काबुल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(काबूल या पानावरून पुनर्निर्देशित)


काबुल
کابل
अफगाणिस्तान देशाची राजधानी


काबुल is located in अफगाणिस्तान
काबुल
काबुल
काबुलचे अफगाणिस्तानमधील स्थान

गुणक: 34°31′59″N 69°09′58″E / 34.53306°N 69.16611°E / 34.53306; 69.16611

देश अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान
स्थापना वर्ष इ.स. २००६
क्षेत्रफळ २७५ चौ. किमी (१०६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५,८७३ फूट (१,७९० मी)
लोकसंख्या  
  - शहर २८,५०,००००


काबुल (पर्शियन: کابل) अफगाणिस्तानची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

हिंदुकुश पर्वतरांगेत काबुल नदीच्या काठी वसलेले हे शहर १,८०० मीटर (५,९०० फूट) उंचीवर आहे. येथील लोकसंख्या अंदाजे २५ लाख आहे. हे शहर याच नावाच्या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र आहे.

वाहतूक[संपादन]

काबुल अफगाणिस्तानच्या गझनी, कंदहार, हेरात आणि मझार-ए-शरीफ शहरांशी महामार्गांनी जोडलेले आहे. याशिवाय येथून पूर्वेस पाकिस्तान व उत्तरेस ताजिकिस्तानकडे जाणारे महामार्ग आहेत.

काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे. येथून जवळ असलेला बागराम विमानतळ अमेरिकेने बांधला असून तो मुख्यत्वे लष्करी विमानतळ आहे.