कापशी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| शास्त्रीय नाव | इलेनस सेरुलेअस (Elanus caeruleus) |
|---|---|
| कुळ | गृध्राद्य |
| अन्य भाषांतील नावे | |
| इंग्लिश | ब्लॅक विंग्ड काइट (Black-winged Kite) |
| संस्कृत | कुमुद, शबलिका |
कापशी किंवा काळ्या पंखाची घार (शास्त्रीय नाव : Elanus caeruleus, इलेनस सेरुलेअस ; इंग्लिश: Black-winged Kite, ब्लॅक विंग्ड काइट;) हा मध्यम शुष्क प्रदेशांत आढळणारा दिनचर शिकारी पक्षी आहे. या पक्ष्याचे घारीशी साम्य असते. याच्या दुभंगलेल्या शेपटीमुळे हा घार कुटुंबात गणला जातो. काळ्या पंखांमुळे माळरानावर सहजपणे ओळखता येतो. याचे मुख्य खाद्य लहान उंदीर, पक्षी व किडे आहेत. आकाशात एकाच जागी स्थिर घिरट्या घालत तो शिकार करतो.