एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एम. चिन्नास्वामी स्टेडियम
MChinnaswamy-Stadium.jpg
एम. चिन्नास्वामी स्टेडियम
मैदान माहिती
स्थळ बंगळूर
स्थापना १९६९
बसण्याची क्षमता ५०,०००
मालक कर्नाटका क्रिकेट संघटन
प्रचालक कर्नाटका क्रिकेट संघटन
यजमान कर्नाटक, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. २२ नोव्हेंबर - २७ नोव्हेंबर १९७४: भारत  वि. इंग्लंड
अंतिम क.सा. ९ ऑक्टोबर - १३ ऑक्टोबर २०१०: भारत  वि. ऑस्ट्रेलिया
प्रथम एसा २६ सप्टेंबर १९८२: भारत वि. श्रीलंका
अंतिम एसा २३ नोव्हेंबर २००८: भारत वि. इंग्लंड
शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २००९
स्रोत: एम. चिन्नास्वामी स्टेडियम, Cricinfo (इंग्लिश मजकूर)

एम. चिन्नास्वामी स्टेडियम (कन्नड: ಚಿನ್ನಸ್ವಾಮಿ ಕ್ರೀಡಾಂಗಣ ; रोमन लिपी: M. Chinnaswamy Stadium) हे भारतातील कर्नाटक राज्यात बेंगळुरू येथील प्रथम श्रेणीचे क्रिकेट मैदान आहे. कब्बन पार्क आणि एम.जी. रोड यांच्याजवळ तीन दशकापासून हे मैदान आहे. याचे पूर्वीचे नाव कर्नाटक स्टेट क्रिकेट असोशिएशन स्टेडियम असे होते. नंतर एम. चिन्नास्वामी यांनी केलेल्या क्रिकेटाच्या सेवेनिमित्त त्यांचे नाव या मैदानास देण्यात आले. कर्नाटक राज्य क्रिकेट संघ आणि इंडियन प्रीमिअर लीग यांचे ते घरचे मैदान आहे. या मैदानाची कोनशिला सन १९६९ मध्ये बसविण्यात आली. या मैदानावर प्रथम श्रेणीचा पहिला सामना सन १९७२-७३ मध्ये खेळल्या गेला. पहिली कसोटी सन १९७४-७५ मध्ये भारत व वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान खेळली गेली. या मैदानाची सध्याची आसनक्षमता ४०,००० आहे. ती लवकरच ७०,००० पर्यंत नेण्याची योजना आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्याकडे या मैदानाचे विशेष अधिकार आहेत.

बाह्य दुवे[संपादन]