एकनाथ पेहरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सन्तश्री प.पु.गुरू एकनाथ पेहरकर (सत् स्वरूपानंद) ( २८ फेब्रुवारी १९५९ -मृत्यू:२७ जून २०११) हे दत्तसंप्रदायातील एक सत्पुरूष होते.

एकनाथ पेहरकर यांनी आपले ऐहिक जीवन समाज कल्याणासाठी खर्च केले.त्यांनी सदैव दत्तनाम व आध्यात्मिक शास्त्राचा अभ्यास करून मराठवाडा,विदर्भात प्रवचने केली. संत श्री प.पु.ब्रह्मलीन एकनाथ पेहरकर (सत् स्वरूपानंद) यांचा जन्म२८ फेब्रुवारी १९५९ साली फुलंब्री औरंगाबाद (महाराष्ट्र)येथे झाला.गुरुवर्य बालपणा पासुनच तेजस्वी होते. त्यांना बालपणी दत्त नामाची आवड झाली त्या करीता ते दत्त प्राप्ती साठी गिरणार पर्वतावर जाऊन त्यांनी तपश्चर्या केली.नंतर ते आपल्या गावी आले व अध्यात्माकडे वळले. फुलंब्री येथे त्यांनी दत्त मठाची स्थापना केली.अशा योगीचा महानिर्वाण योगिणी एकादशी(२७ जून २०११) दिवशी झाला.