कंब रामायणम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
रामावतारम (तमिळ: இராமாவதாரம் ; रोमन लिपी: Ramavataram ;) अर्थात कंब रामायणम (तमिळ: கம்ப இராமாயணம் ; रोमन लिपी: Kamba Ramayanam ;) हे तमिळ महाकवी कंबन याने रामायणावर रचलेले तमिळ भाषेतील महाकाव्य आहे.
परिचय [संपादन]
या ग्रंथात १०,०५० पदे असून् बालकांड ते युद्धकांड अशी सहा कांडे यात आहेत. कंब रामायणाचे कथानक वाल्मीकि रामायणावर बेतले आहे, परंतु कंबनाने मूळ रामायणाचा केवळ अनुवाद अथवा छायानुवाद न करता, आपल्या प्रतिभेनुसार घटनांमध्ये अनेक बदल केले आहेत.
तमिळ भाषेत या ग्रंथाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी याचा इंग्लिश भाषेत पद्यमय अनुवाद केला आहे.