ऊर्मिला कानेटकर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(उर्मिला कानेटकर या पानावरून पुनर्निर्देशित)
| ऊर्मिला कानेटकर | |
|---|---|
| जन्म | ऊर्मिला कानेटकर पुणे, महाराष्ट्र |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | अभिनय (चित्रपट, दूरचित्रवाणी) |
| भाषा | मराठी, हिंदी, इंग्रजी |
| प्रमुख चित्रपट | शुभमंगल सावधान सावली |
ऊर्मिला कानेटकर (जन्मदिनांक अज्ञात - हयात) ही कथ्थक नर्तिका व मराठी अभिनेत्री आहे.
जीवन [संपादन]
ऊर्मिला कानेटकर हिचा जन्म महाराष्ट्रात पुणे येथे झाला. प्रसिद्ध कथ्थक गुरू आशा जोगळेकर यांच्याकडे तिने कथ्थकचे शिक्षण घेतले.
इ.स. १९९७ साली भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नवी दिल्ली येथे साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी आझादी की जंग हे बॅले नृत्य सादर केले गेले, त्यात ऊर्मिला कानेटकरचा सहभाग होता.
ऊर्मिला ओडिसी याही नृत्यशैलीचे शिक्षण सुजाता महापात्रा यांच्याकडून घेत आहे.
इ.स. २००६ साली प्रदर्शित झालेल्या शुभमंगल सावधान या चित्रपटाद्वारे ऊर्मिलाचे मराठी रजतपटावर पदार्पण झाले. त्यानंतर इ.स. २००७ साली प्रदर्शित झालेल्या सावली या चित्रपटातही ऊर्मिलाने भूमिका केली आहे.
झी मराठीवर दाखविल्या गेलेल्या असंभव (मालिका) या मालिकेतही तिची महत्त्वाची भूमिका होती.
बाह्य दुवे [संपादन]
- इंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील ऊर्मिला कानेटकरचे पान (इंग्लिश मजकूर)