कमल हासन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कमल हासन | |
| जन्म | ७ नोव्हेंबर, इ.स. १९५४ परमाकुडी, मद्रास प्रांत, भारत |
| कार्यक्षेत्र | चित्रपट (अभिनय, पटकथालेखन, दिग्दर्शन) |
| राष्ट्रीयत्व | तमिळ, भारतीय |
| भाषा | तमिळ |
| कारकिर्दीचा काळ | इ.स. १९५९ - चालू |
| पत्नी | वाणी गणपती (इ.स. १९७८ - इ.स. १९८८) सारिका हासन (इ.स. १९८८ - इ.स. २००४) |
| अपत्ये | श्रुती हासन अक्षरा हासन |
कमल हासन (तमिळ: கமல் ஹாசன் ; रोमन लिपी: Kamal Haasan ;) (७ नोव्हेंबर, इ.स. १९५४- हयात) हा तमिळ चित्रपट-अभिनेता, पटकथालेखक व दिग्दर्शक आहे. १२ ऑगस्ट, इ.स. १९५९ रोजी चित्रपटगृहांत झळकलेल्या कलतूर कन्नम्मा या तमिळ भाषेतील चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून वयाच्या चौथ्या वर्षी कमल हासनाचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. इ.स. १९७५ सालच्या अपूर्व रागांगल या तमिळ चित्रपटात प्रमुख नायकाच्या भूमिकेद्वारे तरुणपणी त्याचा चित्रपटक्षेत्रात पुनर्प्रवेश झाला. त्याने अभिनय केलेले मूंद्रम पिरै (इ.स. १९८२), नायगन (इ.स. १९८७), हे राम (इ.स. २०००), विरुमांदी (इ.स. २००४), दशावतारम (इ.स. २००८) हे चित्रपट विशेष गाजले.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- कमल हासन आय.एम.डी.बी. संकेतस्थळावर (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |