कस्तुरीमृग
| कस्तुरीमृग | ||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| प्रजातींची उपलब्धता | ||||||||||
| शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||
|
कस्तुरी मृग (शास्त्रीय नाव: Moschus moschiferus मोशस मोशीफेरस ; इंग्लिश: Musk deer, मस्क डियर) हे कस्तुरीमृगाद्य कुळातील मोशस या एकमेव प्रजातीचे युग्मखुरी प्राणी आहेत. सारंगाद्य (सर्व्हिडी) कुळातील प्राण्यांपेक्षा - म्हणजे खर्या हरणांपेक्षा - कस्तुरी मृग अधिक पुरातन असून यांना सारंगाद्यांप्रमाणे शिंगे नसतात, तसेच स्तनाग्रांची एकच जोडी असते. तसेच यांना पित्ताशय, तसेच सुळ्यांसारखे दोन दात असतात; जे सारंगाद्यांमध्ये आढळत नाहीत. तसेच यांना कस्तुरी नावाचा तीव्र वासाचा स्राव स्रवणार्या कस्तुरी ग्रंथी असतात.
अनुक्रमणिका |
वैशिष्ठ्ये [संपादन]
कस्तुरी मृगांची लांबी अंदाजे ८० ते १०० सेमी असते,त्यांची खांद्यापर्यन्तची अंदाजे ५० सेमी असते.त्यांचे लांब टोकदार मधले खुर व मोठे पार्श्व खुर हे बर्फाळ उतारावर व निसरड्या दगडांवर जम बसवण्यासाठी विकसित झाले आहेत.
कस्तुरी ग्रंथि नरांमध्ये, पोटाच्या त्वचेखाली, जननेंद्रिय व बेंबीच्यामध्ये असते. नुकतेच स्त्रवण झाल्यावरती त्याचा वास उग्र असतो, वाळल्यावरती त्याला कस्तुरीचा सुगंध प्राप्त होतो[१].
सांस्कृतिक संदर्भ [संपादन]
कस्तुरीमृग हा भारतातील उत्तराखंड राज्याचा राज्यपशु आहे.
तत्त्वज्ञान व साहित्यातील संदर्भ [संपादन]
कस्तुरीमृग व त्याच्या नाभीजवळील ग्रंथींमध्ये आढळणारी कस्तुरी यांच्या उपमा वापरून माणूस आणि अंतस्थ परमेश्वराच्या साक्षात्काराचे प्रतिपादन भारतीय उपखंडातल्या भक्तिमार्गी साहित्यात व तत्वज्ञानात अनेक वेळा केले आहे [२].
हेही बघा [संपादन]
संदर्भ व नोंदी [संपादन]
- ↑ प्रेटर, एस.एच. (१९९३). द बुक ऑफ इंडिअन अॅनिमल्स. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. आय.एस.बी.एन. 0195621697. १७ डिसेंबर २०११ रोजी मिळवले. (इंग्रजी मजकूर)
- ↑ संत कबीर. कबीररचित साखी. “"कस्तुरी कुंडली बसे मृग धुंडे बन माही” (मध्ययुगीन हिंदुस्तानी मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |