ओरेसुंड पूल
ओरेसुंड पूल हा (डॅनिश: Øresundsbroen, स्वीडिश: Öresundsbron) डेन्मार्क व स्वीडन ह्या देशांदरम्यान ओरेसुंड आखातावर बांधलेला एक बोगदा-पूल आहे. हा पूल डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनला स्वीडनमधील माल्मो ह्या शहराशी जोडतो. एकत्रित रस्तेवाहतूक व रेल्वेवाहतूक करणारा ओरेसुंड पूल युरोपातील सर्वात मोठा पूल आहे. ओरेसुंड पुलाचे वैशिठ्य असे की स्वीडनमधून सुरु होणारा हा ७.८५ किमी लांब पूल पेबरहोम नावाच्या एका कृत्रिम बेटावर संपतो व तेथून वाहतूक एका ४ किमी लांब समुद्राखालील भुयारी बोगद्याद्वारे कोपनहेगन शहरापर्यंत नेली जाते.
ओरेसुंड पुलाचे बांधकाम १९९५ मध्ये सुरु झाले व १ जुलै २००० रोजी ह्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. पुलाच्या बांधकामासाठी एकूण ३० अब्ज डॅनिश क्रोन एवढा खर्च आला.
गॅलरी [संपादन]
-
Pylonerna, Sveriges högsta konstruktioner.
-
Öresundsbron från Lernacken.
-
Från rymden.
-
Från Pepparholm mot Sverige.
बाह्य दुवे [संपादन]
गुणक:
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |