औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

औरंगाबाद (पश्चिम) विधानसभा मतदारसंघ - १०८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, औरंगाबाद (पश्चिम) मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्याच्या औरंगाबाद तालुक्यातील कांचनवाडी, औरंगाबाद सी.बी. ही महसूल मंडळे आणि औरंगाबाद महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १, १७ ते ३३ यांचा समावेश होतो. औरंगाबाद (पश्चिम) हा विधानसभा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

शिवसेनेचे संजय पांडुरंग शिरसाट हे औरंगाबाद (पश्चिम) विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ संजय पांडुरंग शिरसाट शिवसेना
२०१४ संजय पांडुरंग शिरसाट शिवसेना
२००९ संजय पांडुरंग शिरसाट शिवसेना

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".