कल्पना चावला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कल्पना चावला

कल्‍पना चावला (१ जुलै इ.स. १९६१:कर्नाल, हरयाणा -- १ फेब्रुवारी इ.स. २००३:टेक्सासवर अंतराळात) ही भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर होती. कल्‍पना ही भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती.

कल्पना चावला यांचा जन्म कर्नाल, हरयाणा येथे झाला. त्या टागोर विद्यालयात शिकल्या. पंजाब विद्यापीठातुन अभियांत्रिकी पदवी घेऊन त्यांनी कोलोराडो विद्यापीठातुन डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणुन त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले (१९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर १९९७).

अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनटे प्रवास केला. १ फेब्रुवारी २००३ साली डॉ.चावला यांचा मृत्यू अंतराळयान कोलंबियाच्या विस्फोटाने झाला.

वैयक्‍तिक साधने