कानू सन्याल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.
कानू सन्याल

कानू सन्याल (इ.स. १९२९ - २३ मार्च, इ.स. २०१०) हे भारतातील हे डावे राजकारणी होते. ते मूळच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिनवादी) च्या संस्थापकांपैकी एक होते.

अनुक्रमणिका

[संपादन] व्यक्तिगत जीवन

कानू सन्यालांचा जन्म इ.स. १९२९ साली दार्जिलिंग जिल्ह्यातील कुर्सिआँग या गावात झाला. त्यांचे वडील अन्नादा गोविंद सन्याल हे न्यायालयात कारकून होते. कानू सन्याल हे भावंडात सर्वात लहान होते. त्यांना पाच भाऊ व एका बहिणीच्या असे सहा भावंड होते. इ.स. १९४६ साली कर्सिआँगमध्येच ते मॅट्रिकची पर्यंत शिकले. पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी जलपाईगुडी महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. येथे त्यांचे इंटर पर्यंतचे शिक्षण झाले. पुढे त्यांनी काम्पाँग येथील न्यायालयात कारकुनाची नोकरी केली.

[संपादन] नक्षलवादी चळवळीतील सहभाग आणि राजकीय कारकिर्द

भारतातील नक्षलवादी चळवळीचा उगम जेथुन झाला त्या घटनांच्या मुळाशी असणारे कानू सन्याल हे प्रमुख नाव आहे.[१] शोषित समाजाच्या मुक्ती साठी सशस्त्र मार्गच हवा अशी भुमिका त्यांनी घेतली.१९४९ साली कम्युनिस्ट पक्षावर घातलेल्या बंदीच्या निषेधार्थ त्यावेळचे मुख्यमंत्री बी. सी. राय यांना काळे झेंडे दाखविण्याच्या आरोपाखाली त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. तुरुगवासातच त्यांची भेट चारू मुजुमदार यांच्याशी झाली. चारू मुजुमदार यांच्या सोबत त्यांची गाढ मैत्री जमली. तुरुंगातून सुटल्यावर सन्याल यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम सुरू केले. पण त्यांचे विचार जहाल होते व सशस्त्र क्रांतीचा मार्ग त्यांना जास्त जवळचा वाटत होता. इ.स. १९६४ साली भारतीय कम्युनिस्ट पक्षा मध्ये फुट पडली तेव्हा चारू मुजुमदार व कानू सन्याल दोघेही मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये गेले.

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्त्वाखालील संयुक्त सरकारमध्ये कृषीमंत्री असलेल्या हरेकृष्ण कोणार यांनी ‘कसेल त्याची जमीन’ ही घोषणा दिली. याचसुमाराला दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी या तिबेटच्या जवळ असलेल्या एका छोटय़ा खेडय़ातील वातावरण शेतमजुर व जमीनदारांच्या संघर्षाने तापत होते. शेतात पीक आलेले होते व जमिनदाराची पीक कापण्याची परवानगी देत नाही यामुळे शेतकरयांना पीक कापता येत नव्हते. लेनिन-मार्क्सवादाने भारावलेल्या कॉम्रेड चारू मुजूमदार , कॉम्रेड कानू सन्याल आणि जंगल संथाल यांनी नक्षलबारी आणि आजूबाजुच्या गावातील शेतकरी-शेतमजुरांना एकत्र केले व पीके कापण्याचे आंदोलन घेतले. नक्षलबारी या गावातुन शेतमजुरांच्या साठी संघर्ष सुरु झाला. ह्या चळवळीचे रूपांतर पुढे नक्षलवादात झाले. २५ मे, इ.स. १९६७ पासून त्यांनी नक्षलबारीत जमीनदारांच्या विरोधात शेतकऱ्यांचे हिंसक आंदोलन सुरू केले. यातुनच नक्षलवादी चळवळीचा उगम झाला. स्वतःला नक्षलवादी म्हणवणाऱ्यांना कानू सन्याल यांचा कालांतराने विसर पडलाच तर कानू सन्याल यांनी ही आपला मार्ग चुकल्याचे अधिकृतपणे जाहीर केले व नक्षलवादी चळवळीच्या हिंसकतेलाच विरोध दर्शविला.[ संदर्भ हवा ]


१ मे, इ.स. १९६९ रोजी नक्षलबारी आंदोलनाच्या समर्थनार्थ कोलकाता ( तेव्हाचे कलकत्ता ) येथे झालेल्या सभेत २२ एप्रिल, इ.स. १९६९ला व्लादिमीर लेनिनच्या जन्मदिनीचे औचित्य साधुन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्‍सवादी-लेनीनवादी) सीपीआय(एम-एल) ची करण्यात आल्याचे कानु सन्याल यांनी जाहीर केले की. चारू मुजूमदार , कानू सन्याल आणि जंगल संथाल हे पक्षाचे संस्थापक होते.

कानू सन्याल यांचा तेव्हा तरुणांवर आणि बुद्धीजीवी वर्गावर प्रभाव पडला. त्यांचे नेतृत्व आणि त्यांचा पक्ष याला पाठींबा मिळत होता.[ संदर्भ हवा ] चीनचे माओचे जवळचे सहकारी लिनचे रेड गार्डस्च्या क्रांतीचे तंत्र भारतीय कम्युनिस्ट (मार्क्‍सवादी-लेनीनवादी) पक्षाने सीपीआय(एम-एल) ने अधिकृतरित्या स्वीकारले. ऑगस्ट, इ.स. १९७० साली चारू मुजूमदार, कानू सन्याल, जगंल संथाल यांना अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. यातील चारू मुजूमदार यांचा तुरुंगवासातच मृत्यु झाला. जगंल संथाल हे तुरुंगातुन सुटल्यानंतर दारुच्या आहारी गेले. ६ वर्षाच्या तुरुंगवासानंतर इ.स. १९७७ साली कानू सन्याल बाहेर आले. आता पर्यंत परिस्थिती बदलली होती. १९७७ साली केंद्रात जनता पक्षाचे सरकार होते. तसेच पश्चिम बंगाल मध्ये सी पी आय ( मार्क्सवादी) चे सरकार होते. सर्व परिस्थिती चा अंदाज घेत, सीपीआय(एम-एल)ची निर्मितीच चुकीची होती, लिन यांच्या सूत्रामुळे संपूर्ण चळवळ चुकीच्या मार्गाने गेली. सीपीआय (एमएल) हा कम्युनिस्ट पक्ष नव्हताच, तर ती एक अतिरेकी संघटना होती असे विचार जाहीर पणे मांडले. 'हिंसा मान्य नसलेल्या गरिबांनाच हे माओवादी ठार मारू लागले आहेत. राजसत्तेची पोलिसी यंत्रणा याच गरिबांचा बळी देऊन माओवाद्यांना संपवू पाहतेय. दोन्हीकडून शेवटी गरीबच भरडला जातोय...' असे कानू सन्याल बोलु लागले. यामुळे जहाल नक्षलवाद्यांनी त्यांना जवळ केले नाही. नक्षलवादी चळवळ कानु सन्याल यांच्या प्रभावापासुन दुर आली होती. पुढे सन्याल यांनी कम्युनिस्ट ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एम-एल) या नवीन पक्षाची स्थापना केली. इ.स. २००५ साली त्यांनी वेगवेगळे मार्क्‍सवादी-लेनिनवादी गट एकत्र करून सीपीआय (एम-एल) नावाचा पक्ष पुन्हा एकदा स्थापन केला. १८ जानेवारी २००६ मध्ये चहांचे मळे बंद होत असल्याच्या निषेधार्थ न्यू जलपाइगुडी रेल्वे स्थानक, सिलिगुडी येथे राजधानी एक्सप्रेस अडवून त्यांनी आंदोलन केले. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा अटक झाली. सिंगूरमध्ये शेतकऱ्यांनी जमिनी ताब्यात घेण्याच्या विरुध्द पश्चिम बंगालमधील कम्युनिस्ट सरकार विरोधात जे आंदोलन छेडले त्यात सहभाग घेतला.

[संपादन] अखेर

जीवनाच्या अखेरच्या काळात त्यांना कॅन्सर सारखा असाध्य रोगही जडला होता. आपल्या राहत्या घरातच २३ मार्च, इ.स. २०१० ला आत्महत्या करून त्यांनी स्वतःचे जीवन संपवले.

अखेर २३ मार्च, इ.स. २०१० ला सिलिगुडीपासून २५ किमी अंतरावरील गावात त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह फास घेऊन टांगलेल्या अवस्थेत आढळला. त्यांच्या शरीराला जडलेल्या व्याधींनी ते त्रस्त असल्याचा अंदाज होता.

[संपादन] संदर्भ

  1. नक्षलिझम फाउंडर कानू सन्याल फाउंड हँगिंग. आयबीएन लाइव्ह. (इंग्लिश मजकूर)

[संपादन] बाह्य दुवे



Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

वॉर्निंग: डिफॉल्ट सॉर्ट की "सन्याल,कानू"ओवर्राइड्स अर्लीयर डिफॉल्ट सॉर्ट की "कानू सन्याल".

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये