कंप्रता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेगवेगळ्या कंप्रतांचे ज्या-वक्रीय तरंग; खालच्या तरंगांच्या कंप्रता वरच्या तरंगांपेक्षा अधिक आहेत. आडवा अक्ष काळ दर्शवतो.

कंप्रता (इंग्लिश : Frequency) म्हणजे एखाद्या आवर्तनशील गोष्टीच्या आवर्तनांची काळाच्या एका एककातील संख्या होय. आवर्तनशील गोष्टीच्या एका आवर्तनाला लागणाऱ्या कालावधीला आवृत्तिकाल म्हणतात. अर्थातच, कंप्रता आवृत्तिकालाच्या व्यस्त असते.

व्याख्या व एकक[संपादन]

व्याख्येनुसार वलन, दोलन किंवा तरंग इत्यादी आवर्ती प्रक्रियांसाठी काळाच्या एका एककात घडणाऱ्या आवर्तनांची संख्या, म्हणजे कंप्रता होय. भौतिकशास्त्रअभियांत्रिकी यांच्या प्रकाशविज्ञान, ध्वनिशास्त्र, रेडिओ इत्यादी शाखांमध्ये कंप्रतेचे चिन्ह म्हणून f हे रोमन अक्षर किंवा ν (न्यू) हे ग्रीक अक्षर वापरतात.
SI एककांमध्ये कंप्रतेसाठी जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हाइनरिश हर्ट्‌झ यांच्या नावाने 'हर्ट्‌झ'(Hz) हे एकक वापरतात. उदा.: १ Hz म्हणजे एका सेकंदात एक आवर्तन.
आवृत्तिकाल दर्शवण्यासाठी T हे रोमन अक्षर वापरतात. आवृत्तिकाल हा कंप्रतेचा व्यस्त असतो : :
T = \frac{1}{f}.
आवृत्तिकालासाठी सेकंद हे SI एकक वापरतात.