एकनाथी भागवत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एकनाथी भागवत हा वारकरी संप्रदायातील प्रमुख तीन ग्रंथापैकी (प्रस्थानत्रयी) एक ग्रंथ आहे.

अल्प-परिचय[संपादन]

संत एकनाथ यांचा हा १८,७९८ ओव्यांचा ग्रंथ आहे. याच्या लेखनाची सुरुवात नाथांनी पैठण येथे केली व तो काशी क्षेत्री पूर्ण केला. जे सिद्धांत ज्ञानेश्वरी या ग्रंथात संक्षेपात मांडले आहेत तेच सिद्धांत या ग्रंथात विस्ताराने सांगितले आहेत. ज्ञानेश्वरी व एकनाथी भागवत हे दोन्ही ग्रंथ एकाच तत्त्वावर आधारित आहेत. ते ग्रंथ परस्पर पूरक आहेत. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला संदेश ज्ञानेश्वरीमध्ये आहे, तर भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला दिलेला संदेश भागवतामध्ये आहे.[१]

एकनाथी भागवत हा ग्रंथ नाथांनी श्रीमद्‍भागवताच्या बारास्कंधापैकी अकराव्या स्कंधावर लिहिलेली टीका होय. हे भागवत व्यासांनी (आपल्या पुत्राला) शुकमुनींना सांगितले आणि त्यांनी ते परिक्षिताला सांगितले. अकराव्या स्कंधामध्ये असलेल्या एकूण १४६७ श्लोकांवर नाथानी मराठीत भाष्य केले आहे. हा भाष्यग्रंथ लिहिताना नाथांनी संस्कृत पंडित असलेल्या श्रीधर या आचार्यांचा संदर्भ घेतला आहे. [१]

या ग्रंथाचे एकूण ३१ अध्याय आहेत. या पैकी पहिले ५ अध्याय त्यांनी पैठण येथे लिहिले तर उर्वरित २६ अध्याय काशी येथे लिहिले.

गणेश वंदन[संपादन]

सार्थ भागवताच्या आरंभी संत एकनाथांनी गणेशाला वंदन केले आहे. चार हात हे धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारी पुरुषार्थाचे प्रतिक आहेत. गणेशाचा एक दात स्वयं प्रकाशित वस्तूंना प्रकाश देतो. पूर्व मीमांसा व उत्तर मिमांसा ही दोन दर्शने गजाननाच्या कर्णाच्या ठिकाणी निवास करतात आणि मुखाशी परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी ह्या चारी वाणी सज्ज असतात. व गणेश कोणत्याही वाणीने ज्ञान देवू शकतो. गणेशाची दृष्टी आत्मरूपात अत्यंत सुखाने आणि संतोषाने सर्व सृष्टीला पाहू शकते. गणेशाचे मोठे पोट म्हणजे वृद्धी पावलेले सुखच आहे. आणि आनंदाचे आवर्त तशी गणेशाची नाभी आहे. शुद्ध सत्त्व गणेशाचे शुभ्र वर्णाचे शुक्लांबर त्याने परिधान केले आहे. गणेशाने घातलेल्या सोन्याचा अलंकाराला त्याच्या मुळे शोभा आली आहे. गणेश चरण दुमडून अद्यैताच्या पूर्ण सहजासनात बसला आहे. गणेशाने मुठीत परशू धरला आहे. त्याने तो भक्तांची संकटे निवारण करतो. तसेच भक्तांच्या संसाराचे पाशही तोडून टाकतो. गणेशाच्या हातातील अंकुश भक्ताला संकटातून दोरीप्रमाणे खेचून घेतो. गणेशाच्या हातातील मोदक म्हणजे आनंद मोदक देऊन तो सर्वाना सुखी करतो. जे अणुमात्र आहे ते गणपतीचे अधिष्ठान आहे. मुषकाची गती सूक्ष्म आहे. गणेशाची मूर्ती पूर्णपणे हत्तीची व पूर्णपणे नरही नाही. तो व्यत्त अय्क्त्त यांच्या पलिकडील आहे. म्हणून एकनाथ गणेशाला भक्ती भावनेने नमन करतात कारण जो अकर्ता तोच गणेश रूपाने या ग्रंथाचा करता आहे.

सरस्वती नमन[संपादन]

 आता नमू सरस्वती |जे सारासार विवेक कर्ती |चेतनारूपी इंद्रियवृत्ती |जे चाळीती सर्वदा ||17||जे वाचेची वाचक | जे बुद्धीची द्योतक |जे प्रकाश प्रकाशक |स्वये देख स्वयमप्रभा ||१८||ते शिवांगी शक्तीउठी |  

सरस्वती वंदन[संपादन]

