ओपेरा (वेब न्याहाळक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओपेरा
Opera O.svg
Opera Web Browser 11.png
ओपेरा ११.६१ विकिपीडिया दाखवताना
विकासक ओपेरा सॉफ्टवेअर एएसए
प्रारंभिक आवृत्ती १९९४ च्या शेवटी
सद्य आवृत्ती ११.६४ (मे १८, २०१२)
सद्य अस्थिर आवृत्ती १२.०० अल्फा (बिल्ड १४२९) (मे २५, २०१२)
विकासाची स्थिती कार्यरत
प्रणालीलेखनाची भाषा सी++
संगणक प्रणाली फ्रीबीएसडी
लिनक्स
विंडोज
सोलारिस
भाषा ५१
सॉफ्टवेअरचा प्रकार आंतरजाल न्याहाळक व आंतरजाल सूट
परवाना मोफत प्रताधिकारित, काही मुक्तस्रोत घटकांसह
संकेतस्थळ ओपेरा.कॉम

ओपेरा हा ओपेरा सॉफ्टवेअर यांनी तयार केलेला आंतरजाल न्याहाळक व आंतरजाल सूट असून त्याचे जगभरात २०० लक्षांहून जास्त वापरकर्ते आहेत. ओपेरा सामान्य आंतरजाल-संबंधित कामे हाताळू शकतो, उदा. जालावरील पाने दाखवणे, विपत्र पाठवणे व प्राप्त करुन घेणे, संपर्क व्यवस्थापन करणे, आयआरसीवर चॅटिंग करणे, बिटटोरेंटद्वारा संचिका उतरवून घेणे व वेब फीड वाचणे. ओपेरा व्यक्तिगत संगणक तसेच भ्रमणध्वनींसाठी मोफत उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

ओपेरा हा न्याहाळक काही देशांत अत्यंत लोकप्रिय आहे, उदाहरणार्थ युक्रेन. ओपेरा मिनी हा भ्रमणध्वनींसाठीचा सर्वांत लोकप्रिय आंतरजाल न्याहाळक आहे. अनेक भ्रमणध्वनींमध्ये तो आधीच असतो.

ओपेरामध्ये टॅबद्वारे[मराठी शब्द सुचवा] न्याहाळणे, पान मोठे / लहान करणे, माऊसद्वारे लघुपथ व अगोदरपासूनच असलेला उतरवलेल्या संचिकांचा व्यवस्थापक ह्या सुविधा आहेत.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये