ओझोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


Wikitext.svg
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

ओझोन हा वायु मुळात प्राणवायुचा संयुग आहे. ओझोन हा प्राणवायुच्या ३ अणूं पासून बनलेला असून त्याचे रेणुसुत्र O3 असे आहे. शास्त्रीय द्रुष्टीने ओझोनचा थर हा पृथ्वीपासून १६ ते २३ किलोमीटरच्या पट्ट्यात आढळतो. ओझोन हा सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा बचाव करतो.

पदार्थवैज्ञानिक बाह्य गुण[संपादन]

ओझोन हा फिकट निळ्या रंगाचा वायु असून,पाण्यात किंचीत विरघळतो.कार्बन टेट्राक्लोराईड वा तत्सम अध्वृवीय द्रावक यात जास्त विरघळुन एक निळे द्रावण तयार करतो.-११२ तापमानावर त्याचे एक गडद निळ्या तरलात रुपांतर होते. या तरलास त्याच्या उत्कलन बिंदूपर्यंत गरम करणे धोक्याचे आहे,कारण वायुरुप व तरल ओझोन मिळुन स्फोट होउ शकतो.-१९३तापमानावर,त्याचे रुपांतर एका जांभळसर-काळसर पदार्थात होते.[१] बहुतेक लोकं ०.०१ पी.पी.एम. इतक्या प्रमाणात असलेला ओझोन वायु ओळखु शकतात कारण त्यास असलेला क्लोरीन सदृष्य तिव्र वास हा होय.त्याच्या ०.१ ते १ पी.पी.एम. एवढ्या हवेतील तिव्रतेने डोकेदुखी,डोळ्यांची जळजळ व श्वसनसंस्थेची जळजळ इत्यादी विकार उदभवु शकतात..[२]

कमी पातळीच्या असण्यानेसुद्धा, प्लॅस्टिक,फुप्फुस इत्यादिंवर त्याचा विपरीत परीणाम होतो. ओझोन हा वायु, चुंबकिय क्षेत्रास विरोध करणारा आहे.एकदा ते क्षेत्र तयार झाल्यावर, तो अशा क्षेत्राची ताकद कमी करतो.

हे ही पहा[संपादन]

ओझोनचा पट्टा

संदर्भ[संपादन]

[१]

[२]

  1. १.० १.१ Oxygen. WebElements. 2006-09-23 रोजी पाहिले.
  2. २.० २.१ [1977] (2003) "22", Nicole Folchetti: Chemistry: The Central Science, 9th, Pearson Education, पृ. 882–883. आय.एस.बी.एन. 0-13-066997-0.