त्यांचे ऍनालिसीस मुळे भारतीयां मध्ये ऐक्याची भावना वाढीस लागली. [३५]

जसजसे युद्ध पुढे सरकत गेले तसतसे माध्यमांनी प्रक्षेपण अजून वाढवले. प्रक्षेपणाची व्याप्ती भारतात पाकिस्तानपेक्षा खूप जास्ती होती. [३६] काही वाहिन्यांनी सरळसरळ युद्धक्षेत्रात जाउन युद्धाचे थेट प्रक्षेपण घेतले. भारतीय सैन्यांच्या तोफांचा मारा काही खास करुन दाखवला गेला. यामुळे बोफोर्स तोफांबद्द्लचा भारतीय जनमानसातील राग कमी झाला. सीएनएन ने आखाती युद्धाचे जसे प्रक्षेपण दाखवले तसेच काहिसे भारतीय माध्यमांनी दाखवले.[३७] भारतीय माध्यमांचे यश पाकिस्तानी माध्यमानीही कबूल केले, कराची येथे झालेल्या कॉन्फरन्स मध्ये पाकिस्तानी पत्रकारांनी नमूद केले की भारतीय सरकारने माध्यमांना व जनतेला विश्वासात घेतले तर पाकिस्तानने एक्दम विरुद्द अशी भूमिका घेतली. [३८]

भारतातील व जगभरातील वृत्तपत्रेही भारताच्या बाजूने सहानूभूतीपूर्ण होती. पाश्चिमात्य देशांनी सरळसरळ सहानूभूती प्रदर्शित न करता पाकिस्तानवरच हे युद्ध भडकवल्याचा ठपका ठेवला. काही तज्ञांच्या मते भारतातील माध्यामांनी या युद्धासाठी लागणार्‍या बाह्य शक्तींचे काम केले व भारतीय सैन्याचा उत्साह दुणावणारी कामगीरी केली. [३९] जसे युद्ध पुढे सरकत गेले तस तसे पाकिस्तान या पातळीवर मागे पडू लागला व भारताने महत्वाची अशी डिप्लोमॅटीक आघाडी मिळवली.

[संपादन] चित्रपटात

  • चित्र:LOC Kargil.jpg
    A movie poster of LOC Kargil which had the largest cast of stars in an Indian film.
    कारगील युद्धावर बॉलिवूडमध्ये काही चित्रपट निघाले. एल्.ओ.सी कारगील हा जे.पी. दत्ता यांचा चित्रपट कारगील युद्धात मरण पावलेल्या हुताम्यांच्या जीवनावर आधारित आहे. चार तासापेक्षाही लांबा ह्या चित्रपटात सैनिकांनी लढाया कश्या पार पाडल्या याचे चित्रण या चित्रपटात आहे. अति वास्तवी करणाच्या प्रयत्ना मध्ये या चित्रपटाने काही मर्यादा ओलांडल्याने बरीच टिका झाली. चित्रपटा ऍवजी माहीतीपट काढला असता तर जास्त शोभला असता. अशी चर्चा होती.[४०]


  • लक्ष्य हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला. यात कारगील युद्धातील एक काल्पनिक कथेवर आधारित आहे. कारगील युद्धात बहुतांशी अधिकारी हे खूपच नवीन अधिकारी होते. त्यापैकी एक कारगीलचे एक शिखर आपल्या आयुष्याचे लक्ष्य बनवतो व त्यात यशस्वी होतो अशी कथा आहे. [४१]
  • सैनिका (२००२),[४२] हा कन्नड भाषेतील चित्रपट कारगील युद्धावर आधारित होता. महेश सुखदर ह्याने कारगील युद्धात सहभागी झालेल्या एका सैनिकाच्या आयुष्यावर आधारित आहे.
  • धूप (२००३),[४३] हा चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवले. याचे दिग्दर्शन अश्विन चौधरी यांनी केले होते. महावीर चक्र मिळवलेल्या अनूज नय्यर यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. ओम पुरी यांनी अनूज नय्यर यांच्या वडिलांची भूमिका केली आहे
  • मिशन फतेह - रियल स्टोरी ऑफ कारगील हिरोज ही मालिका सहारा चॅनेल वर प्रदर्शित झाली होती. यात प्रत्येक भागात कारगील युद्धात कामी आलेल्यावर भाग प्रदर्शित होत असे.
  • फिफ्टी डे वॉर
  • कुरुक्षेत्र (मल्याळी चित्रपट) हा २००८ मध्ये प्रदर्शित झालेला मल्याळी चित्रपट आहे. कारगील युद्धातील अनुभवांवर हे युद्ध अनुभवलेले मेजर रवी यांनी हा चित्रपट काढला.
  • टँगो चार्ली हा देखील चित्रपट कारगील युद्धाची प्रेरणा घेउनच काढला होता

