कंठेरी चिलखा
| शास्त्रीय नाव | कॅरेड्रियस डूबियस (Charadrius dubius) |
|---|---|
| कुळ | टिट्टिभाद्य |
| अन्य भाषांतील नावे | |
| इंग्लिश | लिटल रिंग्ड प्लोवर (Little Ringed Plover) |
| संस्कृत | राजभट्टिका |
| हिंदी | मेरवा |
कंठेरी चिलखा (शास्त्रीय नाव: Charadrius dubius, कॅरेड्रियस डूबियस ; इंग्लिश: Little Ringed Plover, लिटल रिंग्ड प्लोवर ;) हा टिट्टिभाद्य कुळातील छोट्या आकारमानाचा एक पक्षी आहे. साधारण १७ सें.मी. आकारमानाचा हा पक्षी पाठीकडून मातकट-तपकिरी, पोटाकडून पांढरा, पाय पिवळे, जाड गोल डोक्याचा, कान आणि डोळ्यांभोवती गडद काळा भाग त्यात पिवळ्या रंगाची उठावदार चकती, विणीच्या काळात नराचा कंठ काळा असतो. यावरून याला कंठेरी चिलखा असे नाव पडले. एरवी नराचा आणि मादीचा कंठ फिकट तपकिरी असतो.
याच्या रंग-आकारमानावरून किमान तीन उपजाती आहेत.
अनुक्रमणिका |
[संपादन] आवाज
कंठेरी चिलख्याचा आवाज ऐका (सहाय्य·माहिती)
[संपादन] आढळ
समुद्र किनारे, नद्या-तलावांचे किनारे, दलदली भाग येथे कंठेरी चिलखा पक्षी हिमालयाच्या १ ते १.५ हजार मी. उंचीपर्यंत संपूर्ण भारतभर आढळतो तसेच बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका येथेही आढळतो.
[संपादन] खाद्य
पाण्यातील आणि जमिनीवरील विविध कीटक हे या पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे.
[संपादन] प्रजनन काळ
मुख्यत्वे मार्च ते मे हा काळ यांचा प्रजनन काळ आहे. यात स्थानिक बदलही आढळतात. जमिनीवर गडद रंगाच्या दगड-गोट्यांमध्ये मादी एकावेळी ३ किंवा ४, हिरवट राखाडी रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असलेली, एका दिशेने गोलसर तर दुसरीकडून टोकदार अंडी देते. पिलांचे संगोपन नर-मादी मिळून करतात.
[संपादन] बाह्य दुवे
- कंठेरी चिलख्याची माहिती व चित्रे. (इंग्लिश मजकूर)
- कंठेरी चिलखा. एव्हिबेस.कॉम. (इंग्लिश व बहुभाषी मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |