उच्च रक्तदाब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

--117.223.4.146 १९:०५, २३ सप्टेंबर २०१३ (IST)

उच्च रक्तदाब
वर्गीकरण व बाह्यदुवे
आय.सी.डी.-१० I10,I11,I12,
I13,I15
आय.सी.डी.- 401
ओ.एम.आय.एम. 145500
मेडलाइनप्ल्स 000468
इ-मेडिसिन med/1106
मेडिकल सब्जेक्ट हेडिंग्ज D006973

उच्च रक्तदाब म्हणजे वय व इतर वर्गीकरण केलेल्या रक्तदाबापेक्षा जास्त दाब होय. याचा अर्थ रक्त धमन्यांमध्ये तनाव निर्माण होणे होय.सामान्यतः रक्तदाब १२०/८० पेक्षा कमी पाहिजे आणि १२०/८० तथा १३९/८९ च्या दरम्यान च दाब "पूर्व उच्च रक्तदाब" म्हणून ओळखला जातो तसेच १४०/९० पेक्षा अधिकच रक्तदाब "उच्च रक्तदाब" म्हणून ओळखला जातो.

रक्तदाबाचे वर्गीकरण[संपादन]

जे.एन्.सी.७ नुसार रक्तदाबाप्रमाणाचे वर्गीकरण केले जाते. ते खालील प्रमाणे आहे.

प्रकार प्रकुंचनीयरक्तदाबमिमी पारा अनुशिथिलनीयरक्तदाब मिमी पारा
साधारण रक्तदाब ९०-११९ मिमी ६०-७९
रक्तदाब १२९-१३९ ८०-८९
उच्च रक्तदाब अवस्था१ १४०-१५९ ९०-९९
उच्च रक्तदाब अवस्था२ ≥१६० ≥१००

कारणे[संपादन]

  • चिंता , राग, भीती इत्यादि मानसिक विकार
  • आनुवंशिक कारणे
  • आहारात मिठाचे प्रमाण अधिक असणे
  • वजन जास्त असणे

रक्तदाबाचे दुष्परिणाम[संपादन]

वाढलेला रक्तदाब हा मेंदुलाधील वाहिन्या फुटण्याचे कारण असू शकतो. मेंदूमधील वाहिनी फुटल्यास मेंदूत रक्तस्त्राव होतो. हे रक्त काही काळाने गोठते. रक्ताची ही गुठळी मेंदूवर दाब निर्माण करते. मेंदूचा जो भाग दाबला जातो तो भाग शरीरातील ज्या भागाचे नियंत्रण करीत असतो तो शरीराचा अवयव लुळा पडतो आणि यालाच लकवा असे म्हणतात. थोडक्यात वाढलेला रक्तदाब लकवा निर्माण करू शकतो. लकवा होण्यामागचे कारण बहुदा अनियंत्रित रक्तदाब हेच असते.

रक्तदाबाचे दुष्परिणाम

उपचार[संपादन]

रक्तदाब नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्याने औषधे घ्यावीत. रक्तदाबाची औषधे एकदा सुरु केल्यास ती मनाने बंद करू नयेत. रक्तदाबाची औषधे शक्यतो आयुष्यभर घ्यावी लागतात.