[संपादन] संदर्भ व नोंदी

  1. Government of India site mentioning the Indian casualties, Statewise break up of Indian casualties statement from Indian Parliament
  2. Breakdown of casualties into Officers, JCOs, and Other Ranks - Parliament of India Website
  3. Complete Roll of Honour of Indian Army's Killed in Action during Op Vijay from the Official Indian Army Website.
  4. Official statement giving breakdown of wounded personnel - Parliament of India Website
  5. ५.० ५.१ President Musharaffs disclosure on Pakistani Casualties in his book Indian Express news report
  6. Over 4000 soldier's killed in Kargil: Sharif
  7. Tribune Report on Pakistani POWs
  8. Profile of Kargil District Official website of Kargil District
  9. Climate & Soil conditions Official website of Kargil District
  10. १०.० १०.१ १०.२ 1999 Kargil Conflict -GlobalSecurity.org
  11. War in Kargil - The CCC's summary on the war.
  12. Limited War with Pakistan: Will It Secure India’s Interests? Paper by Suba Chandran
  13. Against the accepted 3:1 ratio for attacking troops vs defending troops, the ratio over mountain terrain is estimated at 6:1.Men At War India Today
  14. Acosta, Marcus P., CPT, U.S. Army, High Altitude Warfare- The Kargil Conflict & the Future, June 2003. Alternate Link
  15. The Coldest War Outside Magazine
  16. Kargil: where defence met diplomacy - India's then Chief of Army Staff VP Malik, expressing his views on Operation Vijay. Hosted on Daily Times; The Fate of Kashmir By Vikas Kapur and Vipin Narang Stanford Journal of International Relations; Book review of "The Indian Army: A Brief History by Maj Gen Ian Cardozo" - Hosted on IPCS
  17. Robert G. Wirsing (2003). Kashmir in the Shadow of War: regional rivalries in a nuclear age. M.E. Sharpe. ISBN 0-7656-1090-6.  Pg 38
  18. How I Started A WarTime1999-7-12
  19. १९.० १९.१ Pervez Musharraf (2006). In the Line of Fire: A Memoir. Free Press. ISBN 0-7432-8344-9. 
  20. The Northern Light Infantry in the Kargil Operations by Ravi Rikhye 1999 August 25 2002 - ORBAT
  21. २१.० २१.१ It is estimated that around 2,000 "Mujahideen" might have been involved as Musharraf stated on July 6, 1999 to Pakistan's The News; online article in the Asia Times quoting the General's estimate. An Indian Major General(retd) too puts the number of guerrillas at 2,000 apart from the NLI Infantry Regiment.
  22. त्रूटी उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Qadir नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  23. War in Kargil (PDF) Islamabad Playing with Fire by Praful Bidwai - The Tribune, 7 June 1999
  24. Lessons from Kargil, Gen VP Malik
  25. The Resurgence of Baluch nationalism by Frédéric Grare - Carnegie Endowment for International Peace
  26. Exercise Seaspark—2001 by Cdr. (Retd) Muhammad Azam Khan Defence Journal, April 2001
  27. Indian general praises Pakistani valour at Kargil May 5 2003 Daily Times, Pakistan
  28. Kashmir in the Shadow of War By Robert Wirsing Published by M.E. Sharpe, 2003 ISBN 0765610906 pp36
  29. Landmine monitor - India
  30. Indian Army gets hostile weapon locating capabilityसाचा:Dead link
  31. Managing Armed Conflicts in the 21st Century By Adekeye Adebajo, Chandra Lekha Sriram Published by Routledge pp192,193
  32. Commander ordered capture of Point 5353 in Kargil war By Praveen Swami The Hindu, June 30, 2004
  33. The State at War in South Asia By Pradeep Barua Published by U of Nebraska Press Page 261
  34. India's Nuclear Bomb By George Perkovich University of California Press, 2002 ISBN 0520232100, Page 473
  35. Media Related Lessons From Kargil By A.K. Sachdev Strategic Analysis: January 2000 (Vol. XXIII No. 10)
  36. A different view of Kargil by Rasheeda Bhagat Volume 16 - Issue 19, Sep. 11 - 24, 1999 The Frontline
  37. Pak TV ban gets good response
  38. Pak media lament lost opportunity - Editorial statements and news headlines from Pakistan hosted on Rediff.com
  39. The role of media in war - Sultan M Hali, Press Information Bureau, India
  40. LOC: Kargil main page on the website IMDb.
  41. A collection of some reviews on the movie "Lakshya" at Rotten Tomatoes
  42. साचा:Http://www.kannadaaudio.com/Songs/FilmStories/home/Sainika.php
  43. साचा:Imdb title

वैयक्‍तिक साधने