कान, फ्रांस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख फ्रांसमधील कान शहराबद्दल आहे. कान शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पहा - कान (निःसंदिग्धीकरण).
कान हे फ्रांसमधील एक शहर आहे. कान हे फ्रांस च्या दक्षिण भागात असलेले शहर आहे. हे शहर इटली च्या सीमारेषे पासून अतिशय जवळ आहे.
[संपादन] इतिहास
या शहराला प्राचीन इतिहास आहे. मात्र याची भरभराट इ.स. १८३० च्या पुढेच झाली. काही ब्रिटिश अधिकारी इटलीला जातांना येथे राहण्यास होते त्यांना हे शहर आवडले. तसेच अनेक धनवान व अधिकारी फ्रेंच लोकांनी येथे आपले सुटीचे घर बांधले. पुढे येथे कान चित्रपट उत्सव सूरू झाला. त्यानंतर हे शहर आंतरराष्ट्रीय नकाशावर आले. या उत्सवामुळे अमेरिका येथील हॉलीवुड चे अनेक मान्यवर कलाकार दर वर्षी येथे येवून जातात.
[संपादन] हवामान
डिसेंबर ते फेब्रुवारी हे महिने वगळता तापमान सुखद असते. उन्हाळा आला असता येथे जवळपास बारा तास सुर्यप्रकाश मिळतो त्यामुळे हे युरोप मधले महत्वाचे पर्यटन केंद्र बनले आहे.