गणेश वंदना नंतर नाथ सरस्वती वंदन करत आहेत सरस्वती ही देवता चित शक्तीची आहे. सर्व इंद्रियांना तीच वृतीरूप देते.त्यांना प्रेरणा देते.बुद्धी व विद्या यांना आधारभूत सार व असार यांची निवड करणारी विवेकशक्ती तिचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजेच ही सरस्वती आपण बोलतो ती वाचा हिच्या मुळेच प्रकट होते. आपल्या बुद्धीला जे काही कळते ते हिच्या मुळेच प्रकाश म्हणजे द्यान द्यानरूपी प्रकाश हिच्याच मुळे प्रकाश या नावाला योग्य होतो.. सरस्वती ही स्वयं आहे.शिव वशक्ति एकरूप आहे हीच देवता शक्तीरूपाने शिवाच्या अंगात एक रूपात असते. डोळे आणि दृष्टी फळ आणि माधुरी जसे साखर आणि तिची गोडी फुल व त्याचा सुगन्ध एकरूपात असतो तसेच शिव आणि शक्ति यांची एकरूपता अतूट असते रसाळपणा असेल तर तो या सरस्वतीचा कृपेने होय. कारण हा आत्मस्वरूपाचा निजभाव आहे व ग्रंथाची गोडी त्या रसाळपणामुळेच आहे.सरस्वती देवीच आत्मस्वरूपाची रसवत्ता असून प्ररा "पश्यंती मध्यमा ववैखरी या चारी वाणीच्या सत्तारूपाने तीच व्याप्त आहे.तिला वागेश्वरी हे नाव त्या मुळेच दिलेले आहे.ती ज्या हंसावर आरूढ आहे तो हंस म्हणजे पक्षी नसून जगातील सार व असार याचा नीरक्षीर विवेक करणारे जे साधूरूपी परमहंस आहेत ते या देवतेचे वाहन आहे. त्याचे रहस्य इतके कठीण आहे कि तेथे तर्क चालत नाही.सरस्वती अमूर्त निराकार आहे.विश्वाच्या आकारानेहि ती विद्यमान आहे ग्रंथातील वर्णनाला विश्वाचे अनुसंधान कायम ठेवून तो विषय वदवून घेते .

महिमा[संपादन]

संत म्हणजे भूत दयेचे सागरच होत. करुणा कणव ही जगात दीनांचे दुःख दूर करत असते. तिला माहेरी यावेसे वाटले",तेंव्हा तिने या संताच्या मनात आगमन केले व तेच तिचे माहेर' अर्थात करुणा ही संताच्या मनातच जन्मास येते निर्गुणसुद्धा हातपाय आदि अवयव निर्माण झाले तरी त्याच्या निर्गुन्त्वाला बाधा येत नाही असे या संताचे स्वरूप आहे.आत्मानंद हाच मुळात सर्व अवस्थांचा गौरव आहे. सर्वात तोच श्रेष्ठ आहे पण संताच्या ठिकाणी त्याचाही गौरव होतो. डोळ्याच्या द्द्ष्टीचे पोषण या संताच्या दर्शनाने होते आणि स्न्तोशाला ही संतोष वाटतो तो या संतांच्या पायांच्या अंगठ्या जवळ हे संत ज्याचावर कृपा करतात त्यांच्या संसाराचे संकटच ते दूर करतात.आणि संताच्या कृपेने त्यांना ब्रम्हाचा साक्षात्कार होतो. आत्मज्ञानाचा प्रकाश पडण्यासाठी एरवी विवेक; वीराग्य सदाचार व मुमुक्षा या चार साधनांची गरज असते, पण या संताचा महिमा असा की यांच्यावरील केवळ श्रद्धेने आत्मज्ञान प्राप्त होते; म्हणजे ह्या साधनांचा अभ्यास आपल्याला प्रयत्नपूर्वक करावा लागत् नाही .हे संत सज्जन जगामध्ये लोकांना दिसत असतात पण अज्ञानामुळे त्याच्या अस्तित्वा बद्दल संशय निर्माण होतो. या मुळेच त्यांना संतांचा सहवास मिळत नाही.एकल्यवनावाच्या एका भिल्लाने द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती बनवली. तेथे ग्रुरुत्वाची धारणा करून तो धनुर्विद्येत मोठा पारंगत झाला. आणि अर्जुनादिकानाही भारी ठरला या कथेवरून श्रद्धाभावनेचे महत्त्व लक्ष्यात येते. हे संत अष्टविधा प्रकृतीच्या पलीकडे असतात या जगात राहूनही ते अविकारी राहतात या प्रकृतीतील वस्तूंचे सौन्दर्य किंवा कुरूपपणा विकार व त्यातून होणारे देण्याघेण्याचे व्यवहार या मुळे त्यंच्यावर कोणताही परिणाम होत नाही.सन्मुख आलेले सुखदुखा:चे भोग पाहून ते मनाने विटत नाहीत. मुद्दाम त्याग करण्यासाठी उद्युत्त होत नाहीत. ती त्यांची सहजस्थिती असते. त्याच स्थितित ते नेहमी राहतात. जागृती व स्वप्न या अवस्था किवा गाढ झोपेची अवस्था यातील वेगळेपणा ते संत नित्य आत्मस्थितीत राहत असल्यामुळे उरत नाही. उन्मनी अवस्था येते अर्थात संकल्प विकल्प नाहीत; वस्तूंचे नामरूप वेगळेपणाने ओळखणे नाही आवड नावड नाही; असे मनाचे उच्च पातळीवरचे अस्तित्वही मागे पडते व त्तृया म्हणजे म्हर्लोकातील साक्षिणी अवस्थाही सन्तानच्या बाबतीत उरत नाही. द्रष्टा वा घटक म्हणजेच "मी"ला दिसणारी वस्तू आणि दर्शन म्हणजे त्यातील व्यवहार ह्या तिन्हींचा विलय याचे मुख्य कारण म्हणजे द्वैताचेची भावना विलयास जाते. ज्ञातेपणही विलयास जाते.त्यांच्या ठायी विज्ञान मात्र उरते.

संदर्भ[संपादन]

  1. संपूर्ण एकनाथी भागवत, मराठी विकिस्रोत
  1. ^ a b डॉ.मुकुंद दातार. "डॉ.मुकुंद दातार, १३ जुलै २०२३". Sakalsant Vicharmanch.